|
चिञाखालील माहिती |
हीपाटायटीस ए व ई या प्रकारामुळे होणारी काविळ दुषीत अन्न पाण्यामुळे पसरते. अलिकडील काही काळात राज्यात मुख्यत्वे हीपाटायटीस ई विषाणू मुळे होणारे साथ उद्रेक आढळून आले आहेत. |
आजाराचा प्रकार |
जलजन्य आजार |
बोली भाषेतील नाव |
काविळ |
आजाराचे वर्णन |
काविळ हा “हिपॅटायटिस” विषाणूमुळे होणारा यकृताचा तीव्र आजार आहे. या आजारात काविळीच्या विषाणू संसर्गा मुळे यकृताला सूज येते. |
आजारावर परिणाम करणारे घटक |
महाराष्ट्रात बहूतेक काविळीचे उद्रेक हे हीपाटायटीस ई विषाणू मुळे होतात. शहरी भागातुनही तुरळक स्वरुपात रुग्ण आढळतात. पाणी पूरवठा वाहिन्या शैाच्यामुळे प्रदुषीत झाल्यामुळे हे उद्रेक होतात. काविळीचे बी, सी आणि डी हे विषाणू रक्तावाटे तसेच लैंगिक संबंधातून पसरतात. |
अधिशयन कालावधी |
|
काविळ ए |
काविळ ई |
अधिशयन कालावधी |
१५ ते ४५ दिवस |
१५ ते ६० दिवस |
|
रोगलक्ष्ाणे |
- ताप येणे
- भूक न लागणे
- पोटात दुखणे
- उलटया होणे
- अशक्तपणा
- लघवी पिवळी होणे
- डोळे पिवळे होणे
|
रोग निदान |
हीपाटायटीस ए व ई या दोन्ही प्रकारांचे प्रयोगशालेय निदान एलायझा तसेच इतर अनेक चाचण्यांव्दारे करता येते. |
उपचार |
विषाणूजन्य काविळीवर निश्चित असा कोणताही औषधोपचार नाही
रुग्णास पूर्ण विश्रांतीचा सल्ला
कर्बोदके असलेल्या पदार्थांचे सेवन करणे.
वैद्यकिय अधिका़-यांच्या सल्यानुसार औषधोपचार.
|
प्रतिबंधात्मक उपाय |
- नियमित पाणी शुध्दीकरण
- मानवी विष्ठा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट
- परिसर स्वच्छता
- वैयक्तिक स्वच्छता
- हीपाटायटीस ए या आजारा विरुध्द प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे.
|
|