महत्वाची कामगिरी

महत्वाची कामगिरी -  (अदययावत  दिनांक  2 मे 2022)

महत्वाची  स्थित्यंतरे-  

 अ) राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान -

 गरीब दुर्लक्षित तसेच गरजु ग्रामीण जनतेस सहजसाध्य , परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या घटकांचा (उदा.आहार, परिसर स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, महिला व बालविकास इत्यादी) बाबींचा या अभियानामध्ये एकत्रित विचार करण्यात आला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची उद्दिष्टे - राज्यातील जनतेला विशेषतः ग्रामीण जनता , गरीब, महिला व मुले यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हे या अभियानाचे ध्येय आहे. याशिवाय अभियानाची विशिष्ट उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

अर्भक मृत्युदर व माता मृत्युदर कमी करणे.

आरोग्य सेवांची उपलब्धता वाढविणे.

सांसर्गिक व असांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व नियंत्रण करणे.

लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी सर्व समावेशक व दर्जदार गुणवत्तापुर्ण प्राथमिक सेवा उपलब्ध करणे.

आरोग्य सेवेमध्ये आयुषचा ( Ayush) समावेश करणे.

आरोग्यदायी जीवनशैलीचे संवर्धन करणे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान चे घटक

१-राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

२-राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान

३-संसर्गजन्य रोग

४-असंसर्गजन्य रोग

  ब) असांसर्गीक रोग नियंत्रण कार्यक्रम -

      वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO) ने चार प्रमुख NCDs ओळखले आहेत - हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग 1(CVD), जसे की हृदयविकाराचा झटका  आणि स्ट्रोक, मधुमेह, तीव्र श्वसन रोग (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आणि दमा) आणि कर्करोग. या चार अटी भारतातील अकाली मृत्यूच्या उच्च प्रमाणासाठी जबाबदार आहेत (WHO 2014).

      भारतामध्ये , चार प्रमुख NCDs हे मृत्यूचे प्रमुख कारण आहेत, जे मृत्यूच्या 60% पेक्षा जास्त आहेत, त्यांना दुखापती, संसर्गजन्य रोग, माता, प्रसूतीपूर्व आणि पौष्टिक परिस्थिती यांच्या पुढे ठेवतात. गेल्या तीस वर्षांमध्ये, मधुमेहाची समस्या वृद्धांच्या सौम्य व्याधीपासून तरूण आणि मध्यमवयीन लोकांना प्रभावित करणार्‍या विकृती आणि मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक बनली आहे. नुकत्याच झालेल्या ICMR-INDIAB (2014) अभ्यासानुसार, 2014 मध्ये सुमारे 6.24 कोटी लोकांना मधुमेह आहे आणि 7.7 कोटी लोकांना प्री-डायबिटीज आहे, ज्यामुळे ते सर्वात मोठ्या असंसर्गजन्य महामारींपैकी एक बनले आहे.

       2008 मध्ये , भारतातील सर्व मृत्यूंपैकी 26% हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होते, ज्यासाठी उच्च रक्तदाब हा एक प्रमुख चयापचय जोखीम घटक आहे (WHO, 2011a). 2008 मध्ये भारतातील प्रौढ लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचा अंदाज 32.5% होता (33.2 पुरुष आणि 31.7 महिलांसाठी) (WHO, 2011a).

      भारतात सर्वात जास्त आढळणारे तीन कर्करोग स्तन , गर्भाशय ग्रीवा आणि ओठ/तोंडी पोकळी आहेत. एकत्रितपणे, ते भारतातील सर्व कर्करोगांपैकी अंदाजे 34% आहेत आणि सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देतात. भारतातील महिलांमध्ये (14.3%) कर्करोगाचे प्रमुख कारण स्तनाचा कर्करोग म्हणून उदयास आले आहे. भारतातील गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे (12.1%). भारतातील सर्व कर्करोगांपैकी तोंडाच्या कर्करोगाचा वाटा सुमारे 7.2% आहे (ग्लोबोकन 2012).

