राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम

 

प्रस्तावना

केंद्र शासनाने ग्रामीण जनतेला स्व च्छय व शुध्दे व रासायनिक प्रदुषणापासून मुक्त पाणी पुरवठा व्हाआवा यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे रासायनिक घटकांचे विश्लेषण करण्यासाठी ''तांत्रिक अभियान'' या कार्यक्रमाची मुळ संकल्पना धरून ''पाणी अभियान'' हा कार्यक्रम राबविण्यात येतो. रासायनिक प्रदुषण घटकांचे विश्लेषण करून विकाराच्या समस्येचच्याभ मुळाशी असलेल्या घटकांचा अभ्यास करणे या सकारात्मक हेतूने राष्ट्री य फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची सुरूवात झाली. देशातील १९ राज्याषमध्येी आढळून आलेल्या फ्लोरोसिस रुग्णांधच्या संख्येच्या आधारावर जास्त रूग्ण आढळलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्याधचे निश्चित झाले.

फ्लोराईडचा उगम

फ्लोराईडचा प्रमुख स्त्रोनत फ्लोराईड युक्त पाणी आहे, तसेच चहा, तंबाखू, सुपारी इत्यादी विविध घटकांमध्ये अल्प प्रमाणात फ्लोराईड आढळते. पिण्याच्या पाण्याहत फ्लोराईडसचे प्रमाण १ ते १.५ मिलीग्रॅम/ लिटर (पी.पी.एम.) असल्याहस फ्लोरोसिस हा विकार होण्याची शक्यचता नाही. मात्र त्या पेक्षा जास्ता फ्लोराईड असल्या स अशा फ्लोराईडयुक्त पाण्यातच्याल सततच्याो सेवनाने फ्लोरोसिस हा विकार होतो.

राष्ट्रीय कार्यक्रम

देशातील १९ राज्यातील २३० जिल्हे फ्लोरोसिस विकाराने बाधित असल्याचे आढळून आल्यानुसार, राज्यांची तीव्रतेनुसार अति तीव्र, तीव्र, मध्ययम व कमी प्रमाणातील फ्लोरोसिस बाधित राज्येश अशी वर्गवारी करण्या्त आली आहे.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने फ्लोरोसिस या विकाराची दखल घेउन विशेष व प्राधान्याने कार्यवाही करण्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला निर्देश दिले.

कार्यक्रमाचे साध्य

देशात फ्लोरोसिस या विकाराचे प्रतिबंध व नियंत्रण करणे.

उद्देश / उद्दीष्टे

या कार्यक्रमाची प्रमुख उदृीष्टे् पुढीलप्रमाणे आहेत.

  • कार्यक्रम अंमलबजावणी प्रारंभी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे फ्लोराईड साठी परिक्षण व त्या आधारे स्त्रोतांवर अवलंबून लोकांची माहिती घेवून मूलभूत माहिती संकलन.
  • फ्लोरोसिस बाधित  रुग्‍णांवर सर्वसमावेशक उपाययोजना व त्‍यांचे व्‍यवस्‍थापन.
  • फ्लोरोसिस विकाराचा प्रतिबंध, निदान व व्‍यवस्‍थापनासाठी क्षमता बांधणी.

कार्यनिती

कार्यक्रमाची उदृीष्टे साध्यप करण्या साठी पुढील निरनिराळया साधनांचा उपयोग करुन घेणे.

  • प्रशिक्षण.
    वैद्यकिय अधिकारी व संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फ्लोरोसिस विकार प्रतिबंध, निदान, विकारावरील उपाययोजना व रुग्णां चे पुनर्वसन यासाठी प्रशिक्षित करणे.
  • क्षमता बांधणी.
    जिल्हा स्तपरावरील व्यंगोपचार व पुर्नवसन यासाठी क्षमता बांधणी.
  • प्रयोगशाळा विकास
    पाणी नमुने व रूग्णांचे मुत्र नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये सुविधा निर्माण व विकास.
  • माहिती, शिक्षण व संवाद.
    विकाराबाबत माहिती, लोकांमध्ये जागॄतीसाठी शिक्षण व विविध संवाद साधनाचा वापर करुन विकाराचे प्रतिबंधक उपाय व योजनांची माहिती देणे.

अंमलबजावणी / विविध कार्ये

  • विभाग / तालुका / गाव / खेडे / वस्ती निहाय सर्वेक्षण.
  • विकाराचे प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्य जागृती, निदान व पुर्नवसन यांचे विभाग / तालुका / गाव / खेडे / वस्ती निहाय सुविधा पुरविणे.
  • उपलब्‍ध साधने व साध्‍य या दोन्‍ही मधील तफावतींचा अभ्‍यास करुन
    1. अ) विकारांचे वैयक्तिक पातळीवर निदान व त्यासंबंधी उपाययोजना.
    2. सार्वजनिक आरोग्य सुविधा.

