सहसंचालक,आरोग्य सेवा, (हिवताप,हत्तीरोग व जलजन्यरोग) पुणे हे राज्यस्तरावर कार्यक्रम प्रमुख आहेत व ते योजनेवर नियंत्रण ठेवतात. सहसंचालक, आरोग्य सेवा, (हिवताप,हत्तीरोग व जलजन्यरोग) पुणे-६ यांना सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे व राज्य किटकशास्त्रज्ञ सहाय्य करतात. त्याचप्रमाणे प्रादेशिक स्तरावर सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा,(हिवताप) व जिल्हास्तरावर जिल्हा हिवताप अधिकारी हे सहाय्य करतात.
अनुदान पध्दती
राज्य शासन आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांच्याकडून योजनेस अनुदान प्राप्त होते.
२००९ पासून चालू वर्षापर्यंत राज्याची वर्षनिहाय हिवताप परिस्थिती.
वर्ष |
हिवताप रुग्ण |
पी.एफ.रुग्ण |
हिवतापाने मृत्यू संख्या |
पी.एफ. टक्केवारी |
२००९ |
९३८१८ |
२४९६२ |
२२७ |
२६.६ |
२०१० |
१३९१९८ |
३२३९१ |
२०० |
२२.१ |
२०११ |
९६५८४ |
२१४०५ |
११८ |
२२.१ |
२०१२ |
५८४९९ |
११८५४ |
९६ |
२०.२ |
२०१३ |
४३६७६ |
९१९७ |
६७ |
२१.१ |
केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अधिन राहून राज्यामध्ये राबविण्यात येणा-या विविध हिवताप विरोधी उपाययोजना खालीलप्रमाणे.
(अ) सर्वेक्षण
- नवीन हिवताप रुग्ण शोधण्यासाठी राज्यातील सर्व पाडा, वाडया, वस्ती,गावपातळीवर कर्मचा-यांमार्फत सर्वेक्षण.
- आरोग्य कर्मचा-यांमार्फत किटकशास्त्रीय सर्वेक्षण.
- '' आशा '' स्वयंसेवक / पाडा स्वयंसेवकाचा स्थानिक स्तरावर किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग.
(ब) प्रयोगशाळा
- जिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावरही प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध.
- प्रत्येक प्रा.आ.केंद्राच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद मंजूर
- दुर्गम व अतिदुर्गम भागात हिवतापाच्या तात्काळ निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किटचा पुरवठा.
- पी.फॅल्सीपफेरम या गंभीर स्वरुपाच्या हिवतापाचे शीघ्र निदान व उपचारासाठी '' आशा '' कार्यकर्तींना प्रशिक्षण.
- डेंगी/ चिकुनगुनिया आजाराच्या निदानासाठी राज्यात २३ सेंटीनल सेंटर्स असून त्यापैकी ८ सेंटर्स नवीन स्थापन केली असून २०११ – १२ पासून कार्यान्वित करण्यात आली आहेत.
(क) डास नियंत्रणासाठी उपाययोजना
- किटकनाशक फवारणी – राज्यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावांमध्ये सिंथेटीक प्रायरेथ्राईड गटातील किटकनाशकाची घरोघर फवारणी करण्यात येते.
- अळीनाशक फवारणी – नागरी हिवताप योजने अंतर्गत राज्यातील निवडक १५ शहरांमध्ये (मुंबईसह) डासोत्पत्ती स्थानांवर टेमिफॉस, बी.टी.आय. या अळीनाशकाची फवारणी करण्यात येते. राज्यात नागरी हिवताप योजनेत समाविष्ट असलेली १५ शहरे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, अकोला, पुणे व मुंबई.
- जीवशास्त्रीय उपाययोजना – किटकनाशकामुळे होणा-या प्रदूषणाचा विचार करुन राज्यामध्ये योग्य डासोत्पत्ती स्थानांमध्ये डास अळीभक्षक गप्पीमासे सोडण्यात येतात. सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविण्यात येते.आहे.
- किटकनाशक भारित मच्छरदाण्या – वर्ष २००५ पासून आतापर्यंत ५२७१ संवेदनशील निवडक गावांमध्ये १०.८७ लाख मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी ५ लाख मच्छशरदाण्या सुस्थितीत आहेत.
(ड) प्रशिक्षण
वैद्यकिय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, प्रयोगशाळा तंञज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांना किटकजन्य रोगांबाबत दरवर्षी नियमित प्रशिक्षण देण्यात येते.