        तंबाखूचा वापर आणि संपर्क , अस्वास्थ्यकर आहार, शारीरिक निष्क्रियता, अल्कोहोलचा गैरवापर, घरातील आणि सभोवतालचे वायू प्रदूषण, तणाव, गरिबी (कारण आणि परिणाम म्हणून), खराब आरोग्य शोधणारे वर्तन हे या चार एनसीडीच्या सुरुवातीस आणि कोर्सशी संबंधित महत्त्वाचे घटक आहेत. आणि आरोग्य सेवांसाठी कमी प्रवेश. मधुमेह आणि उच्चरक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड निकामी होऊ शकतात आणि हे सर्व प्रतिबंध, लवकर ओळख आणि उपचारांसाठी सक्षम आहेत. त्यामुळे शासन महाराष्ट्र शासनाच्या सहाय्याने भारताने खालील जिल्ह्यांमध्ये NPCDCS कार्यक्रम लागू केला आहे.

उद्दिष्टे

• वर्तन आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे सामान्य एनसीडी प्रतिबंध आणि नियंत्रित करणे

• सामान्य एनसीडीचे लवकर निदान आणि व्यवस्थापन प्रदान करणे,

• सामान्य NCDs च्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांसाठी आरोग्य सेवेच्या विविध स्तरांवर क्षमता निर्माण करणे,

• सार्वजनिक आरोग्य सेटअपमध्ये मानव संसाधन प्रशिक्षित करा उदा. NCDs च्या वाढत्या ओझ्याला तोंड देण्यासाठी डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि नर्सिंग स्टाफ, आणि

• उपशामक आणि पुनर्वसन काळजी धोरणांसाठी क्षमता स्थापित करा आणि विकसित करा

क) आयुष्‍मान भारत आरोग्‍यवर्धिनी केंद्र कार्यक्रम

(Ayushman Bharat Health & Wellness Center Programme)

भारत सरकारने आरोग्‍य सेंवासंबंधी समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी आयुष्‍मान भारत योजने अंतर्गत आरोग्‍यवर्धिनी केंद्र कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्‍य संबंधी प्रतिबंधात्‍मक तथा प्रबोधनात्‍मक सेवा लोकांपर्यंत पोहचविण्‍याकरीता सध्‍या कार्यान्वित असलेले सर्व उपकेंद्र (१०६७३), प्राथमिक आरोग्‍य केंद्र (१८३९) व नागरी प्राथमिक आरोग्‍य केंद्र (६५१) आरोग्‍यवर्धिनी केंद्रामध्‍ये   टप्‍पाटप्‍याने सन २०२२ पर्यंत रुपांतरीत करण्‍यात येत आहेत.  

            राज्‍यात प्रति उपकेंद्राद्वारे ५००० व प्रति प्राथमिक आरोग्‍य केंद्राद्वारे ३०,००० लोकसंख्‍येस आरोग्‍य सेवा प्रदान केली जात आहे. आधुनिक दिनचर्येमधील बदलामुळे असंसर्गजन्‍य रोगांमध्‍ये वाढ झाली आहे. त्‍याकरीता सध्‍या दिले जाणारे माता बालसंगोपन संबंधी आरोग्‍य सेवांमध्‍ये वाढ करुन असंसर्गजन्‍य रोग नियोजन व तपासणी, मानसिक आरोग्‍य, दंत व मुखरोग, वाढत्‍या वयातील आजार व आपत्‍कालीन आरोग्‍य सेवा पुरविण्‍याचे उद्दीष्‍ट आहे. कार्यक्षेत्रातील लोकांना प्रतिबंधात्‍मक, प्रबोधनात्‍मक व उपचारात्‍मक आरोग्‍य सेवा बरोबरच औषधोपचार व प्रयोगशाळा तपासणी मोफत दिली जात आहे.

सदर आरोग्‍यवर्धिनी केंद्रामध्‍ये १३ प्रकारच्‍या सेवा रुग्‍णांना दिल्‍या जात आहेत.

 • प्रसुतिपुर्व व प्रसुती सेवा
 • नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्‍या जाणा-या सेवा
 • बाल्‍य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा
 • कुटुंब नियोजन, गर्भ निरोधक व आवश्‍यक आरोग्‍य सेवा
 • सामान्‍य आजारांसाठी बाहय रुग्‍ण सेवा
 • संसर्गजन्‍य रोग नियोजन व तपासणी
 • असंसर्गजन्‍य रोग नियोजन व तपासणी
 • मानसिक आरोग्‍य नियोजन व तपासणी
 • दंत व मुखरोग आरोग्‍य सेवा
 • नाक,कान, घसा व डोळयांचे  सामान्‍य आजार संबंधीच्‍या सेवा
 • वाढत्‍या वयातील आजार व परिहारक उपचार
 • प्राथमिक उपचार व आपत्‍कालीन सेवा
 • आयुष व योग

