व्हिजन –“सर्वांसाठी आरोग्य
सुसंगती राखणे
- मनुष्यबळाची क्षमता वाढवणे
- वैद्यकीय /अवैद्यकीय पदे भरणे
- प्रशिक्षित परिचर्या मनुष्यबळ उपलब्धता
सेवा सुधारणे
- बृहत् आराखडा
- आयपीएचएस मानके
- औषधांची उपलब्धता
सेवा वाढविणे / अद्ययावत करणे
- जीवनदायी आरोग्य योजना -राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना - विस्तारीत करणे
- शहरी आरोग्य
- आपत्कालीन आरोग्य सेवा
अ क्र |
आरोग्य कार्यक्रमाचे मूळ उद्देश |
१ |
राज्यातील नागरिकांना पुरेशी, गुणात्मक, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य देखभाल सेवा देणे. |
२ |
प्राथमिक आरोग्य सुविधा अधिकाधिक सुलभ होण्यासाठी फिरत्या आरोग्य केंद्रांच्या द्वारे वैद्यकीय संस्था लोकांच्या जास्तीतजास्त जवळ पोहोचवण्यासाठी, विशेषतः सेवेचा अभाव असलेल्या व दुर्गम जिल्ह्यांमध्ये , जास्तीत जास्त प्रयत्न करणे |
३ |
माता व अर्भक मृत्यू दर घटविण्याच्या दृष्टीने माता व बालक यांचे आरोग्य सुधारणे |
४ |
पायाभूत सेवा व कर्मचारी दोन्ही दृष्टीने दुय्यम पातळीवर रुग्णालय सेवा सुधारणे. |
५ |
राज्यातील आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका व इतर निम्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कौशल्ये व ज्ञान अद्ययावत करून त्यांना प्रशिक्षित करणे |
६ |
आरोग्य संस्थांच्या इमारतींची देखभाल व दुरूस्ती करणे. |
७ |
विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे |
८ |
समाजाचे ज्ञान ,दृष्टीकोन, व वर्तणूक सुधारण्यासाठी आरोग्य शिक्षण देणे |
शाश्वत विकास ध्येय -
संयुक्त राष्ट्राच्या दिनांक 2 व 5 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शाश्वत विकास 2030 अजेंडा स्वीकारण्यात आला . भारत देशाने सदर शाश्वत विकास ध्येय स्वीकारले आहे .या मध्ये जगाच्या कल्याणासाठी 17 ध्येये निश्चित करण्यात आली आहेत व ती सन 2030 पर्यन्त पूर्ण करवयाची आहेत
या मधील ध्येय क्रमांक 3 हे आरोग्याशी संबंधित असुन त्याबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.
3.1 सन 2030 पर्यन्त माता मृत्यू दराचे प्रमाण 1 लाख जिवंत जन्मामागे 70 इतके कमी करणे (राज्याने सदर उद्दीष्ट गाठले असून राज्याचे माता मृत्यू दराचे प्रमाण 1 लाख जिवंत जन्मामागे 46 इतके आहे.)
३.२ सन २०३० पर्यंत नवजात शिशू व पाच वर्षाखालील बालकांचे टाळता येण्याजोगे मृत्यू थांबविणे आणी त्यासाठी सर्व देशांनी नवजात मृत्युदराचे प्रमाण दर हजार जीवित जन्मामागे १२ पर्यंत व पाच वर्षाखालील मृत्युदराचे प्रमाण दर हजार जीवित जन्मामागे २५ पर्यंत कमी करणे. (राज्याचे सदर प्रमाण अनुकमे १३ व २२ इतके आहे.)
३.३ सन २०३० पर्यंत एडस , क्षयरोग, मलेरिया आणी दुलर्क्षित असणारे उष्णकटिबंधीय रोगांचा फैलाव थांबविणे आणी काविळ (हिपॅटायटिस), पाण्यामुळे पसरणारे रोग व इतर संसर्गजन्य रोगांशी मुकाबला करणे.
३.४ सन २०३० पर्यंत प्रतिबंध व उपचार आणी मानसिक आरोग्य व क्षेमकुशलता यावर भर देऊन असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे अकाली मृत्युचे प्रमाण एक तृतीयांशपर्यंत कमी करणे.
३.५ अंमली औषधी द्रव्यांचा दुरुपयोग आणी अल्कोहोलचा घातक वापर यासारख्या अंमली पदार्थाच्या वापरास प्रतिबंध करण्याचा व त्यावर उपचार करण्याच्या उपाययोजनांना बळकट करणे.
३.६ सन २०२० पर्यंत रस्ते अपघातांमुळे होणा-या दुखापती आणी मृत्यु यांचे जागतिक प्रमाण निम्म्याने कमी करणे.
३.७ सन २०३० पर्यंत लैंगिक आणी प्रजोत्पादनविषयक आरोग्य सेवेबरोबरच कुटुंब नियोजन , माहिती व शिक्षण मिळण्याची सुनिश्चिती करणे आणी प्रजोत्पादन आरोग्याचा राष्ट्रीय ध्येयधोरणे व कार्यक्रमांमध्ये अंतर्भाव करणे.
३.८ वित्तीय जोखीम संरक्षणासह आरोग्यसेवेचे सार्वञिकीकरण साध्य करणे , दर्जेदार अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळणे आणी सर्वांना सुरक्षित, प्रभावी, गुणवत्तापुर्ण व परवडण्याजोगी अत्यावश्यक औषधे व लसी मिळणे.
३.९ सन २०३० पर्यंत , घातक रसायने तसेच हवा, जल व मृद प्रदुषण यापासून होणारे मृत्यु व आजार मोठया प्रमाणात कमी करणे.
३.अ. योग्य असेल त्याप्रमाणे , सर्व देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखू नियंञणाबाबतच्या आराखडयाची अधिक सक्षमपणे अंमलबजावणी करणे.
३.ब. प्रामुख्याने , विकसनशिल देशांना भेडसावणा-या संसर्गजन्य आणी असंसर्गजन्य रोगांवरील लसी व औषधे यांचे संशोधन व विकास करण्यासाठी सहाय्य करणे. ज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षण करण्यासाठीच्या लवचिकतेच्या संबंधात बौध्दिक मालमत्ता हक्काच्या व्यापाराशी सबंधित आणी सार्वजनिक असलेल्या पैलूंच्या संबंधातील करारातील संपूर्ण तरतुदींचा वापर करण्याच्या विकसनशिल देशांच्या हक्कास मान्यता दिलेली आहे. अशा ट्रीप्स करारानुसार आरोग्य यासबंधात दोहा घोषणापत्रानुसार परवडण्याजोगी अत्यावश्यक औषधे व लसी पुरविणे आणी विशेषत: सर्वांसाठी औषधे पुरविणे.
३.क. विकसनशिल देशांमध्ये विशेषत : कमीत कमी विकसीत देशांमध्ये आणी छोटे व्दिपकल्प असलेल्या विकसनशील राज्यामध्ये, आरोग्यासबंधिच्या वित्तपुरवठयात भरीव वाढ करणे व तसेच आरोग्यविषयक मनुष्यबळाची नेमणुक करणे, त्यांना प्रशिक्षण देणे व ते आरोग्यसेवेत टिकून राहतील याकडे लक्ष देणे.
यातील ध्येय क्रमांक ३.५ , ३.६, ३.९ व ३ ब ही प्रदूषण नियंत्रण महामंडळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, गृह विभाग व या विभागांशी संबंधित आहेत.