संपर्क महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
भारत सरकार

परिवहन सेवा

अंतर्गत विविध पातळ्यांवर विविध प्रकारच्या आरोग्य संस्था काम करीत आहेत.  महाराष्ट्रातील लोकांना चांगली व तातडीची वैद्यकीय मदत व सेवा पुरविणे हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे ध्येय आहे.  कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थाना वाहनांची गरज असते तसेच  डॉक्टर्स, परिचारिका, औषधे व वैद्यकीय उपकरणांची वाहतूक करण्यासाठी वाहनांची गरज असते.  कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यावर परिणामकारक पर्यवेक्षणाची व समयोचित परिवहनाची गरज असते.  जर वाहतुकीची सुविधा व वाहने असतील तरच राज्यभरातील आरोग्य कार्यक्रमांचे परिणामकारक पर्यवेक्षण शक्य आहे.  सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका, मिनीबस, ट्रक, जीप इत्यादी वाहनाचा वापर करण्यात येतो.  वाहन ही सार्वजनिक आरोग्य विभागाची जीवनरेखा आहे.  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वाहनांची देखभाल करण्यासाठी सन १९६२ मध्ये राज्य आरोग्य परिवहन विभागाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत राज्य आरोग्य विभागाची कामगिरी समाधानकारक आहे. 

वाहनांप्रमाणेच प्रत्येक आरोग्य संस्थेला वेगवेगळ्या रुग्णालयीन उपकरणांची आवश्यकता असते.  त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी राज्य आरोग्य वाहतूक विभागा अंतर्गत आरोग्य उपकरणे देखभाल व दुरुस्ती विभागाची १९७२ मध्ये स्थापना करण्यात आली.