         सदर आरोग्‍यवर्धिनी केंद्र - उपकेंद्रामध्‍ये समुदाय आरोग्‍य अधिकारी (Community Health Officers) या पदावर आयुर्वेद,युनानी व बी.एस्‍सी.नर्सिंग पदवीधारक नियुक्‍त केले जात आहेत. समुदाय आरोग्‍य अधिकारी (CHO), आरोग्‍य सेविका (ANM), बहुउद्देशीय आरोग्‍य सेवक (MPW) व आशा  (ASHA) यांच्‍या माध्‍यमातून आरोग्‍यवर्धिनी उपकेंद्राच्‍या अंतर्गत येणा-या गावांमध्‍ये प्राथमिक आरोग्‍य सेवा दिल्‍या जात आहेत.

        आरोग्‍यवर्धिनी केंद्र -उपकेंद्र स्‍तरावर १४ प्रकारच्‍या प्रयोगशाळा तपासण्‍या व आरोग्‍यवर्धिनी केंद्र -प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या ठिकाणी HLL च्‍या माध्‍यमातून ६३ प्रकारच्‍या प्रयोगशाळा तपासण्‍या  रुग्‍णांना मोफत दिल्‍या जात आहेत. केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनेनूसार आरोग्‍यवर्धिनी उपकेंद्र येथे १०५ व आरोग्‍यवर्धिनी प्राथमिक आरोग्‍य  केंद्र येथे १७२ प्रकारच्‍या औषधी उपलब्‍ध असणे आवश्‍यक आहे. आरोग्‍यवर्धिनी उपकेंद्रांसाठी लागणारे औषधी हाफकीन बायोफार्मा लिमीटेड च्‍या   माधमातून खरेदी करण्‍यात येत आहे. तसेच आरोग्‍यवर्धिनी उपकेंद्र व आरोग्‍यवर्धिनी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला औषधी DPDC Fund व राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत मंजुर निधीतून नियमित खरेदी करुन दिल्‍या  जातात.    

        केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्‍यात आरोग्‍यवर्धिनी टेलिकन्सल्टेशन सेवा हब आणि स्पोक या मॉडेल चा वापर करून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत इ-संजीवनी अँप्लिकेशन द्वारे स्‍पोक येथील समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी हे हब येथील एम.बी. बी .एस /तज्ञ डॉक्‍टर यांच्या मार्फत रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्‍या माध्यमातून वैद्यकीय सल्ला प्राप्त करून देतात .

उत्‍कृष्‍ठ कामगिरी -  

आरसीएच-

 • संस्थात्मक प्रसूतींमध्ये 2005-06 मधील 53% वरून 2020-21 मध्ये 99% (एकूण वितरणासह) लक्षणीय वाढ.
 • गेल्या 11 वर्षांपासून (वर्ष 2010 ते 2021 पर्यंत) पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही.
 • राज्याचा माता मृत्यू दर 1 लाख जीवंत जन्ममागे 38 इतका कमी झाला आहे ( SRS Buletin मार्च 2022)
 • महाराष्ट्रात शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे , राज्याला 6 फेब्रुवारी 2013 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या राष्ट्रीय शुभारंभाने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम सध्या राज्यभर राबविण्यात येत आहे. 0 - 18 वर्ष वयोगटातील कोट्यवधी मुलांना त्याचा लाभ होत आहे.
 • राज्य सरकारने राज्यातील सर्व सिकलसेल रुग्णांना मोफत एसटी बस सेवा जाहीर केली आहे. सिकलसेल रोग नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व आदिवासी भागात सिकलसेल रुग्णांची ओळख आणि उपचारासाठी यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

