राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रम

 

ऐतिहासिक पार्श्वंभुमी

राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रम 1976 सालापासून सुरु करण्‍यांत आला असून अंधत्‍वाचे प्रमाण 2020 पर्यंत 0.3 पर्यंत आणावयाचे आहे. सन 2017 मध्‍ये कार्यक्रमाच्‍या नावात बदल करण्‍यांत आला असून ते राष्‍ट्रीय अंधत्‍व व दृष्‍टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम करण्‍यांत आले आहे. केंद्र शासनामार्फत सन 2015-19 मधील जलद सर्वेक्षणानुसार अंधत्‍वाचे प्रमाण सन २००६-०७  या आर्थिक या वर्षात  1.1 % वरुन सन 2019-20 या आर्थिक 0.36 % इतके झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये नमूद केल्यानुसार सन 2025 पर्यंत अंधत्वाचे प्रमाण हे 0.25% पर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.  मोतिबिंदू शस्‍त्रक्रियेसोबतच डोळयांचे इतर आजारांवर जसे की, काचबिंदू, दृष्‍टीपटल विकार (मधुमेह रेटीनोपॅथी, व्हिट्रोरेटीनाचे आजार) लहान मुलांमधील अंधत्‍वावर उपचार करण्‍यावर देखील लक्ष केंद्रीत करण्‍यात आले आहे.

राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रमसाठी केंद्र शासनाकडून 100 टक्‍के अनुदान देण्‍यात येत होते. सन 2015-16 पासून 60 टक्‍के केंद्राचा वाटा व 40 टक्‍के राज्‍य शासनाचा वाटा याप्रमाणे अनुदान देण्‍यांत येते.

उदिदष्‍टे

  • “डोळयांचे आरोग्‍य सर्वांसाठी”हे उद्दिष्ट साध्‍य करण्यासाठी व्‍यापक सार्वत्रिक नेत्र सेवा देणे.
  • राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रमाचे बळकटीकरण करुन डोळयांच्या आजाराबाबत उच्‍च दर्जाच्‍या सेवा लोकांना देणे
  • निदान वउपचाराद्वारे मोतिबिंदु रुग्‍णांचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी जास्‍तीच्‍या सेवा पुरविणे.
  • राज्‍यातील सर्व जिल्‍हयातील आरोग्‍य संस्‍थांना साधनसामुग्री व तज्ञ व्‍यक्‍तींची नेमणूक करुन रुग्‍णांना सेवा देणे.
  • कार्यक्रमात अशासकीय स्‍वयंसेवी संस्‍थांना व खाजगी डॉक्‍टरांना समाविष्‍ट करुन डोळयांचे आजारावरील सेवा पुरविणे.
  • सामान्‍य जन माणसात डोळयांचे इतर आजार (काचबिंदू, मधुमेह रेटीनोपॅथी, व्हिट्रोरेटीनाचे आजार, लहान मुलांमधील अंधत्‍व ) व त्यावरील उपचारांबाबत आरोग्‍यविषयक शिक्षण देवून जनजागृती करणे व इतर डोळ्यांचे आजारांबाबत मोफत सेवा पुरविणे.
  • शालेय विद्यार्थ्यांचे मोफत नेत्र तपासणी करुन दृष्‍टीदोष शोधुन काढणे .
  • सन 2014-15 पासून 40 + वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींची मोफत नेत्र तपासणी करणे.

प्रमुख ध्‍येय

  • सेवा वितरणाचे बळकटीकरण
  • नेत्र विषयक सेवांसाठी मनुष्‍यबळ विकसीत करणे
  • सामुहीक जनजागृती आणि बाहयसंपर्क उपक्रमांना प्रोत्‍साहन देणे.
  • संस्‍थाची क्षमता वाढविणे

उपक्रम

कार्यक्रमाचे दिशानिर्देशन हे मुख्‍यत्‍वे अंधाचे सर्वेक्षण करणे, मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणे व शालेय विदयार्थ्‍यांची तपासणी करुन दृष्‍टीदोष आढळलेल्‍या विदयार्थ्‍यांना चष्‍मा पुरवठा करणे या करीता केलेले आहे. तसेच ११ व्‍या पंचवार्षिक योजनेमध्‍ये डायबेटीक रेटीनोपॅथी, काचबिंदु व्‍यवस्‍थापन, बुब्‍बुळ प्रत्‍यारोपण, व्हिट्रोरेटायनल सर्जरी व बालपणातील अंधत्‍व यांचा आर्थिक मदतीसाठी समावेश करण्‍यात आला.

