रुग्ण सेवा केंद्र

राज्यातील परिचर्या प्रशिक्षण विद्यालये व परिचर्या संवर्गाची स्थापना करण्यासाठी कार्यरत असणारा राज्य परिचर्या विभाग २००७ पर्यंत प्रादेशिक उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करीत होता. हळू हळू तो आरोग्य सेवा संचालानालाय्च्या अधिपत्याखाली आणण्यात आला. प्रादेशिक उपसंचालकांना कर्मचारी परिचारिका, प्रभारी परिचारिका, व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेत एएनएम व एलएचव्ही स्थापन करण्यासाठी विभाग मार्गदर्शन करतो.

  • आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधीन परिचारिकांच्या प्रशासकीय बाबी हाताळणे
  • परिचारिकांच्या संघटनांशी त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविणे
  • प्रत्येक जिल्ह्यात एएनएम व एलएचव्ही परिचारिका विद्यालय स्थापन करणे
  • परिचर्या देखभालीच्या गुणवत्तेत सुधारणा व ज्ञान वाढविण्यासाठी परिचारिकांना सेवांतर्गत प्रशिक्षण व उच्च शिक्षण देणे.
  • समाजाभिमुख आरोग्य सेवा देणे
  • विविध प्रशिक्षणे देणे

प्रादेशिक उपसंचालक, नागरी शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्याचं परिचारिका संवर्ग स्थापन करण्यासाठी बैठका व संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थाना भेटी देण्याच्या मार्गाने मार्गदर्शन करणे.

प्रादेशिक उपसंचालक, नागरी शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्याचं परिचारिका संवर्ग स्थापन करण्यासाठी बैठका व संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थाना भेटी देण्याच्या मार्गाने मार्गदर्शन करणे.

  • अस्तित्वात असलेल्या परिचर्या विद्यालये चालविणे :-
  • प्रवेश प्रक्रिया
  • परिचर्या विद्यालयांसाठी अर्थसंकल्पात तरतूद
  • परिचर्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणे
  • परिचर्या विद्यालयांच्या आर्थिक, भौतिक व प्रशासकीय समस्या
  • परिचर्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी व समस्या
  • नवीन परिचर्या विद्यालये सुरु करणे / जागा निर्माण करणे / अर्थसंकल्प / पुरवणी मागण्या / बांधकाम / वाहन.
  • परिचर्या विद्यालयांच्या , राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या निधीची व्यवस्था.
  • परिचारिकांची स्थापना, भरतीचे नियम, प्रतिनियुक्ती, उच्च शिक्षण, अभ्यास रजा, प्रत्यावर्तन, न्यायालयीन प्रकरणे, लोकायुक्त, माहितीचा अधिकार व अन्य सेवा बाबी
  • सेवांतर्गत प्रशिक्षण / राज्य परिचारिका प्रशिक्षण धोरणाचे नियोजन करणे
  • परिचारिकांच्या संघटनांशी त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविणे , तिमाही बैठका घेणे

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील परिचर्या विद्यालये :-
A)सध्या साचालानालायाच्या अधिपत्याखालील नागरी रुग्णालये व जिल्हा महिला रुग्णालयाशी संलग्न खालील परिचर्या विद्यालये कार्यरत आहेत.

अ क्र. संस्थेचे नाव एकूण
एएनएम २८
जीएनएम १४
एलएचव्ही
पीएचएन

B) परिचर्या विद्यालयांची जिल्हावार यादी

अ क्र विद्यालयाचे नाव एएनएम जीएनएम एलएचव्ही पीएचएन
ठाणे व्ही एच रुग्णालय
कामा व एएलबी मुंबई
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे (औंध)
सातारा
कोल्हापूर
नासिक
१० धुळे
११ जळगाव
१२ अहमदनगर
१३ औरंगाबाद
१४ जालना
१५ परभणी
१६ लातूर
१७ बीड
१८ नांदेड
१९ उस्मानाबाद
२० अकोला
२१ अमरावती
२२ अमरावती (D.H.W.)
२३ यवतमाळ
२४ बुलढाणा
२५ नागपूर
२६ पी. एच. एन. शाळा नागपूर
२७ वर्धा
२८ भंडारा
२९ चंद्रपूर
३० गडचिरोली
  एकूण २८ १४

