पॅलिएटिव्‍ह केअर

दिर्घ काळापासून किंवा मोठया आजाराने ञस्‍त रुग्‍णांचे जीवनमान सुधारण्‍यासाठी, तसेच कुटुंबाचे ञास कमी करण्‍यासाठी अनेक व्‍यवसायिकांना एकञ येऊन घेतलेली काळजी म्‍हणजे पॅलिएटिव्‍ह केअर. दिर्घ काळ असणारे व शारिरीक अपंगत्‍व आणणा-या व्‍याधी ञासदायक असतात. शारिरीक समस्‍या सोबतच सामाजिक, भावनिक, आर्थिक आणि अध्‍यात्मिक ञासांना सुध्‍दा सामोरे जावे लागते. पॅलिएटिव्‍ह केअर मध्‍ये मुख्‍यतः आयुष्‍याच्‍या शेवटच्‍या टप्‍यात व कधीच बरे न होणा़या रुग्‍णांचा समावेश होतो. या रुग्‍णांना उपचारात्‍मक चिकित्‍सा उपयोगाची नसून केवळ वेदना व लक्षणे कमी करणारी चिकित्‍साच उपयुक्‍त असते. पॅलिएटिव्‍ह केअर कॅन्‍सर, पक्षाघात, एचआव्‍ही/एडस औषधाने न बरे होणारे क्षयरोग, मतिमंद मुले, वृध्‍दपकाळाने अपंगत्‍व आलेले किडनी विकार, लिव्‍हर विकारग्रस्‍त इ. रुग्‍णांना दिली जाते.

पॅलिएटिव्‍ह केअरचा उददेश

गुणपूर्वक जीवन-

  • रुग्‍णांना दुखण्‍यापासून व ञासदायक लक्षणापासून आराम देण्‍यात मदत करणे.
  • रुग्‍णांच्‍या मानसिक, सामाजिक, आत्मिकगरजांवर लक्ष केंद्रित करणे व त्‍या गरजापूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न किंवाव त्‍यासाठी लागणारे मदत करणे.
  • प्रत्‍येक प्रयत्‍न रुग्‍णांना आपले जीवन नैसर्गिक पध्‍दतीने जगावे यासाठी प्रयत्‍नशील असावा.
  • आजारपणात लढण्‍यासाठी रुग्‍ण व त्‍याचे कुटुंबीय यांचे मनोबल वाढवणे.
  • रुग्‍णांच्‍या नातेवाईकांना रुग्‍णांच्‍या आजारापणात तसेच मुत्‍युनंतरही सर्वेतोपरी मदत करणे.

ञासापासून आराम देणे-

  • या आजारावर काहीञासदायक लक्षणे असतात की ज्‍यामुळे रुग्‍णांना चांगल्‍या प्रकारचे जीवन जगणे ञासाचे होते हि लक्षणे –
    • प्रत्‍यक रुग्‍णामध्‍ये वेगवेगळे असू शकतात.
    • आजार ज्‍या प्रकारचे आहे त्‍यावरही ञास अवलंबून असतो.
    • रुग्‍णाला कोणत्‍या प्रकारचा औषधोपचार मिळाला यावरही अवलंबून असतो.

पॅलिएटिव्‍ह प्रकल्‍पांतर्गत उपलब्‍ध सुविधा

  • रुग्‍णाला व नातेवाईकांना औषधाची पूर्ण माहिती देणे. जसे औषधी कधी व किती माञात घ्‍यायच्‍या.
  • रुग्‍णांच्‍या नातेवाईकांना जखमेच्‍या मलमपटटीची माहिती देणे व मलमपटटी करणे शिकविणे. जेणेकरुन घरी राहून सुध्‍दा रुग्‍णाची काळजी घेता येऊ श्‍केल.
  • रुग्‍णासाठी आवश्‍यक संतुलित आहार, आहार देण्‍याच्‍या पध्‍दती, शारिरीक स्‍वच्‍छता ठेवण्‍याबाबतची माहिती देणे.
  • रुग्‍णांच्‍या नातेवाईकांना मलाशेय व मुञाशयाची काळजी घ्‍यायला शिकविणे.
  • आजाराबददलच्‍या शंकाचे व चुकीच्‍या कल्‍पनेचे निरसन करणे.
  • समुपदेशक मार्फत योग्‍य मानिसक आधार व सल्‍ला देणे.