आर्थिक तरतुद

राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंञण कार्यक्रम १०० टक्‍के केंद्र पुरस्‍कृत कार्यक्रम आहे.

सेवा

  • मोतिबिंदु शस्त्रक्रियामध्येष मुख्‍यतः कृत्रीम भिंगरोपण (IOL) शस्त्रक्रिया ९५ टक्‍के पेक्षा जास्‍त करणे.
  • मोतिबिंदु शस्त्रक्रिया व्‍यतिरिक्‍त अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍थाना इतर डोळयांचे आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहायता देण्‍यात येते.
  • दृष्टिदोष शोधण्‍यासाठी शालेय विदयार्थ्‍यांची नेञ तपासणी करण्‍यात येते व दृष्‍टीदोष आढळलेल्‍या गरीब विदयार्थ्‍यांना मोफत चष्‍मा पुरव‍ठा केला जातो.
  • बुब्‍ब्‍ुाळ प्रत्‍यारोपणासाठी मृत्‍यु पश्चात दान केलेल्‍या डोळयांचे संकलन करणे
  • सार्वजनीक क्षेञातील नेत्र विषयक सेवांची क्षमता वाढविण्‍यासाठी रुग्‍णांलयांना मदत प्रदान करणे
  • ग्रामीण लोकसंख्‍येसाठी नेत्र सेवा केंद्र बळकटीकरण व विस्‍तृतीकरणासाठी स्‍वयंसेवी संस्‍थाना विना आवर्ती मदत प्रदान करणे.
  • जिल्‍हा रुग्‍णालयात नेत्र शस्त्रक्रियागृह आणि नेत्रकक्षाचे बांधकाम करणे
  • नेत्र सेवा कार्यक्रमात कार्यरत कर्मचा-यांच्‍या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण उपक्रमांचे आयो‍जन करणे
  • प्रादेशिक नेत्र सेवा संस्‍था, वैदयकिय महाविदयालय, जिल्‍हा , उपजिल्‍हा रुग्‍णालय, प्राथमिक आरोग्‍य केंद्र / व्हिजन सेंटर्स यांना पुरवठा केलेल्‍या डोळयांसंबधी उपकरणाचे देखभाल करणे
  • मोतिबिंदु शस्त्रक्रियासाठी अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍थाना प्रती शस्‍ञक्रिया रु१०००/- प्रमाणे अनुदान देण्‍यात येते व शासकीय जिल्हा रुग्णालयाना मोतिबिंदु शस्त्रक्रियासाठी आवश्यक औषधी व साहित्य सामग्री करिता रु .४५०/- प्रमाणे सहाय्यक अनुदान देण्‍यात येते. इतर नेत्र आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करिता अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍थाना खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते,
    • १) मधुमेह रेटीनोपॅथी- १५००/-,
    • २)काचबिंदु उपचार / व्‍यवस्‍थापन-१५००/-,
    • ३) बुब्‍बुळ प्रत्‍यारोपण-५०००/-,
    • ४) व्हिट्रोरेटायनल सर्जरी-५०००/-
    • ५)बालपणातील अंधत्‍व उपचार व व्‍यवस्‍थापक करीता रु.१५००/-अनुदान देण्‍यात येते.
  • नेत्रदान कार्यक्रमांतर्गत कार्यरत अशा सक्रिय स्वञयंसेवी संस्थातना प्रती नेत्र बुब्‍बुळ रु .१०००/- प्रमाणे संकलन व साठा यासाठी नोंदणीकृत नेत्रपेढीला दिले जाते व त्‍यापैकी रु.५००/- प्रती नेत्र बुब्‍बुळ याप्रमाणे नोंदणीकृत नेञ संकलन केंद्राना नेत्र संकलन करण्‍यासाठी नेत्रपेढीमार्फत दिले जातात.
  • १२ व्या पंचवार्षिक योजनेमध्ये Presbypoia ने ग्रस्त वयस्क (वय वर्षे ४५ किंवा त्यापेक्षा जास्त )व्यक्तींना मोफत जवळचे चस्मे पुरवठा करण्याच्या नवीन उपक्रम चालू करण्यात आला आहे.सदर मध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