(इ) मूल्यमापन व संनियंत्रण
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंञण कार्यक्रम योग्य रितीने राबविला जावा याकरीता राज्य /जिल्हा /तालुका / प्रा.आ.केंद्र स्तरावरुन क्षेत्रिय भेटीव्दारे मुल्यमापन व संनियंत्रण केले जाते.
(ई) हिवताप प्रतिरोध महिना
जून – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी जून मध्ये हिवताप प्रतिरोध महिना जिल्हा हिवताप अधिकारीमार्फत विविध उपक्रमाव्दारे गांव पातळीपर्यंत राबविण्यात येतो.
विविध उपक्रम – पदयात्रा, ग्रामसभा, प्रभातफे-या, कार्यशाळा, प्रशिक्षण विविध माध्यटमाव्दाीरे प्रसिध्दीर (वृत्तरपत्रे, हस्तधपत्रिका, भित्तींपत्रिका, भिंतीवरच्या म्हळणी, आकाशवाणी, दूरदर्शन, केबल टी.व्हीव. इत्या्दी.
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम –
महाराष्ट्रात १७ जिल्हे हत्तीरोग प्रभावित आहेत.
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाची महाराष्ट्र राज्यात १९५७ साली सुरुवात झाली असून सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे पथके अस्तित्वात आहेत.
- हत्तीरोग सर्वेक्षण पथके - ०६
- हत्तीरोग नियंत्रण पथके - १६
- हत्तीरोगरात्रचिकित्साणलये - ३४
- हत्तीरोग संशोधन नि प्रशिक्षण केंद्र - ०१
राज्यातील हत्तीरोग रुग्णांची वर्ष् २००९ पासूनची माहिती खालीलप्रमाणे.
वर्ष |
तपासण्यात आलेल्या व्यक्ती |
हत्तीरोग रुग्ण |
अंडवृध्दी शस्त्रक्रिया |
रक्तदुषित |
बाहयलक्षणेयुक्त |
२००९ |
१२३७८५३ |
५२४२ |
५७० |
३५९४ |
२०१० |
१२४८४१२ |
४७१६ |
२६९ |
३९४१ |
२०११ |
१३३७१०२ |
३८३७ |
१६३ |
३९४७ |
२०१२ |
१३८४२४० |
४१६१ |
२६६ |
३९३८ |
२०१३ |
१३९३८३३ |
३६६१ |
१८९ |
३५५२ |
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत उपाययोजना –
- सर्वेक्षण.
- पात्र अंडवृध्दी हत्तीरोग रुग्णांची शस्त्रक्रिया शिबीरे
- डासोत्पत्ती स्थानांची गणना करुन दर आठवडयास डासोत्पत्ती स्थानावर अळीनाशकाची फवारणी करणे.
- किटकशास्त्रीय सर्वेक्षणातंर्गत नियमितपणे डास व डासअळी घनतेची पहाणी करणे, तसेच डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडणे.
- हत्तीरोग रुग्णासाठी मॉर्बिडीटी क्लिनिक सुरु करणे.
- किरकोळ अभियांत्रिकि पध्दतीने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे / कमी करणे.
- हत्तीरोग विषयी आरोग्य शिक्षण देणे.
विशेष हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम –
दिनांक १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यात विशेष बाहयलक्षणेयुक्त हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येते.
२००९ पासून या मोहिमेची माहिती पुढील प्रमाणे -
अ.क्र. |
वर्ष |
आढळून आलेले बाहयलक्षणेयुक्त रुग्ण. |
हत्तीपायाचे |
अंडवृध्दीचे |
एकूण |
६ |
२००९ |
५३५८९ |
३९०८८ |
९२६०७ |
७ |
२०१० |
४७७२४ |
३३८७१ |
८१५९५ |
८ |
२०११ |
५०४७६ |
३१८७४ |
८२३५० |
९ |
२०१२ |
४४४०५ |
३२३९२ |
७६७९७ |
एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम –
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार वर्ष २००४ – ०५ पासून राज्यात हत्तीरोग दुरीकरण्यासाठी एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविली जाते.
या मोहिमेत राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील हत्तीरोगासाठी संवेदनशील अशा लोकसंख्येच्या क्षेत्रात (२ वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजारी रुग्ण वगळून ) सर्वांना हत्तीरोग विरोधी डी.ई.सी. गोळयांची वयोगटानुसार एक मात्रा खाऊ घालण्यात येते.