टीप :-

  • सर्व एएनएम व जीएनएम संस्थांची प्रवेश क्षमता प्रत्येकी २० आहे.
  • सर्व एलएचव्ही संस्थांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ५० आहे ( कोल्हापूर मध्ये ती २५ आहे)
  • पीएचएन संस्थांची प्रवेश क्षमता ३० आहे

C) १० परिचर्या विद्यालये (६ एएनएम व ४ जीएनएम मराठवाडा ) विकास प्रकल्पाखाली मंजूर करण्यात आली आहेत. :-

अनु क्र . जिल्ह्याचे नाव एएनएम जीएनएम
लातूर
बीड
अंबेजोगाई बीड
नांदेड
उस्मानाबाद
औरंगाबाद
जालना
परभणी
हिंगोली
१० एकूण

D) कोकण विकास प्रकल्पा अंतर्गत ३ जीएनएम विद्यालये ( रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे ) सुरु करण्यात आली आहेत.

E)नासिक विकास प्रकल्पा अंतर्गत ४ परिचर्या विद्यालये (२ जीएनएम व २ अएनएम ) सुरु करण्यात आली आहेत. :-

अनु क्र . जिल्ह्याचे नाव एएनएम जीएनएम
नासिक (मालेगाव)
नंदुरबार
एकूण

F) मराठवाडा, कोकण व नासिक विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत मंजूर विद्यालयांसाठी शासनाने शैक्षणिक व बिगर शैक्षणिक पदे मंजूर केली आहेत. ६ एएनएम विद्यालयांसाठी प्रत्येकी १० अशी ६० पदे व ११ जीएनएम विद्यालयांसाठी प्रत्येकी २५ अशी २८६ पदे (एकूण ३४६ पदे) डी २.२.२०११ च्या शासकीय आदेशाद्वारे मंजूर करण्यात आली आहेत. स्वयंपाकी, साफसफाई, सुरक्षा व चालक सेवाश्साठी सुद्धा १२.९.२०११ च्या शासकीय आदेशानुसार पदे मंजूर करण्यात आली आहेत.

G) सर्व परिचर्या विद्यालयांची सारांश :-

अनु क्र अभ्यासक्रमाचे नाव सध्या कार्यरत विकास प्रकल्प व केंद्र सरकार द्वारा मंजूर विद्यालये व्हिजन २०२० अंतर्गत सुरु करण्यात येणारी विद्यालये केंद्र सरकारला सादर केलेली पण अद्याप मंजूर न झालेले प्रस्ताव
एएनएम २८ १(गोंदिया )
जीएनएम १४ १(गोंदिया
एलएचव्ही
पी एचएन
बालरोग परिचर्या २ (गोंदिया व नागपूर )
मानसिक रोग परिचर्या २ (ठाणे व पुणे)
मुलभूत बी.एससी परिचर्या महाविद्यालये १(जालना ) २( नासिक व नागपूर)
अनु कर. परिचर्या संवर्गाचे नाव मंजूर भरलेली रिक्त
अधिसेविका वर्ग ३ २८ १८
सहायक अधिसेविका १२७ ८४ ४३
शिक्षक १८८ १३४ ५४
सार्वजनिक आरोग्य परिचर्या अध्यापक ११
सार्वजनिक आरोग्य परिचारिका २३५ १५६ ७९
मानसोपचार परिचारिका १३१ ७१ ६०
बालरोग परिचारिका ९८ ४८ ५०
प्रभारी परिचारिका १०४९ ७३४ ३११
कर्मचारी परीच्रिका ८२२४ ७५६० ६९७
१० महिला आरोग्य विक्षक २१६६ १८१६ ३५०
११ सहाय्यकारी परिचारिका सुईण १२४१३ ११८४० ५६३
  एकूण २४६७० २२४६७ २२२१

