राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

 

प्रस्तावना

तंबाखू सेवन हे जगामधील बरेच आजार आणि मृत्‍युचे प्रतिबंध करता येण्‍यासारखे प्रमुख कारण आहे. जगामध्‍ये दरवर्षी जवळपास ६० लक्ष लोकांचा मृत्‍यु हा तंबाखू सेवनाने होतो. तसेच करण्‍यात आलेल्‍या अभ्‍यासानुसार वर्ष्‍ २०३० पर्यंत जगामध्‍ये ८० लाखापेक्षा जास्‍त लोकांचा मृत्‍यु हा तंबाखूच्‍या सेवनामुळे होण्‍याचे भाकित व्‍यक्‍त करण्‍यात आलेले आहे. सन २००४ च्‍या भारतातील तंबाखू नियंञणाच्‍या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी सुमारे ८ ते ९ लक्षलोकांचा मृत्‍यु हा तंबाखू सेवनामुळे होणा़-या आजारामुळे होतो. याकरिता ११ व्‍या पंचवार्षिक योजनेत सन २००७-०८ साली भारतसरकारच्‍या आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंञालयातर्फे राष्‍टीय तंबाखू नियंञण कार्यक्रम सुरु करण्‍यात आला हा कार्यक्रम २१ राज्‍यातील ४२ जिल्‍हयामध्‍ये प्रायोगिक तत्‍वावर सुरु करण्‍यात आला. राष्‍टीय तंबाखू नियंञण कार्यक्रम सुरु करण्‍यात आला. हा कार्यक्रम २१ राज्‍यातील ४२ जिल्‍हयामध्‍ये प्रायोगिक तत्‍वावर सुरु करण्‍यात आला. राष्‍टीय तंबाखू नियंञण कार्यक्रम सन २००९-१० या वर्षापासून महाराष्‍टात प्रायोगिक तत्‍वावर ठाणे व औरंगाबाद या जिल्‍हयात राबविण्‍यास सुरुवात झाली आहे.

उदिदष्‍टे

 • तंबाखूमुळे आरोग्‍यावर होणार दुष्‍परिणाम आणि तंबाखू नियंञण कायदयाविषयी मोठया प्रमाणावर जनजागृती करणे.
 • सिगारेट व अन्‍य तंबाखूजन्‍य उत्‍पादने कायदा २००३ याची प्रभावीपणे अंमलबजावणी.

उपक्रम

 • तंबाखुच्‍या दुष्‍परिणामाविषयी आणि तंबाखू नियंत्रण कायदयाविषयी संबंधीत शासकिय / खाजगी संस्‍थांच्‍या कर्मच्यार्‍यांना प्रशिक्षण.
 • तंबाखुच्‍या दुष्‍परिणामाविषयी विविध पध्‍दतीचा अवलंब करुन जनजागृती करणे
 • शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांना तंबाखुमुळे आरोग्‍यावर होणा़र्‍या दुष्‍परीणामाविषयी प्रशिक्षण देणे.
 • जिल्‍हा स्‍तरावर तंबाखु व्‍यसनमुक्‍तीकरिता समुपदेशन केंद्र चालविणे
 • तंबाखु नियंत्रण कायदयाच्‍या अंमलबजावणीबाबत तांत्रिक मदत करणे.
 • विविध सरकारी विभाग आणि बिनसरकारी संस्‍थांबरोबर कामे करुन तंबाखु नियंत्रण करणे.

कार्यक्रमांतर्गत उपलब्ध सेवा

 • प्रशिक्षण
 • राज्‍यस्‍तर आणि जिल्‍हास्‍तर विविध उपक्रमातून जनजागृती
 • शालेय प्रशिक्षण
 • तंबाखु नियंञण कायदयाच्‍या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण
 • तंबाखुमुक्‍ती समुपदेश्‍न केंद्र

कार्यक्रमाअंतर्गत सेवा केंद्रे

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ठाणे आणि औरंगाबाद हे दोन जिल्‍हे प्रायोगिक तत्‍वावर घेतले गेले असून सन २०१३-१४ मध्‍ये गडचिरोली या नविन जिल्‍हयाचा समावेश्‍ करण्‍यात आला आहे. राज्य पातळीवर राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष (STCC) व जिल्हा स्तरावर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाची (DTCC) स्थापना करण्‍यात आलेली आहे.

