गोवर

 
गोवर


 

प्रस्तावना

गोवर ही विषाणूमुळे होणारा अत्‍यंत संसर्गजन्‍य रोग असून त्‍याचे जंतु बाधित व्‍यक्‍तीच्‍या नाका तोंडात तसेच घशात आढळतात. जंतु संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीस ताप, खोकला व अंगावरील पसरत चाललेले लाल पुरळ यामुळे अतिसार व न्‍युमोनिया यांची दुय्यम बाधा होऊन मृत्‍यु ओढवू शकतो.

रोगलक्षणे

ताप व अंगावरील पुरळ, सर्दी, खोकला व लालसर डोळे

रोगप्रसार

जंतुबाधा झालेल्‍या व्‍यक्तीच्‍या खोकल्‍यातुन व शिंकेव्‍दारे गोवराचा विषाणू श्‍वसन मार्गातून सुक्ष्‍म थेंबाच्‍या स्‍वरुपात बाहेर पडतो. व हवेमार्फत पसरतो.

रोगप्रतिबंधक

लसीकरणाच्‍या वेळापञकानुसार गोवराचे लसीकरण हा रोग टाळण्‍याचा प्रभावी मार्ग आहे.