|
|
|
|
विविध प्रकारच्या विषाणू, जीवाणू तसेच इतर परजीवींमुळे हा आजार होतो. या आजारामध्ये खालील प्रकारांचा समावेश होतो-
- कॉलरा - व्हीब्रीओ कॉलरा या विशिष्ट जीवाणुमुळे होतो. प्रथमतः जुलाब सुरु होतात व त्यानंतर उलटयाही होतात. कॉलरामध्ये पाण्यासारखे/भाताच्या पेजेसारखे पातळ जुलाब होतात. या आजारामध्ये निर्जलीकरण अत्यंत वेगात होते.
- गॅस्ट्रो - हा आजार वेगवेगळया प्रकाराच्या जीवाणू व विषाणुमुळे होतो, या आजारात उलटया व जुलाब एकाच वेळी सुरु होतात.
- अतिसार - हा आजार जीवाणू व विषाणुमुळे होतो. या आजारात प्रामुख्याने जुलाब होतात.
- हगवण - हा आजार परोपजिवी जंतू आमांश (अमिबा) मुळे होतो, या आजारात पोटात दुखते, रक्त मिश्रित जुलाब सुरु होतात.
|
( जंतूने मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे दिसून येवूपर्यतचा काळ) – काही तास ते ५ दिवस असा आहे.
|
- जुलाब-वांत्या चालू आहेत पण जलशुष्कता नाही क्षारसंजीवनीचा वापर करावा, तसेच पेज, सरबत इत्यादि घरगुती पेयांचा वापर करावा.
- जलशुष्कतेची लक्षणे असल्यास – क्षारसंजीवनी व घरगुती पेय द्यावी.
- तीव्र जलशुष्कता असल्यास रुग्णास नजिकच्या प्राथमिक आरोगय केंद्र / ग्रामीण रुगणालय येथे उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्टेट देण्यात यावे.
- झिंक टॅबलेट मुळेअतिसाराचा कालावधी २५ टक्याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाणही घटते.
जलशुष्कता कमी करण्याबरोबर योग्य अॅन्टीबायोटिक्सची योग्य माञा (डोस) देण्यात यावी.
|
तीव्र जलशुष्कता असलेल्या रुग्णाला शीरेवाटे देण्याकरीता रिंगर लॅक्टेट हे सर्वाधिक योग्य द्रावण होयञ
|
- शुध्द पाणी पुरवठा
- वैयक्तिक स्वच्छता
- मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट
- रुग्णांवर त्वरित उपचार
- बालकाचे गोवर प्रतिबंधात्मक लसिकरण अतिसाराच्या नियंञणासाठी आवश्यक आहे.
|