कांजण्या

 
कांजण्या

 

कांजण्या

कांजण्‍या हा Varicella Zoster नावाच्‍या विषाणूमुळे होणारा आत्‍यंतिक संसर्गजन्‍य रोग आहे. यामुळे शरीरावर पाणथळ फोडांचे पुंजके उठतात.

रोग लक्षणे

या रोगाची रोग लक्षणे सौम्‍य आजारापासून ते शरीरावरील विखुरलेल्‍या छोटया फोडाच्‍या जखमा तसेच तीव्र स्‍वरुपाचा ताप ते सर्वांगीण पुरळ अशा स्‍वरुपाच्‍या असतात.

पुरळ उठण्‍यापूर्वीच्‍या अवस्‍थेत सौम्‍य ते मध्‍यम स्‍वरुपाचा ताप, पाठदुखी, हुडहुडी व अस्‍वस्‍थता अशी लक्षणे साधारणपणे २४ तासांपर्यंत राहतात. प्रौढांमध्‍ये ती साधारण पुरळ उठण्‍या अगोदर २ ते ३ दिवस राहतात. उठण्‍याच्‍या अवस्‍था ही लहान मुलांमध्‍ये तापाने पुरळ उठण्‍याची अवस्‍था सुरु होते.

पुरळ शरीराच्‍या दोन्‍ही बाजूस उठतात. प्रथमतः शरीराच्‍या पुढील व मागील मुबलक भागांवरील प्रमाणात दिसतात. चेहरा, हात, पाय, या जागी ते कमी प्रमाणात आढळतात. त्‍यानंतर श्‍लेष्‍म भागावर (तोंडाच्‍या व घशाच्‍या आतील भाग) यावर उठतात. हाताचे तळवे व पायाचे तळव्‍यांवर यामुळे प्रभाव पडत नाही. शरीरावर पुरळांच्‍या निर्मितीचे विविध टप्‍पे आढळतात व साधारणपणे ४ ते ७ दिवसानंतर खपली धरावयास सुरुवात होते.

रोगप्रसार

कांजण्‍या झालेल्‍या रुग्‍णाच्‍या नाकातोंडातील स्‍ञाव तसेच त्‍वचा व श्‍लेष्‍म भागातील जखमा यापासून रोगाचा प्रसार होतो. रुग्‍णाच्‍या शरीरावरील खपली धरलेल्‍या जखमांमुळे कांजण्‍यांचा प्रसार होत नाही.

रोग प्रतिबंध

  • रुग्‍णाचे अचूक निदान, पुरळ उठल्‍यानंतर ६ दिवसानंतर रुग्‍णाचे विलगीकरण तसेच रुग्‍णाच्‍या नाक व घशातील स्‍ञावाने बाधा झालेल्‍या वस्‍तूंचे निजर्तुंकीकरण
  • ७२ तासांच्‍या आत रुग्‍णाच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तीस Varicella Zoster Immunoglobiin (VZIG) चे इंजेक्‍शन
  • १२ ते १८ महिन्‍यांच्‍या आतील बालकाचे कांजण्‍या प्रतिबंधक लसीकरण