कोविड लसीकरण  -

प्रस्‍तावना -

 • राज्‍यात कोविड लसीकरण मोहिम दि. १६ जानेवारी २०२१ पासून सुरु करण्‍यात आली आहे. 
 • केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे.
 • मोहिमेची सुरुवात हेल्‍थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्करच्‍या लसीकरणाने झाली.
 • दि.१ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षे व त्‍यावरील सर्व नागरीकांचे लसीकरण मोहिमेत समावेश करण्‍यात आला.
 • दि.१ मे २०२१ पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटाचा कोविड लसीकरणामध्‍ये समावेश करण्‍यात आला.
 • केंद्र शासनाच्‍या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार दि. २१ जून २०२१ पासून केंद्र शासनाकडून १८ वर्षे ते पुढील वयोगटाकरीता लस राज्‍याला पुरविली जाते.
 • केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसार ज्‍या लाभार्थ्‍यांकडे ओळखपञ नाही असे  जेलमधील कैदी, भटक्‍या जमाती, साधूसंत, मनोरुग्‍ण संस्‍थेतील लाभार्थी, भिकारी, वृध्‍दाश्रमातील लाभार्थी, रस्‍त्‍यालगत राहणारे, पुर्नवसन शिबिरात राहणारे इ. करीता कोविड लसीकरण विशेष सञ आयोजित करुन केले जाते.
 • केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसार स्‍तनदा मातांकरीता आणि गरोदर महिलांकरीता लसीकरण जुलै २०२१ पासून सुरु करण्‍यात आले आहे.
 • अंथरुणास खिळणारे व जागेवरुन हालचाल न करता येणा-या लाभार्थ्‍यांकरीता जुलै २०२१ पासून कोविड लसीकरण  करण्‍यात येत आहेत.
 • दि.३ जानेारी २०२२ पासून 15 वर्षावरील लाभार्थ्‍यांच्‍या लसीकरणाला सुरुवात झाली.  १५ ते १८ वर्ष वयोगटासाठी कोव्‍हॅक्सिन लसीचा वापर करण्‍यात येत आहे.
 • दि.१० जानेवारी २०२२ पासून हेल्‍थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ६० वर्षावरील सहव्‍याधी असलेल्‍या नागरीकांना प्रिकॉशन डोस देण्‍यास सुरुवात करण्‍यात आली. ज्‍या नागरीकांनी दुसरा डोस घेतल्‍यानंतर ३८ आठवडे अथवा ९ महिने पूर्ण केले असतील अशाच हेल्‍थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ६० वर्षावरील सहव्‍याधी असलेल्‍या नागरीकांना प्रिकॉशन डोस देण्‍यास सुरुवात झाली. प्रिकॉशन डोस हा नागरीकांनी पहिला व दुसरा डोस ज्‍या प्रकारचा घेतला आहे त्‍याच प्रकारचा प्रिकॉशन डोस हा घ्‍यायचा आहे. उदा - ज्‍या नागरीकांनी पहिले दोन डोस कोव्‍हॅक्सिन लस घेतली आहे त्‍यांना प्रिकॉशन डोस हा को‍व्‍हॅक्सिन लसीचा राहील. तसेच ज्‍या नागरीकांनी पहिले दोन डोस कोव्हिशिल्‍ड लस घेतली आहे त्‍यांना प्रिकॉशन डोस हा कोव्हिशिल्‍ड लसीचा राहील.
 • दि.१६ मार्च २०२२ पासून १२ वर्ष व त्‍या वरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्‍यात आले. वय वर्ष १२ पूर्ण ते १४ वर्ष या वयोगटासाठी कॉरबीव्‍हॅक्‍स लसीचा वापर करण्‍यात येत आहे. तसेच ६० वर्षावरील सर्व नागरीकांना प्रिकॉशन डोस देण्‍यास सुरुवात करण्‍यात आली.
 • दि.१० एप्रिल २०२२ पासून १८ वर्षांवरील नागरीकांना प्रिकॉशन डोस खाजगी लसीकरण केंद्रामार्फत देण्‍यास सुरुवात करण्‍यात आली आहे. प्रिकॉशन डोस हा नागरीकांनी पहिला व दुसरा डोस ज्‍या प्रकारचा घेतला आहे त्‍याच प्रकारचा प्रिकॉशन डोस हा घ्‍यायचा आहे. उदा - ज्‍या नागरीकांनी पहिले दोन डोस कोव्‍हॅक्सिन लस घेतली आहे त्‍यांना प्रिकॉशन डोस हा को‍व्‍हॅक्सिन लसीचा राहील. तसेच ज्‍या नागरीकांनी पहिले दोन डोस कोव्हिशिल्‍ड लस घेतली आहे त्‍यांना प्रिकॉशन डोस हा कोव्हिशिल्‍ड लसीचा राहील.

