साथरोग नियंत्रण कार्यक्रम

 

प्रस्‍तावना

जलजन्‍य आजारांचे दैनंदिन स्‍वरुपातील संनियंत्रणाचे महत्‍वपूर्ण कार्य साथरोग नियंत्रण कार्यक्रमामार्फत केले जाते. साथरोग रुग्‍णसंख्‍येत एखादया ठिकाणी ठराविक वेळेत अचानक वाढ झाल्यास त्‍याला साथरोग उद्रेक म्‍हणतात. आपल्‍याला आढळणा-या दैनंदिन रुग्‍णांमध्‍ये प्रामुख्‍याने ताप, अतिसार, खोकला इत्‍यादि लक्षणांचे रुग्‍ण जास्‍त प्रमाणात असतात. ही लक्षणे असणारे बरेचसे रोग संसंर्गजन्‍य असतात. साथरोग आजाराबाबत रुग्‍ण संख्‍या मर्यादित राहील व पर्यायाने मृत्‍यू टाळता येईल. यादृष्‍टीने विशेष प्रयत्‍न केले जातात. यासाठी गावभेटी मध्‍ये आरोग्‍य कर्मचा-यामार्फत घरोघर सर्वेक्षण केले जाते. आजारी व्‍यक्‍ती ओळखून त्‍वरित औषध उपचार केला जातो. साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गॅस्‍ट्रो, कॉलरा, अतिसार, काविळ, विषमज्‍वर या आजारांचे संनियंत्रण केले जाते.

उदि्दष्‍टे

 • जलजन्‍य आजारांचे उद्रेक टाळण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक व नियंत्रणात्माक उपाययोजना करणे.
 • जिल्‍हास्‍तरीय आरोग्‍य यंञणेस वेळोवेळी आवश्‍यक त्‍या मार्गदर्शक सूचना देणे.
 • पाणी गुणवत्‍ता नियंत्रण.
 • ब्लिचिंग पावडर गुणवत्‍ता नियंत्रण.
 • जलजन्‍य आजार टाळण्‍यासाठी सर्वसामान्‍य जनतेचे आरोग्‍य शिक्षण.
 • पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास आणि नागरी विकास विभागाशी आंतरविभागीय समन्‍वय ठेवणे.

अंमलबजावणी

राज्‍यस्‍तरावरील साथ रोग नियंत्रण कक्ष सहसंचालक आरोग्‍य सेवा, (हिवताप, हत्‍तीरोग व जलजन्‍यरोग) पुणे -१ यांच्‍या अधिपत्‍याखाली स्‍थापन करण्‍यात आला आहे. या कक्षामार्फत राज्‍यातील साथरोग नियंत्रणासाठी आवश्‍यक ते मार्गदर्शन, पर्यवेक्षण केले जाते.

सेवा देणा-या आरोग्‍य संस्‍था

उपकेंद्र स्‍तरापासून जिल्‍हा रुग्‍णालयांपर्यंतच्‍या सर्व संस्‍था साथरोग नियंत्रणात क्रियाशील सहभाग घेातात.

मनुष्य बळ

साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एकही पद मंजूर नाही. पटकी नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेल्‍या एकूण २३ (राजपञित २ व अराजपत्रित २१) अधिकारी /कर्मचा-यांमार्फत तसेच आरोग्‍य सेवेतील उपलब्‍ध मनुष्‍यबळामार्फत साथरोग नियंत्रणाचे कार्यकेले जाते.

विविध योजना व उपक्रम

जलजन्‍य आजार नियंत्रण कार्यक्रम अतंर्गत पाणी गुणवत्‍ता संनियंत्रणाव्दाररे वर्षातून दोनवेळा स्‍वच्‍छता सर्वेक्षण करण्‍यात येते. पावसाळयापुर्वी माहे मे-जून मध्‍ये व पावसाळयानंतर माहे नोव्‍हेंबर/ डिसेंबर मध्‍ये सदर सर्वेक्षण करण्‍यात येते. या सर्वेक्षणामुळे जलजन्‍य आजारांच्‍या संभाव्‍य साथीची सूचना मिळते. याव्‍दारे समस्‍या ग्रस्‍त गावांना/ग्रामपंचायतीना लाल कार्ड वाटप करण्‍यात येवून साथनियंञणाच्‍या दृष्‍टीने दूषित पाणी पुरवठा असणा-या अतिजोखमीच्‍या गावांबाबत दक्षता घेण्‍यात येते. जी समस्‍या ग्रस्‍त गावे नाहीत त्‍यांना हिरवे कार्ड देण्‍यात येते. माहे मे/जून २०१३ मध्‍ये झालेल्‍या स्‍वच्‍छता सर्वेक्षणात खालील प्रमाणे लाल व हिरव्‍या कार्डाचे वाटप करण्‍यात आले आहे.