योजना /कार्यक्रमाची खास वैशीष्ठे

मोतीबिंदू शस्त्रक्रिया मध्ये ९९% शस्त्रक्रिया या आय .ओ. यल (IOL) शस्त्रक्रिया होतात

सेवा केंद्रे

  • राज्‍यामधील शासकिय मोतिबिंदु शस्त्रक्रिया केंद्र (जिल्‍हानिहाय)
  • वैदयकिय महाविदयालये
  • राज्‍यातील नेत्र पेढयासहीत नेत्रदान केंद्र
  • मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणा-या अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍था

अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍थाची भुमिका

  • मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणे
  • बुब्‍बुळ प्रत्‍यारोपण (कॅरोटोप्‍लास्‍टी) शस्त्रक्रिया करणे
  • इतर नेञ आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार करणे

कार्यक्रमाची प्रगती

मोतिबिंदु शस्त्रक्रिया कार्य –

वर्ष वार्षिक उदिदष्‍ट झालेल्‍या शस्त्रक्रिया टक्‍केवारी कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रियायेची टक्‍केवारी
२०१७-१८ ४५६०११ ६८४३८६ १५० ६८२२०२ ९५
२०१८-१९ ४५६०११ ७१८०१७ १५९ ७२६७८४ ९९
२०१९-२० ४५५००० ७०४८१३ १५४ ७०३५६९ ९९
२०२०-२१ ३३९५७० २२८९९१ ६७.४४ २२६६३० ९९
२०२१-२२ ३७३५१० ५५१०३४ १४७.३३ ५४९८११ ९९
२०२२-२३ ७७६४११ ८७३५१३ ११२.५१ ८७२१६७ ९९

नेञदान विषयक कार्य –

वर्ष उदिदष्‍ट साध्‍य नेत्रप्रत्यायरोपण शस्त्रक्रिया
२०१६-१७ ६६०० ७५१४ २९८९
२०१७-१८ ७००० ७५६० ३८४६
२०१८-१९ ७००० ७३२३ ३८१३
२०१९-२० ७५०० ६६५३ ३०५९
२०२०-२१ ५८५० १३५५ ८४७
२०२१-२२ ६५०० ३१७२ १९४७

शालेय विदयार्थ्‍यांची नेत्र तपासणी कार्य –

वर्ष एकुण तपासलेले विदयार्थी दृष्‍टीदोष आढळलेले विदयार्थी मोफत चष्‍मे वाटप
२०१६-१७ ३०१७८१३ ६८,२६८ ३०,५३५
२०१७-१८ २३०६८६२ ४३,९७२ २३,३१४
२०१८-१९ २३५९९८० ४२,५४९ ३१,७२४
२०१९-२० ३१६७५९३ ४३,२०३ १६,६१४
२०२०-२१ १३५७२२ ७६०० ५४८०
२०२१-२२ ६७८४४६ १५२३७ ८६३३

इतर नेत्र आजार व उपचार अहवाल –

वर्ष काचबिंदु डायबेटीक रेटिनोपॅथी लहान मुलांचे नेत्र विकार खुप-या तिरळेपणा आरओपी लो व्हिजन कॉर्नियल ब्‍लाइंडनेस इतर
२०११-१२ ४०४२ ३६६८ १२१६ २८२ १६७५ ३२५ ८५४ ६४७२ ९७८६