काविळ A आणि E

 
काविळ A आणि E

 

Description

चिञाखालील माहिती हीपाटायटीस ए व ई या प्रकारामुळे होणारी काविळ दुषीत अन्‍न पाण्‍यामुळे पसरते. अलिकडील काही काळात राज्‍यात मुख्‍यत्‍वे हीपाटायटीस ई विषाणू मुळे होणारे साथ उद्रेक आढळून आले आहेत.
आजाराचा प्रकार जलजन्‍य आजार
बोली भाषेतील नाव काविळ
आजाराचे वर्णन काविळ हा “हिपॅटायटिस” विषाणूमुळे होणारा यकृताचा तीव्र आजार आहे. या आजारात काविळीच्‍या विषाणू संसर्गा मुळे यकृताला सूज येते.
आजारावर परिणाम करणारे घटक महाराष्‍ट्रात बहूतेक काविळीचे उद्रेक हे हीपाटायटीस ई विषाणू मुळे होतात. शहरी भागातुनही तुरळक स्‍वरुपात रुग्‍ण आढळतात. पाणी पूरवठा वाहिन्‍या शैाच्‍यामुळे प्रदुषीत झाल्‍यामुळे हे उद्रेक होतात. काविळीचे बी, सी आणि डी हे विषाणू रक्‍तावाटे तसेच लैंगिक संबंधातून पसरतात.
अधिशयन कालावधी
काविळ ए काविळ ई
अधिशयन कालावधी १५ ते ४५ दिवस १५ ते ६० दिवस
रोगलक्ष्‍ाणे
  • ताप येणे
  •  भूक न लागणे
  •  पोटात दुखणे
  •  उलटया होणे
  •  अशक्‍तपणा
  • लघवी पिवळी होणे
  • डोळे पिवळे होणे
रोग निदान हीपाटायटीस ए व ई या दोन्‍ही प्रकारांचे प्रयोगशालेय निदान एलायझा तसेच इतर अनेक चाचण्‍यांव्‍दारे करता येते.
उपचार विषाणूजन्‍य काविळीवर निश्चित असा कोणताही औषधोपचार नाही
  • रुग्‍णास पूर्ण विश्रांतीचा सल्‍ला
  • कर्बोदके असलेल्‍या पदार्थांचे सेवन करणे.
  • वैद्यकिय अधिका़-यांच्‍या सल्‍यानुसार औषधोपचार.
  • प्रतिबंधात्‍मक उपाय
    • नियमित पाणी शुध्‍दीकरण
    • मानवी विष्‍ठा व सांडपाण्‍याची योग्‍य विल्‍हेवाट
    • परिसर स्‍वच्‍छता
    • वैयक्तिक स्‍वच्‍छता
    • हीपाटायटीस ए या आजारा विरुध्‍द प्रतिबंधात्‍मक लस उपलब्‍ध आहे.