|
|
|
उलटीसह अथवा उलटीशिवाय अचानक सुरु झालेले जुलाब
|
व्हीब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतडयाला संसर्ग झाल्याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयामधील स्ञी पुरुषांमध्ये आढळतो. रुग्णांच्या विष्ठेचा पाण्याच्या स्ञोतांशी संपर्क आल्यानंतर हे जंतू पाण्यामध्ये वाढतात. व असे अशुध्द पाणी पिण्यासाठी वा स्वयंपाकासाठी वापरल्यास या आजाराचा प्रसार होतो. मलनिसारणाच्या योग्य पध्दतीच्या अभावामुळे रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याच्या स्ञोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.
|
रुग्णांच्या विष्ठेचा पाण्याच्या स्ञोतांशी संपर्क आल्यानंतर हे जंतू पाण्यामध्ये वाढतात. व असे अशुध्द पाणी पिण्यासाठी वा स्वयंपाकासाठी वापरल्यास या आजाराचा प्रसार होतो. मलनिस्सारणाच्या योग्य पध्दतीच्या अभावामुळे रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याच्या स्ञोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.
|
पटकीचा अधिशयन कालावधी काही तास ते ५ दिवस असा आहे. पटकी रुग्णात खालील लक्षणे आढळतात
- पाण्यासारखे/तांदळाच्या पेजेसारखे वारंवार जुलाब
- उलटया
- हदयाचे ठोके वाढणे
- तोंडाला कोरड पडणे
- तहान लागणे
- स्नायूंमध्ये गोळे येणे
- अस्वस्थ वाटणे
|
- जुलाब-वांत्या चालू आहेत पण जलशुष्कता नाही क्षारसंजीवनीचा वापर करावा, तसेच पेज, सरबत इत्यादि घरगुती पेयांचा वापर करावा.
- जलशुष्कतेची लक्षणे असल्यास – क्षारसंजीवनी व घरगुती पेय द्यावी.
- तीव्र जलशुष्कता असल्यास रुग्णास नजिकच्या प्राथमिक आरोगय केंद्र / ग्रामीण रुगणालय येथे उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्टेट देण्यात यावे.
- झिंक टॅबलेट मुळेअतिसाराचा कालावधी २५ टक्याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाणही घटते.
जलशुष्कता कमी करण्याबरोबर योग्य प्रतिज्यविकांची (अॅन्टीकबायोटिक्स्ची) योग्य माञा (डोस) देण्यात यावी.
|
- शुध्द पाणी पुरवठा
- वैयक्तिक स्वच्छता
- हात नेहमी साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत –
- खाण्यापूर्वी व स्वयंपाकापूर्वी
- बाळाला भरविण्यापूर्वी
- शैाचानंतर
- बाळाची शी धुतल्यानंतर
- जुलाब असलेल्या रुग्णांची सेवा केल्यानंतर
- साबण उपलब्ध नसेल तर आपण आपले हात राखेनेही स्वच्छ करु शेकतो.
- मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट
- रुग्णांवर त्वरित उपचार
- बालकाचे गोवर प्रतिबंधात्मक लसिकरण अतिसाराच्या नियंञणासाठी आवश्यक आहे.
|