कोविड १९ लसीकरण दि. १० एप्रिल २०२२ रोजीचा  अहवाल

अ.क्र

वर्ग

पहिला डोस

दुसरा डोस

प्रिकॉशन डोस

हेल्‍थ केअर वर्कर

१२,९५,२८८

१००%

११,८८,५३२

९१.८०%

३,३८,०१७

६२.८०%

फ्रंट लाईन वर्कर

२१,४९,४८४

१००%

१९,९७,००१

९२.९०%

३,६१,७१२

५०.६०%

१२ ते १४ वर्ष वयोगट

१७,१२,०१५

४३.६८%

-

-

-

-

१५ ते १८ वर्ष वयोगट

३८,२५,३६५

६३.०९%

२५,०५,९२५

४१.३३%

-

-

१८ ते ४४ वर्ष वयोग्‍ट

४,९०,५३,९५०

८७.१७%

३,८३,९७,१४२

६८.२३%

-

-

४५ वर्षे ते ५९ वर्ष वयोगट

१,८३,८७,१४३

९०.२७%

१,५६,७७,७४३

७६.१४%

-

-

६० वर्षे व त्‍यावरील नागरीक

१,३३,४९,५५७

९१.७६%

१,१०,९२,६७०

७६.२४%

१२,२३,४८५

५७.२६%

१८ वर्ष व वरील नागरीक

८,४२,३५,४२२

९२.१३%

६,८३,५३,०८८

७४.७६%

-

-

 

कार्डियाक कॅथलॅब-

प्रस्तावना

      ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज रिपोर्ट २०१६ प्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होणाऱ्या  मृत्यू आणि अपंगत्वाचे रोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हृदय विकारांमुळे  राज्यात मोठ्या प्रमाणात अकाली मृत्यू होतात. राज्यात एकूण होणाऱ्या मृत्यू व अपंगत्व मध्ये  इस्केमिक हृदयरोगांचे  ११.२  टक्के  वाटा आहे.

      या आजाराचा  भार कमी करण्यासाठी राज्यात आरोग्य विभागामार्फत  “स्टेमी महाराष्ट्र” कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश सर्व जनतेमध्ये  या आजारांबद्दल व त्यांच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जनजागृती  निर्माण करणे , रोगाचे लवकर-लवकर  निदान आणि  उपचार रुग्णांना उपलब्ध करून देणे.

     ST-elevation myocardial infarction (STEMI) असलेल्या सर्व रूग्णांना अँजिओग्राफी व  अँजिओप्लास्टीची आवश्यकता असते तसेच हृदयाच्या इतर अनेक आजारांसाठी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी आवश्यक असते. या करिता कार्डियाक कॅथलॅबची  आवश्यकता  असते .

सद्यस्थिती

     सद्यस्थितीत  सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यभर या सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी या सेवांचा विस्तार करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे . मा. अर्थमंत्री , महाराष्ट्र राज्य महोदययांनी त्यांच्या सन २०२१-२२  राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ८ कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याची घोषणा केली आहे.  8 पैकी 4 ठिकाणी (ठाणे ,सिंधुदुर्ग ,नाशिक व अमरावती) येथे स्पेशियालिटी हॉस्पिटल मंजूर आहे.त्यापैकि नाशिक येथील संदर्भिय रुग्णालय येथे कार्डियाक कॅथलॅब सुरू करण्यात आले आहे.

   तसेच उर्वरित 4 ठिकाणी पुणे,जालना,गडचिरोली व नांदेड  या जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालय येथे कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महत्‍वाचे जिवनावश्‍यक निर्देशक -

  अ.क्र.

तपशिल

जन्‍मदर

मृत्‍यु दर

अर्भक मृत्‍युदर

भारत

19.7

6.0

30

आंध्र प्रदेश

15.9

6.4

25

कर्नाटक

16.9

6.2

21

केरळ

13.5

7.1

6

तामिळनाडु

14.2

6.1

15

महाराष्‍ट्र

15.3

5.4

17

स्‍ञोत- नमुना नोदनी पध्‍दती , भारत सरकार.

जिवनविषयक दर -

जन्म दर , मृत्यू दर, अर्भक मृत्यू दराचा तुलनात्‍मक तक्‍ता

वर्ष

महाराष्‍ट्र

भारत

 

जन्म दर

मृत्यू दर

अर्भक मृत्यू दर

जन्म दर

मृत्यू दर

अर्भक मृत्यू दर

2013

16.5

6.2

24

21.4

7.0

40

2014

16.5

6.0

22

21.0

6.7

39

2015

16.3

5.8

21

20.8

6.5

37

2016

15.9

5.9

19

20.4

6.4

34

2017

15.7

5.7

19

20.2

6.3

33

2018

15.6

5.5

19

20.0

6.2

32

2019

15.3

5.4

17

19.7

6.0

30