कार्यक्रमाची सद्यस्थिती - जलजन्‍य आजारांची मागील ३ वर्षाची आकडेवारी दर्शविणारा तक्‍ता (साथउद्रेक व तुरळक स्‍वरुपात)
रोगाचे नाव २०१० २०११ २०१२ २०१३
ऊद्रेक लागण मृत्यु ऊद्रेक लागण मृत्यु ऊद्रेक लागण मृत्यु ऊद्रेक लागण मृत्यु
कॉलरा १०७२३ १२ २९१ ३३७ १५ ५५७
गॅस्‍ट्रो १८८ ७१८६ ७१ ३१ १८०१ ५२ २०७५ १४ २३ ७९९
अतिसार ८१ ५०१३ २० ३१ २३७१ ४९ २७१५ ४५ २०५१
काविळ १६ १३७९ १७ ७४२ २० ६३३७ ४२ १२ ३१९
विषमज्‍वर १०६ १३२ १५८
एकूण २९० २४४०७ १०७ ८७ ५३३७ १४ १२६ ११६२२ ६० ९५ ३७२६ २२
उ- उद्रेक ला- लागण मृ- मृत्‍यू

जलजन्‍य आजारांची मागील ३ वर्षाची आकडेवारी दर्शविणारा तक्‍ता (साथउद्रेक व तुरळक स्‍वरुपात)
रोगाचे नाव २०१० २०११ २०१२ २०१३
ला मृ ला मृ ला मृ ला मृ
कॉलरा २१६९७ २० ७००३ २४८४ ४१०५
गॅस्‍ट्रो २३०७७० ७७ १४९२११ ११ १२४२०० २८३७९७
अतिसार १७४०७७ २१ ९२६४१९ ४६६८५५ १०७८१९३
काविळ ७७९५ ४६ ६२४९ २९ १०५१८ ४७ ७३७३
विषमज्‍वर १२१५०८ ८४२७५ ६२६१० २०६७९२
लेप्‍टो ७५९ ३८ ४७६ १६ ५१४ १६ ४५३ २०
एकूण २००४१३८ १७५ ११७३६३३ ६१ ६६७१८१ ६७ १५८०७१३ ४२
ला- लागण मृ- मृत्‍यू

प्रतिबंधात्‍मक व नियंत्रणात्माक उपयायोजना

जलजन्‍य आजाराचे उद्रेक टाळण्‍यासाठी या कार्यालयामार्फत कृती योजना तयार करुन खालील प्रमाणे कार्यवाही करण्‍यात येते.
 1. जोखमीच्‍या गावांची यादी तयार करणे – अशा गावांच्‍या ग्रामपंचायतीना लाल रंगाचे कार्ड देवून साथरोग प्रतिबंधात्‍मक कार्यवाही करण्‍याची सूचना देण्‍यात येते. व जोखमीच्‍या नसलेल्‍या गावांना हिरव्‍या रंगाचे कार्ड देण्‍यात येते.
 2. पाणी पुरवठयाच्‍या पाईपमधील असलेल्‍या गळत्‍या शोधणे व दुरुस्‍ती करणे.
 3. सार्वजनिक विहीरी व कुपनलिकांच्‍या पाण्‍याची जिल्‍हा, राज्‍य आरोग्‍य प्रयोग शाळांमार्फत नियमित तपासणी करणे.
 4. ग्रामपंचायत नगरपालिका/महानगरपालिका अथवा जिल्‍हा परिषद यांच्‍या अंदाज पत्रकात ब्लिचिंग पावडरच्‍या खरेदीबाबत पाठपुरावा करणे.
 5. साथरोग नियंत्रणासाठी औषधांचा व इतर साहित्‍यांचा पुरेशा साठा नगरपालिका, जिल्‍हा परिषदा व महानगरपालिका यांचेकडे उपलब्‍ध असतो. तसेच या कार्यालयामार्फतही अत्‍यावश्‍यक औषध साठा पुरविला जातो.
 6. पिण्‍याच्‍या पाण्‍याची नियमित तपासणी करुन शुध्‍द पाणी पुरवठा करण्‍याबाबत संनियंत्रण करणे.
 7. रुग्‍ण सर्वेक्षण करणे साथरोगाच्‍या नियंत्रणासाठी प्रत्‍यक्ष सर्वेक्षण नियमित चालू असते. नियमित सर्वेक्ष्‍ाण हे तुरळक रुग्‍ण व सहवासित शोधणे यासाठी देखील उपयोगी ठरते.
 8. सर्व साथीच्‍या आजाराच्‍या रुग्‍णांवर तसेच सहवासितांवर उपचार करण्‍यासाठी सर्व ग्रामीण रुग्‍णालये, प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, उपकेंद्रे याठिकाणी उपचार व्‍यवस्‍था सुसज्‍ज ठेवण्‍यात येते.