शिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना.

महाराष्ट्रा शासनाने गरीब कुटुंबातील जीवघेण्या आजारांच्या उपचारांसाठी १९९७ मध्ये जीवनदायी योजना सुरु केली. आजारांचे उपचार, सेवा मिळण्यातील सुगमता, आणि लाभार्थ्याने स्वतःच्या खिशातून करावयाचा खर्च हे सर्वच चिंतेचे विषय होते. म्हणूनच महराष्ट्र शासनाने २ जुलै २०१२ रोजी दारिद्र्य रेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) व दारिद्र्या रेषेवरील (केशरी शिधा पत्रिका धारक ) कुटुंबांना तसेच अंत्योदय व अन्नपूर्णा पत्रिका धारकांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सेवकांच्या जाळ्याद्वारे शल्यक्रिया किंवा उपचारांची किंवा सल्लामसलतीची गरज असणाऱ्या व विशेष सेवांसाठी रुग्णालयात भरती होण्याची गरज असणाऱ्या आजारांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना टप्प्याटप्प्यात राज्यात तीन वर्षांसाठी राबविली जाईल. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील पहिल्या टप्प्यातील ८ जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थी कुटुंबांसाठी आरोग्य विमा पॉलिसी सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू राहील (पहिला टप्पा). पहिल्या टप्प्यामध्ये गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे असतील. पोलिसीची मुदत पुनरावलोकन करून त्याचे एक वार्षिक तत्वावर अनुभवाची व पालनाबाबतच्या गुणवत्तेनुसार नुतनीकरण करण्यात येईल.

पहिल्या टप्प्या मध्ये ३० विशेष सेवा वर्गातील ९७२ प्रक्रिया व १२१ पाठपुरावा प्रक्रिया यांचा समावेश असेल. ह्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी स्थापन केली आहे. ही योजना आरोग्य विम्याच्या क्षेत्रामध्ये गरीब रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून ठराविक रोगांसाठी बिगररोख सेवा देण्यासाठी शासन व खासगी क्षेत्रातील सेवा पुरवठादारांच्या जाळ्यातून उभी राहिलेली सार्वजनिक – खासगी क्षेत्रातील अद्वितीय प्रारूप आहे. जर लाभार्थ्याला आरोग्य पत्रिका मिळाली नसेल तर वैध शिधा पत्रिका दाखवून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील नामिका प्रविष्ट रुग्णालयातून मोफत उपचार मिळतील.

उद्देश :

दारिद्र्य रेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) व दारिद्र्या रेषेवरील (केशरी शिधा पत्रिका धारक ) कुटुंबांना तसेच अंत्योदय व अन्नपूर्णा पत्रिका धारकांना (नागरी पुरवठा विभागाने परिभाषित केलेले पांढऱ्या शिधा पत्रिका धारक वगळून ) शल्यक्रिया किंवा उपचारांची किंवा सल्लामसलतीची गरज असणाऱ्या व विशेष सेवांसाठी रुग्णालयात भरती होण्याची गरज असणाऱ्या आजारांसाठी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सेवकांच्या जाळ्याद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविणे

लाभाचे स्वरूप :

ह्या योजनेत खालील ३० विशेष सेवा वर्गातील १२१ पाठपुरावा प्रक्रीयांसोबत ९७२ शल्यक्रिया / उपचार / प्रक्रियांबाबत सेवा देण्यात येईल:

 • सर्वसाधारण शल्यक्रिया
 • कान नाक घसा शल्यक्रिया
 • नेत्ररोग शल्यक्रिया शल्यक्रिया
 • स्त्री रोग व प्रसूतिशस्त्र
 • अस्थिरोग शल्यक्रिया व प्रक्रिया
 • पोट व जठर शल्यक्रिया
 • हृदय व हृदय शल्य क्रिया
 • बालरोग शल्यक्रिया
 • प्रजनन व मूत्र रोग शल्यक्रिया
 • मज्जातंतूविकृती शास्त्र
 • कर्करोग शल्यक्रिया
 • वैद्यकीय कर्करोग उपचार
 • विकिकरण कर्करोग
 • प्लास्टिक शल्यक्रिया
 • जळीत
 • बहु ट्रॉमा
 • प्रोस्थेसीस
 • जोखिमी देखभाल
 • सामान्य वैद्यक
 • संसर्ग जन्य रोग
 • बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
 • हृदयरोग
 • नेफ्रोलोजी
 • चेतनाविकृती शास्त्र
 • कफक्षय शास्त्र
 • चर्मरोग चिकित्सा
 • सांधे उपचार शास्त्र
 • ENDOCRINOLOGY
 • पोट व जठर विकार शास्त्र
 • अंतरागमनिय विकिकरण शास्त्र

लाभार्थी कुटुंबे

ज्या कुटुंबांकडे पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना पत्रिका, अन्नपूर्णा पत्रिका ब आठ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर. पांढरी शिधा पत्रिका धारण करणाऱ्या कुटुंबाना ह्या योजनेत समाविष्ट केलेले नाही. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या “आरोग्य कार्डाच्या “ आह्दरे किंवा नागरी पुरवठा विभागाने जारी केलेल्या पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकांच्या आधारे ओळख पटविली जाईल. एकूण २०४३०५२७ लाभार्थी कुटुंबे असतील. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ह्या आठ जिल्ह्यातील ४९ लाख कुटुंबे या योजनेत समाविष्ट करावयाची आहेत.

आरोग्य कार्डे :

येणाऱ्या काळात सर्व पात्र कुटुंबांना आरोग्य कार्डे पुरविली जातील. योजनेखालील लाभार्थी कुटुंबांची ओळख पटविण्यासाठी ह्या आरोग्य कार्डांचा उपयोग केला जाईल. वैध पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकांची आधार क्रमांकाशी सांगड घालून व त्यातील माहितीचा उपयोग करून कौटुंबिक आरोग्य कार्डे जारी केली जातील. रुग्णाचे नाव व छायाचित्र कोरिलेट करण्यासाठी एक तात्पुरता उपाय म्हणून आरोग्य कार्डे जारी होईपर्यंत आधार क्रमांका सोबत वैध केशरी / पिवळी शिधा पत्रिका व जर आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास शासकीय अभिकरणाने जारी केलेले छायाचित्रांसहित ओळखपत्र (वाहन चालविण्याचे अनुज्ञप्ती पत्र, मतदार ओळखपत्र) यास मान्यता दिली जाईल.