डांग्या खोकला

 
डांग्या खोकला


 

प्रस्तावना

डांग्‍या खोकला म्‍हणून ओळखला जाणारा श्‍वसनमार्गाचा आजार हा अत्‍यंत संसर्गिक आजार असून तो Bordetella Pertussis या जीवाणूमुळे होतो. काही रुग्‍णांमध्‍ये यामुळे वारंवार खोकला येऊन गिळलेला खाकरा व स्‍ञाव फुफुसात जावून मृत्‍यु ओढवू शकतो.

रोग लक्षणे

  • वारंवार येणारा भयंकर खोकला तसेच खाली पैकी कोणतेही एक लक्षण
  • दोन किंवा अधिक आठवडयांपेक्षा जास्‍त कालावधीचा खोकला
  • खोकल्‍याची तीव्र उबळ
  • खोकल्‍यांतरची उलटी
  • मोठया अर्भकामधील खोकल्‍याची विशिष्‍ट उबळ

रोगप्रसार

डांग्‍या खोकल्‍याचा जीवाणू रुग्‍णाच्‍या नाकातोंडात राहतात आणि खोकल्‍यातून व शिंकेव्‍दारे हवेतून सहजपणे पसरतात.

रोगप्रतिबंध

लसीकरणाच्‍या वेळापञकानुसार दिलेले डीपीटी लसीकरण डांग्‍या खोकल्‍याचा प्रतिबंध करते.