फ्लोरोसिस विकार, प्रकार व लक्षणे. फ्लोरोसिस हा विकार प्रामुख्याने प्रमाणित मानकांच्या पेक्षा अतिरिक्ती फ्लोराईडयुक्त पिण्यांच्या पाण्यातील सेवनाने कायम स्वरूपी व पुन्हा पुर्ववत न होणा-या शा‍रिरीक हानीन होतो. फ्लोरोसिस या विकाराचे वेगवेगळे प्रकार व त्यांची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे.

  • दंत फ्लोरोसिस
    लक्षणे – दात खडू सारखे पांढरे होणे, दातांवर दोन्हीा बाजूला सारख्याआच प्रमाणात काळसर तपकिरी चट्टे, ठिपके व पट्टे उमटणे, हिरड्यांचा आकार बदलणे. कालांतराने दाताचे ईनॅमल कोटींग जाऊन दात पडणे.
  • हाडांचा फ्लुरॉसिस
    लक्षणे – पाठीचा कणा व मानेत तीव्र वेदना, पाठीचा कणा वाकणे, सांध्यां मध्ये. ताठपणा व तीव्र वेदना, सांधे दुखी, सांधे आकूंचन पावणे, कमरेच्या भागात ताठपणा व तीव्र वेदना, गुडघे एकमेकांवर घासणे, मांडी घालून बसण्याास अडचण निर्माण होणे, चालण्याचा डौल बेढब होणे. एकूण शरीराच्याए चणीमध्ये, विकृती निर्माण होणे.
  • इतर अवयवांचा फ्लोरोसिस (हाडा व्य तिरिक्त इतर अवयवांना होणारा)
  • पचन संस्थेतचे विकार
    लक्षणे – सतत पोट दुखीचा त्रास, अधून मधून होणारा अतिसार, मलावरोध, शौचा वाटे रक्तस्त्राव होणे, अपचन होणे, पोटदूखी.
  • मज्जा संस्थेचे विकार
    लक्षणे - आळस, उदांसिनता येणे, हातापायांच्याण बोटांमध्ये मुंग्यार येणे, स्नाचयूत ताठरपणा अशक्तेपणा जाणवणे, वारंवार तहान लागणे, वारंवार लघवी होणे.
  • स्नायुंचे विकार
    लक्षणे - स्नारयूत ताठरपणा अशक्तगपणा जाणवणे. स्नायू दुर्बल होणे, आखडणे, वेदना होणे आणि स्नायुंची शक्ती कमी होणे.
  • अकाली वृध्दत्व येणे.

अंमलबजावणी

सन २००३ मध्ये राष्ट्री य फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात. महाराष्ट्रल राज्याकत पुढील टप्या ाव मध्ये् एकूण ६ जिल्हेयांचा कार्यक्रमात अंतर्भाव केला गेला.

सन जिल्‍हयांची नावे.
२०१०-११ चंद्रपूर, नांदेड.
२०११-१२ लातूर, वाशिम व यवतमाळ
२०१२-१३ बीड

फ्लोराईड घटकांची माहिती

  • फ्लोराईड हा निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे १३ व्‍या क्रमाकांचे मुलद्रव्‍य आहे.
  • फ्लोराईड हा दात व हाडाच्‍या स्‍वास्‍थासाठी आवश्‍यक घटक आहे.
  • फ्लोराईड कमतरतेमुळे सुध्‍दा दातात विकृती निर्माण होते.
  • शरिरात उपलब्‍ध फ्लोराईड पैकी ९६ टक्‍के फ्लोराईड हा हाडे व दातात आढळतो.
  • फ्लोराईडची शरिरासाठीची आवश्‍यकता फक्‍त ०.५ ते ०.८ मिली ग्रॅम इतकी आहे.

फ्लोरोसिस रुग्णांनी हे करावे /

फ्लोरोसिस रुग्णांननी हे करावे.

  • कॅलशियमयुक्‍त अन्‍नाचे प्रमाण आहारात जास्‍त असावे, जसे की, दूध, दुग्‍धजन्‍य पदार्थ, हिरव्या  पालेभाज्या,  टोमॅटो , लसूण, कमल काकडी, कांदे, रताळे व गाजर.
  • जीवनसत्‍व क युक्‍त अन्‍नाचे आहारात जास्‍त प्रमाण असावे, जसे की, लिंबु, लिंबु वर्गीय फळे, आवळा, चिंच, संत्रा, मोसंबी, पपर्इ, केळी इत्यादी
  • लोहयुक्‍त अन्‍नाचे आहारात प्रमाण अधिक असावे.

फ्लोरोसिस बाधित रुग्णांेनी हे करु नये / टाळावे.

  • काळया चहाचे सेवन करणे.
  • काळया अथवा सैंधव मिठाचा आहारात वापर.
  • तंबाखुचे सेवन.
  • सुपारीचे सेवन.
  • फ्लोराईड युक्‍त टुथपेस्‍टचा वापर.
  • फ्लोरोसिस ग्रस्त गावाचे पाण्याचे स्त्रोत ओळखून ते पाणी पिणे टाळावे.