सध्या राज्य व केंद्र सरकारला सादर करण्यात आलेले प्रस्ताव पुढील प्रमाणे आहेत :

अ ) परिचारिका सेवांमध्ये सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारला सादर झालेले प्रस्ताव:-

  • ११व्या पंचवार्षिक योजनेत २७ एएनएम व ११ जीएनएम विद्यालये बळकटीकरणा साठी भारत सरकारकडे रु ६३६.९८ लाख रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत. त्या निधी पैकी लातूर व कोल्हापूर जिल्ह्यातील परिचर्या विद्यालयांसाठी रु २५.०० लाख देण्यात आले आहेत.
  • ११व्या पंचवार्षिक योजनेत परिचारिकांची निरंतर कौशल्ये वृद्धीत होण्यासाठी रु १९.३३ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत त्यापैकी रु ८.२६ लाखाचा निधी प्राप्त झालं आहे.
  • नासिक जिल्ह्यासाठी एम. एससी. परिचर्या व मुलभूतोत्तर बी. एससी.परिचर्या अभ्यासक्रम व नागपूर जिल्ह्यात येथे मुलभूतोत्तर बी. एससी.परिचर्या अभ्यासक्रम सुरू करण्यासाटी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
  • नासिक व नागपूर जिल्ह्यांमध्ये मुलभूत परिचर्या विद्यालय स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
  • गोंदिया जिल्ह्या मध्ये एएनएम व जीएनएम विद्यालय स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत

ब ) परिचारिका सेवांमध्ये सुधारणा होण्यासाठी राज्य सरकारला सादर झालेले प्रस्ताव:-

  • एएनएम व एलएचव्ही मधील पदे पुनर्निर्मित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • एएनएम मध्ये त्रिस्तरीय पदोन्नती साठी प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • सहाव्या वित्त आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • परिचारिकांना विविध भत्ते देण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून वाढवून ६० करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • सर्व परिचारिका विद्यालयांसाठी प्राचार्य व उपप्रचार्यांची पदे निर्माण करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • नव्याने सुरु करण्यात आलेल्या परिचर्या विद्यालयांमध्ये विद्या वेतन देण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • जीएनएम आंतरवासी विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु २०००/- विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • पुणे, सिंधुदुर्ग, व जालना येथे एएनएम विद्यालयांमध्ये पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
  • परिचारिकांच्या सेवा पुढे सुरु ठेवण्याचा प्रस्ताव
  • परिचारिका संवर्गाच्या सध्याच्या भरती नियमावली मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव.
  • मराठवाडा विकास प्रकल्पांतर्गत २ एएनएम व ४ जीएनएम विद्यालये सुरु करण्यात आली आहेत.
  • मराठवाडा विकास प्रकल्पांतर्गत परिचर्या विद्यालयांसाठी ६ वाहने घेण्यात आली आहेत.
  • ८८ परिचारिकांना उच्च शिक्षणासाठी प्रतिनियुक्त करण्यात आले आहे.
  • दरवर्षी १२ मे ह्या फ्लोरेंस नायटिंगेल यांच्या जन्मदिवस प्रसंगी केंद्र सरकार तर्फे राष्ट्रीय फ्लोरेंस नायटिंगेल पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
  • भारत सरकार कडून नवीन परिचर्या विद्यालये सुरु करण्यासाठी रु. ४२.५३ कोटीचा निधी प्राप्त झालं आहे.
  • भारत सरकार कडून लातूर व कोल्हापूर जिल्ह्यातील परिचर्या विद्यालये मजबुतीकरणासाठी रु २५.०० निधी प्राप्त झालं आहे.
  • भारत सरकार कडून परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी रु ८.२६ लाखांचा निधी प्राप्त झालं आहे.