|
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये माता मृत्यु व बाल मृत्यु कमी करणे हा महत्वाचा भाग आहे. या कार्यक्रमांतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम व इतर आनुषंगीक योजना राबविल्यामुळे आरोग्य संस्थातील प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयात गरोदर मातेस व एक वर्षाखालील आजारी बालकास मिळणा-या सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे व त्यांना वाहतूक सेवा उपलब्ध करुन देणे यासाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
|
प्रत्येक गरोदर मातेस प्रसुतीपुर्व, प्रसुती दरम्यान व प्रसुतीपश्चात आरोग्य सुविधा व प्रयोगशाळा चाचण्या व एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकांस प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार योग्यवेळी मोफत उपलब्ध करुन देणे हे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
|
शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर, २०११ नुसार जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम दिनांक ७ ऑक्टोबर, २०११ पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आला.
कार्यक्रमांच्या अंमलबजावणी व संनियंञण करण्यासाठी सहाय्यक संचालक माता आरोग्य यांना जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत राज्याचे नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात स्तरावर जिल्हा आर.सी.एच. अधिकारी यांना जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे. जिल्हा आरोग्य कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांना जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे.
|
गरोदर / प्रसुत माता यांच्यासाठी लाभ :
- गरोदरपणात व प्रसुतीपश्चात होणा–या गुतांगुंतीचे निदान व उपचार
- मोफत व विनाखर्च प्रसुती तसेच सिझेरियन शस्ञक्रिया
- मोफत औषधे व लागणारे साहित्य
- मोफत निदान व अत्यावश्यक प्रयोगशाळा चाचण्या ( रक्त व लघवी तपासणी तसेच सोनोग्राफी इत्यादी )
- मोफत आहार (स्वाभावीक प्रसुतीसाठी तीन दिवस व सिझेरियन शस्ञक्रिया प्रसुतीसाठी सात दिवस आरोग्य संस्थेत भरती असताना)
- मोफत रक्त पुरवठा
- मोफत वाहतुक व्यवस्था घरापासून आरोग्य संस्थेपर्यत, संदर्भसेवेसाठी एका आरोग्यफ संस्थेपासून दुस-या आरोग्य संस्थेपर्यत तसेच आरोग्य संस्थेसपासून घरापर्यंत
- शासकीय आरोग्य संस्थेत विनाशुल्क उपचार
एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकास देण्यात येणारे लाभ
- मोफत व विनाशुल्क उपचार
- मोफत औषधे व लागणारे साहित्य
- मोफत निदान व प्रयोगशाळा चाचण्या
- मोफत रक्त पुरवठा
- मोफत वाहतुक व्यवस्था – घरापासून आरोग्यं संस्थेपर्यत, संदर्भसेवेसाठी एका आरोग्य संस्थेपासून दुस-या आरोग्य संस्थेपर्यत तसेच आरोग्य, संस्थेपासून घरापर्यंत
|
- मोफत औषधे व लागणारे साहित्य केंद्रशासनाच्या सूचनेप्रमाणे माता व बालकांसाठी आवश्यक असणारी औषधे व लागणारे साहित्य यांचा जिल्ह्यांना राज्यस्तरावरुन पुरवठा.
- मोफत संदर्भ वाहतुक सेवा राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरीय कॉल सेंटर कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ३० जिल्ह्यांना १०२ हा टोल फ्री क्रमांक (नाशिक व सांगली वगळता, गडचिरोली टोल फ्री क्र.१०५६) देण्यात आलेला आहे. कॉल सेंटरच्या कॉल ऑपरेटर मार्फत वाहतूक सुविधेचे संनियंञण केले जाते. माता व बालके उपलब्ध सेवांच्या प्रकारानुसार जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भीत केली जातात तसेच परत त्यांना घरी सोडण्यात येते व आवश्यकता भासल्यास एका आरोग्य संस्थेतून दुस-या आरोग्य संस्थेपर्यंत मोफत वाहतूक सुविधा पुरविली जाते.
- मोफत प्रयोगशाळा चाचण्या – गरोदर मातेच्या प्रसुतीपुर्व, प्रसुतीदरम्यान तसेच प्रसुती पश्चात ६ आठवडेपर्यंत अत्यावश्यक तसेच गरजेनुसार प्रयोगशाळा चाचण्या मोफत केल्या जातात. आजारी बालकांना १ वर्षांपर्यंत आवश्यकतेनुसार मोफत प्रयोगशाळा चाचण्या केल्या जातात.
- मोफत आहार – प्रसुती झालेल्या मातांना आरोग्य संस्थेत भरती असे पर्यंत स्वाभावीक प्रसुतीसाठी तीन दिवस तर सिझेरियन शस्ञक्रिया प्रसुतीसाठी सात दिवस मोफत आहार दिला जातो. या कालावधीत मातेला बाळाचे, स्तनपान आहार व लसीकरण इत्यादी बाबत माहिती दिली जाते.
- मोफत रक्तपुरवठा – गंभीर व गुंतागुंतीच्या प्रसुती दरम्यान त्याचप्रमाणे गरोदरपणात वा प्रसुतीपश्चात उद्धभवणा-या गुंतागुती दरम्यान आवश्य्कतेनुसार मोफत रक्त पुरवठा व मोफत रक्तपसंक्रमण केले जाते.
- शासकीय आरोग्य संस्थेमध्ये विनाशुल्क उपचार.
|
उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्ये केंद्रे, ग्रामीण, रुग्णालय उपजिल्हा, रुग्णालय सामान्यत, रुग्णालय जिल्हा व स्ञी् रुग्णालय तसेच शासकीय वैदयकीय महाविदयालय रुग्णालय इत्यादी सर्व प्रकारच्या शासकीय आरोग्य संस्थांमार्फत सदर वरील सुविधा मोफत पुरविल्या जातात.
|
|