डेंगी ताप
डेंगी ताप – २००९ पासून राज्याची आकडेवारी
वर्ष |
डेंगी बाधित रुग्ण |
मृत्यू |
२००९ |
२२५५ |
२० |
२०१० |
१५७४ |
९ |
२०११ |
११३८ |
२५ |
२०१२ |
४३०५ |
११८ |
२०१३ |
५४३२ |
१२५ |
चिकुनगुन्या-
चिकुनगुन्याची वर्षनिहाय परिस्थिती
वर्ष |
चिकुनगुन्या बाधित रुग्ण |
२००९ |
४४३ |
२०१० |
१३९९ |
२०११ |
४६७ |
२०१२ |
२४६ |
२०१३ |
१५४ |
विषाणूजन्य मेंदूज्वर
- जपानी मेंदूज्वर –
या आजाराचा मृत्यूदर अधिक असल्याने हा सार्वजनिक आरोग्य दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आजार आहे.डासांच्या माध्यमातून पसरणारा हा एक प्राणीजन्य आजार आहे.
- चंडीपुरा मेंदूज्वर -
हा आजार प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतो. भारतातील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश्, छत्तीसगड या राज्यातील बहुतांश जिल्हयात हा आजार आढळतो. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश् व छत्तीसगडला लागून असलेल्या विदर्भातील जिल्हयामध्ये हा आजार मुख्यत्वे आढळतो.
रुग्ण तुरळक स्वरुपात व विखुरलेले असतात. चंडीपूरा आजाराच्या विषाणूचा प्रसार सॅन्डरफ्लाय माशी चावल्यामुळे होतो. सॅन्डरफ्लाय ही माशी डासापेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो. माशीचे पंख केसाळ असतात. माशीचा आकार १.५ ते २.५ मिलीमिटर असतो.
हा आजार ० ते १४ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये आढळतो.
- इतर विषाणूजन्य मेंदूज्वर – Accute Encephalitis Syndrome
ज्या विषाणूजन्य मेंदूज्वराचे वर्गीकरण जपानी मेंदूज्वर अथवा चंडीपुरा मेंदूज्वरात करता येत नाही असे आजार इतर विषाणूजन्य मेंदूज्वरात करण्यात येते.
विषाणूजन्य मेंदूज्वराची वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष |
जे.ई. |
चंडीपूरा |
ए.ई.एस. |
एकूण |
रुग्ण |
मृत्यू |
रुग्ण |
मृत्यू |
रुग्ण |
मृत्यू |
रुग्ण |
मृत्यू |
२००९ |
८ |
० |
५२ |
१५ |
३६ |
१५ |
९६ |
३० |
२०१० |
७ |
१ |
५० |
१६ |
२९ |
१६ |
८६ |
३३ |
२०११ |
१३ |
० |
११ |
३ |
१३ |
११ |
३७ |
१४ |
२०१२ |
११ |
० |
१८ + (२ जे.ई.+चंडीपूरा) |
१ |
४१ |
२६ |
७२ |
२७ |
२०१३ |
- |
- |
- |
- |
५ |
५ |
५ |
५ |
जे.ई. (मेंदूज्वर) प्रतिबंधक उपाययोजना.
- आरोग्य कर्मचा-यांमार्फत गृहभेटी, जलद ताप सर्वेक्षण,ताप रुग्णांचे रक्तनमूने घेऊन सर्व रुग्णांना हिवतापाचा गृहितोपचार देणे.
- रक्तनमूने तपासणीअंती हिवताप नसल्याचे आढळल्यास, संशयित जे.ई. ताप रुग्णांचे रक्तजलनमूने घेऊन एन.आय.व्ही व निवडक सेंटीनल सेंटर येथे विषाणू परिक्षणासाठी पाठविणे.
- किटकशास्त्रीय सर्वेक्षण.
- उद्रेकग्रस्त परिसरात धूरफवारणी.
- परिसर स्वच्छते विषयी जनतेस आरोग्य शिक्षण व डुकरांच्या संख्येवर नियंत्रण.
- नैसर्गिक डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेणे, व डासोत्पत्ती स्थानात डास अळीभक्षक गप्पीमासे सोडणे.
अचानकपणे दिसू लागतात. हा आजार अत्यंत भंयकर असून रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजनाः जे.ई. (मेंदूज्वर) प्रतिबंधात्मक उपाययोजनाप्रमाणे त्यासोबत उद्रेकग्रस्त गाव व त्याच्या परिसरातील ५ कि.मी. च्या क्षेत्रातील गावांमध्ये घरोघर किटकनाशक फवारणी.