संपर्क महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
भारत सरकार

प्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा

प्राथमिक आरोग्‍य केंद्रे

उपकेंद्राप्रमाणेच उपरोक्‍त कार्य व त्‍या व्‍यतिरिक्‍त प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमार्फत तातडीच्‍या वैद्यकिय सेवांची उपलब्‍धता, बाहयरुग्‍ण कक्ष, ६ खाटांचे आंतररुग्‍ण कक्ष, शस्‍त्रक्रिया सेवा,  (कुटुंब  कल्‍याण स्‍त्री शस्‍त्रक्रि) प्रयोगशाळा  सेवा, विविध राष्‍ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्‍याण कार्यक्रमांतर्गत सेवा देणे व उपकेंद्रांकडून  संदर्भित केलेल्‍या रुग्‍णांवर उपचार या आरोग्‍य सेवा दिल्‍या जातात. प्रत्‍येक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये १५ कर्मचारी कार्यरत असतात. यामधील स्‍वच्‍छता व वाहन सेवा कंत्राटी पध्‍दतीने देण्‍याबाबत शासनाचे निर्देश आहेत.

जिल्‍हा परिषदांना महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद आणि पंचायत समितीच्‍या अधिनियम १९६१ च्‍या कलम १८३ नुसार आस्‍थापना अनुदाने देण्‍यात येतात.

वरील अधिनियमातील कलम १८७ नुसार हस्‍तांतरीत विकास योजनांच्‍या अंमलबजावणीसाठी जिल्‍हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने देण्‍यात येतात. खाली  नमूद  करण्‍यात आलेल्‍या  योजनांच्‍या कार्याचा विस्‍तार करण्‍यासाठी जिल्‍हा परिष्‍दांना योजनांतर्गत अनुदाने शासनामार्फत मंजूर करण्‍यात येतात.

  1. प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍थापना
  2. प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र यांच्‍या  इमारतीची बांधकामे/देखभाल दुरुस्‍ती
  3. प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे बळकटीकरण
  4. उपकेंद्राची स्‍थापना
  5. विभागीय असमतोल- प्राथमिक आरोग्‍य केंद्र , उपकेंद्र यांची स्‍थापना व बांधकामे

आरोग्‍य संस्‍था स्‍थापन  करण्‍यासाठी केंद्र सरकारचे लोकसंख्‍येचे निकष्‍

क्रम संस्‍था लोकसंख्‍येचा निकष
बिगर आदिवासी   आदिवासी  
उपकेंद्र ५००० ३०००
प्राथमिक आरोग्‍य केंद्र ३०००० २००००

 महाराष्‍ट्रातील प्राथमिक आरोग्‍य सेवा व सुविधा

अ.क्र.

जिल्‍हा

प्राथमिक आरोग्‍य केंद्र उपकेंदे

आदिवासी

बिगर आदिवासी एकुण आदिवासी बिगर आदिवासी एकुण
ठाणे ५१ २७ ७८ ३४६ १४६ ४९२
रायगड ४९ ५२ १९ २६९ २८८
रत्‍नागिरी ६७ ६७ ३७८ ३७८
ठाणे मंडळ ५४ १४३ १९७ ३६५ ७९३ ११५८
धुळे १४ २७ ४१ ९१ १४१ २३२
नंदुरबार ५६ ५८ २७८ १२ २९०
जळगांव ७५ ७७ १६ ४२६ ४४२
नाशिक ५२ ५१ १०३ ३०० २७७ ५७७
अहमदनगर ८७ ९६ ४८ ५०७ ५५५
नाशिक मंडळ १३३ २४२ ३७५ ७३३ १३६३ २०९६
पुणे ८८ ९६ ६१ ४७८ ५३९
१० सोलापूर ७७ ७७ ४३१ ४३१
पुणे मंडळ १६५ १७३ ६१ ९०९ ९७०
११ सातारा ७१ ७१ ४०० ४००
१२ कोल्‍हापूर ७३ ७३ ४१३ ४१३
१३ सांगली ५९ ५९ ३२० ३२०
१४ सिंधुदुर्ग ३८ ३८ २४८ २४८
कोल्‍हापूर मंडळ २४१ २४१ १३८१ १३८१
१५ औरंगाबाद ५० ५० २७९ २७९
१६ जालना ४० ४० २१३ २१३
१७ परभणी ३१ ३१ २१४ २१४
१८ हिंगोली २२ २४ १३२ १३२
औरंगाबाद मंडळ १४५ १४५ ८३८ ८३८
१९ लातूर ४६ ४६ २५२ २५२
२० उस्‍मानाबाद ४२ ४२ २०६ २०६
२१ बीड ५० ५० २८० २८०
२२ नांदेड १४ ५१ ६५ ९२ २८५ ३७७
लातूर मंडळ १४ १८९ २०३ ९२ १०२३ १११५
२३ अकोला ३० ३० १७८ १७८
२४ वाशिम २५ २५ १५३ १५३
२५ अमरावती ११ ४५ ५६ ९५ २३८ ३३३
२६ यवतमाळ १९ ४४ ६३ ११८ ३१७ ४३५
२७ बुलढाणा ५२ ५२ २८० २८०
अकोला मंडळ ३० १९६ २२६ २१३ ११६६ १३७९
२८ नागपूर ४५ ४९ २६ २९० ३१६
२९ वर्धा २७ २७ १८१ १८१
३० भंडारा ३३ ३३ १९३ १९३
३१ गोंदिया १९ २० ३९ १२५ ११३ २३८
३२ चंद्रपूर ५० ५८ ६४ २७५ ३३९
३३ गडचिरोली ४५ ४५ ३७६ ३७६
नागपूर मंडळ ७६ १७५ २५१ ५९१ १०५२ १६४३
एकुण ३१५ १४९६ १८११ २०५५ ८५२५ १०५८०

उपकेंद्र-

       उपकेंद्रामार्फत  प्रथमोपचार,  प्रसुतीपूर्व  मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्‍याण, माता बाल संगोपन  विषयक सल्‍ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्‍ठरोग व हिवतापाच्‍या रुग्‍णांना  उपचार व संदर्भ सेवा, आरोग्‍य शिक्षण इत्‍यादी सेवा पुरविण्‍यात येतात. प्रत्‍येक उपकेंद्रामध्‍ये आरोग्‍य सेवक (पुरुष) व (स्‍त्री) तसेच एक अंशकालीन स्‍त्री परिचर अशा ३ पदांस शासनाने मान्‍यता दिली आहे.