राष्ट्रीय नारु निर्मूलन कार्यक्रम

 

प्रस्‍तावना

नारु हा रोग फार वर्षापासून अस्तित्‍वात आहे. हा रोग एक प्रकाराच्‍या कृमीमुळे (ड्रॅकॅनक्‍यूलस मेडिनेनसिस) होतो. सायक्‍लॉप्‍स या किटकामार्फत व पाण्‍याच्‍या माध्‍यमाव्‍दारे या रोगाचा प्रसार होतो. भारताप्रमाणे इतर देशामध्‍येही उदा. आफ्रिका, सुदान, अफगाणिस्तान, इजिप्‍त, ब्रम्‍हदेश, इराक, वेस्‍टइंडिज व दक्षिण अमेरिका इत्‍यादि देशात नारुचे रुग्‍ण आढळून येत होते. भारतात नारु रुग्‍ण कर्नाटक, राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, महाराष्‍ट्र, गुजरात या राज्‍यात आढळून येत होते. सन १९८० या साली महाराष्‍ट्र राज्‍यात केलेल्‍या सर्वेक्षणात एकूण ३० जिल्‍हयांपैकी १७ जिल्‍हयात नारुचे रुग्‍ण आढळून आले हाते. मात्र सन १९९१ नंतर महाराष्‍ट्रात एकही स्‍थानिक नारु रुग्‍ण आढळला नाही. त्‍यामूळे दिनांक ०१/०१/१९९४ पासून महाराष्‍ट्र राज्‍य हे नारु मुक्‍त झाले आहे. तथापी वर्षातून १ वेळ सर्वेक्षण करणे व आरोग्‍य शिक्षण देणे आवश्‍यक आहे.

उदिदष्‍ट

जागतिक आरोग्‍य संघटनेने भारत देश नारु मुक्‍त झाल्‍याचे फेब्रुवारी २००० मध्‍ये घोषित केले असले तरी जगातील काही देशांमध्‍ये अद्यापही नारुचे रुग्‍ण्‍ आढळून येत असल्‍यामुळे नियमित नारु सर्वेक्षण करुन नव्‍याने नारु रोगाचा प्रसार होण्‍यास प्रतिबंध करणे

उपलब्‍ध यंत्रणा

राज्‍यातील विविध आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये असलेल्‍या नियमित मनुष्‍यबळामार्फत सदर कार्यक्रम राबविण्‍यात येतो.राज्‍यात मागील २० वर्षात नारुचा एकही रुग्‍ण आढळून आलेला नाही.