|
|
|
स्वाईन फल्यू या नावाने ओळखला जाणारा हा आजार २००९ मध्ये साथस्वरुपात जगभर पसरला. हिवाळा आणि पावसाळ्यात या रोगाचे रुग्ण प्रामुख्याने आढ्ळतात.
|
इंफ्ल्युएंझा हा आर एन ए प्रकारचा विषाणू असून तो जनुकिय दृष्ट्या अत्यंत लवचिक आहे.
|
इन्फल्युएंझा हा आजार कोणत्याही वयोगटातील स्ञी पुरुषास होऊ शकतो. विशेष करुन खालील व्यक्ती इन्फल्यूएंझा संदर्भात अतिजोखमीच्या आहेत.
- ५ वर्षाखालील मुले
- ६५ वर्षावरील प्रौढ व्यक्ती
- पूर्वीचे जुनाट आजार असलेल्या व्यक्ती – उदा. दमा, हदयाचे आजार, मूञपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त अथवा चेतासंस्थेचे विकार
- औषधे/ आजारामुळे प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती – उदा – स्टेरॉईडस प्रकारातील औषधे दीर्घ काळापासून घेणा-या व्यक्ती अथवा एचआयव्ही बाधित रुग्ण
- गरोदर माता
- स्थूल व्यक्ती इत्यादी.
हिवाळा तसेच पावसाळयात इन्फल्युएंझाचे रुग्ण वाढताना दिसतात.
|
समशितोष्ण कटिबंधात हा आजार मुख्यत्वे हिवाळ्यात व पावसाळ्यात आढळतो. भारतासारख्या संमिश्र हवामानाच्या देशात या आजाराचे रुग्ण वर्षभर आढळतात. गर्दी,सामाजिक समारंभ,जत्रा यामुळे या आजाराच्या प्रसारास मदत होते. शाळा,वसतिगृहे अशा ठिकाणीही हा आजार वेगाने पसरतो.
|
इन्फल्युएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार असून तो मुख्यत्वे हवेवाटे पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्या - खोकण्यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्णापासून इतर निरोगी व्यक्तीकडे पसरतात.
|
|
- ताप
- डोकेदुखी
- अंगदुखी
- घसादुखी
- खोकला
- थकवा
लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब ही लक्षणे ही आढळतात.
|
आर.टी.पी.सीआर.पध्दतीने या आजाराचे निदान करता येते. या साठी रूग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेणे आवश्यक असते. महाराष्ट्रात खालील प्रयोगशाळांमध्ये इन्फल्यूएंझा निदानाची व्यवस्था आहे.
- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे
- हाफकिन संशोधन संस्था, मुंबई
- कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुगणालय, मुंबई
|
या आजारावर ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत.
इन्फल्युएंझा करिता इंजेक्शनव्दारे दयावयाची (Killed Vaccine) आणि नेसल स्प्रे स्वरुपातील (Live attenuated Vaccine) लस उपलब्ध आहे. खालील व्यक्तींनी प्राधान्याने इन्फल्युएंझा लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
- गंभीर स्वाईन फल्यू रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि अवैद्यकीय कर्मचारी
- इन्फल्युएंझा संसर्गाकरिता अतिजोखमीच्या व्यक्ती.
डॉक्टराच्या मार्गदर्शनानुसार लस घेण्यात यावी.
|
- इन्फल्युएंझा ए एच१ एन १ टाळण्यासाठी हे करा –
- वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
- पौष्टिक आहार घ्या.
- लिंबु, आवळा, मोसंबी, संञी, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा.
- धुम्रपान टाळा.
- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
- भरपूर पाणी प्या.
- इन्फल्युएंझा ए एच १ एन १ टाळण्याकरता हे करु नकाः –
- हस्तांदोलन
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
- डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
- आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
|
- फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
- तपासणी व उपचार सुविधा
- प्रयोगशाळा निदान सुविधा
- फ्ल्यू विरोधी औषधांचा पुरेसा पुरवठा
- खाजगी रुग्णालयांशी समन्वय
- डॉक्टर्स व इतर कर्मचा-यांचे प्रशिक्षण
- आरोग्य शिक्षण
|