माहिती शिक्षण व संपर्क कार्ये बळकट करण्यासाठी महाराष्ट्रा शासनाने एकीकृत माहिती शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे १९९६ मध्ये स्थापन केला आहे.
सर्वसाधारण उद्दीष्ट
- आरोग्य सेवांबाबत समाजामध्ये जागृती घडवून आणणे.
- कुटुंब कल्याण व आरोग्य कार्यक्रमामध्ये नागरिकांना सहभागी करून घेणे .
- आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी जनतेला उद्युक्त करणे
- आरोग्याबाबत लोकांच्या वागणुकीत बदल घडवून आणणे
विशिष्ट उद्देश
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाबाबत लोकशिक्षण देणे.
- आरोग्य शिक्षण साहित्य निर्माण करून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे
- आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करणे
- महिलांच्या व युवकांच्या विविध गटांसाठी आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम आयोजित करणे
- महाराष्ट्र आरोग्य पत्रिका मासिकाचे प्रकाशन करणे
- शैक्षणिक उपक्रम व विविध माध्यमें वापरण्याच्या पद्धतीचे मूल्यमापन करणे.
- आरोग्य उपक्रमांचे व्यवस्थापन करणे
- राज्यातील आरोग्य शिक्षण प्रकल्पांचे पुनरावलोकन करणे
- जागतिक आरोग्य दिन, जागतिक लोकसंख्या दिन जागतिक एड्स दिन या दिवशी सामुहिक विविध उपक्रम आयोजणे. जिल्हा स्तरावर प्राथमिक आरोग्य स्तरावर स्थानिक ग्रामपंचायतीच्या व सेवाभावी संस्थांच्या मदतीने आरोग्य प्रदर्शना सारखे कार्यक्रम आयोजित करणे
- दूरदर्शन जाहिराती, आकाशवाणीवर चारोळी, कविता, सीडी, वर्तमानपत्रात जाहिराती देणे इत्यादी
- ग्रामीण भागात माता व बाल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना, आरोग्य संस्थांना डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार देणे