कॉलरा नियंत्रण कार्यक्रम

 

प्रस्‍तावना

प्रस्‍तावना – पटकी (कॉलरा) हा दुषित पाण्‍यामुळे पसरणारा पसरणारा एक जलजन्‍य आजार आहे. या आजाराचा अधिशयन कालावधी अत्‍यल्‍प असल्‍याने कॉलराची साथ अत्‍यंत वेगाने पसरु शकते. इतर कोणत्‍याही जलजन्‍य आजाराच्‍या तुलनेत कॉलरा आजारामध्‍ये मृत्‍यूचे प्रमाण अधिक असते. व्‍हीब्रीओ कॉलरा ओ- १, व्‍हीब्रीओ कॉलरा नॉन ओ- १(एल टॉर), व्‍हीब्रीओ कॉलरा ओ १३९ या जिवाणूमूळे हा रोग होतो. जुलाब व उलटया हे या रोगाची प्रमुख लक्षणे असुन योग्‍य उपचाराअभावी जलशुष्‍कता होवून रुग्‍णाचा मृत्‍यू होतो.

उदिष्टो व अंमलबजावणी

पटकी रोगाचा प्रादुर्भाव अधिकाधिक कमी करुन तो सार्वजनिक आरोग्‍याचा प्रश्‍न राहणार नाही. हे उदिष्‍ट प्राप्‍त होण्‍याकरिता लागणग्रस्‍त भागाचे सर्वेक्षण तसेच लागणग्रस्‍त भागाचे आजूबाजूचे सर्वेक्षण, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियमितमणे निर्जंतुकीकरण व रोगाचे निदान त्‍वरीत होण्‍याच्‍या दृष्‍टीने साथीनंतर रुग्‍णांवर सत्‍वर औषधोपचार, सहवासितांवर औषधोपचार, आरोगय शिक्षण इतयादी उपाययोजना करण्‍यात येतात.