कार्यक्रमाची सदयस्थिती

जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रम (‘ठाणे व औरंगाबाद ) --

 1. १) राष्‍टीय तंबाखु नियंञण कार्यक्रमांतर्गत ठाणे व औरंगाबाद जिल्‍हयात खालील पदे भरण्‍यात आलेली आहेत.
  1. मानसपोचार तज्ञ
  2. समाजसेवक
  3. डाटा एन्‍टी ऑपरेटर
 2. ठाणे व औरंगाबाद जिल्‍हयात रुग्‍णालयात तंबाखू व्‍यसन मुक्‍तीकरिता समुपदेशन केंद्र स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत.
 3. राष्‍टीय तंबाख्‍ नियंञण कार्यक्रमाच्‍या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे ठाणे व औरंगाबाद जिल्‍हयात तंबाखू सोडण्‍यासाठी समुपदेश्‍क केंद्र स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत. या केद्रावर माहे एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत एकूण ५२३ रुग्‍णांनी समुपदेश्‍नाचा लाभ घेतला आहे.
 4. या कार्यक्रमांतर्गत विविध संबंधीत लोकांना तंबाखु नियंञणाबाबत प्रशिक्षणदेणे अपेक्षित आहे. उदा.आरोग्‍य कर्मचारी, कायदयाची अंमलबजावणी करणरे अधिकारी, शिक्षक इ.माहे एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत एकूण १८४० लोकांना तंबाखु नियंञणाबाबत प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.
 5. दोन्‍ही जिल्‍हयाच्‍या ठिकाणी माहे एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत एकूण ३८ शाळांमध्‍ये तंबाखु नियंञण विषयावर विदयार्थ्‍यासाठी विविध स्‍पर्धेचे आयोजन केले गेले, ज्‍यामध्‍ये एकूण ९९५५ विदयार्थ्‍यांचा सहभाग घेतला.
 6. जिल्‍हास्‍तरावर शालेयविदयार्थी आणि शिक्षक यांना तंबाखूमुळे आरोग्‍यावर होणा़-या दुष्‍परीणामाविषयी प्रशिक्षण देण्‍यात येते.
 7. जिल्‍हास्‍तरावर आशा बचत गटाच्‍या महिला तसेच इतर आरोग्‍य क्षेत्रात काम करणा-या कर्मचायांना तंबाखुमुळे आरोग्‍यावर होणा-या दुष्‍परीणामाविषयी प्रशिक्षण देण्‍यात येते.
 8. जिल्‍हास्‍तरावर विविध प्रसिध्‍दी अवलंब करुन समाजात तंबाखूच्‍या आरोग्‍यवरील दुष्‍परिणामाविषयी जनजाग्ृती करण्‍यात येते.

प्रमुख घडामोडी

 • राज्‍य नियंञण समिती (तंबाखू नियंञण कायदा- ५ कलम करीता) ( शासन निर्णय क्र. व्‍यसमु २००८ / प्र.क्र २४५/ आ-५, दि. ऑक्‍टोबर २००८) राज्‍यातील तंबाखू व तंबाखूजन्‍य पदार्थ यांच्‍या जाहिरातीवर असणा़या बंदीबाबत अंमलबजावणीचे करणे हे या समितीचे मुख्‍य उदिष्‍ट आहे.
 • राज्‍यस्‍तरीय समन्‍वय समितीची स्‍थापना (शासन निर्णय तंबाखू/बैठक २०१२/प्रक्र २६१/आरोग्‍य-५, २२ नोव्‍हेंबर, २०१२) मा. मुख्‍य सचिव महाराष्‍ट्र राज्‍य, हे या समितीचे अध्‍यक्ष असून मा. आयुक्‍त (कु.क) तथा अभियान संचालक, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान हे या समितीचे सदस्‍य सचिव आहेत. विविध सरकारी विभाग आणि बिनसरकारी संस्‍थांबरोबर समन्‍वय साधून राज्‍यात तंबाखू नियंञण करणे हे या समितीचे मुख्‍य उदिष्‍टे आहे.
 • राज्‍य तंबाखू नियंञण कक्षाची स्‍थापना (शासन निर्णय तंबाखू/बैठक २०१२/प्रक्र२६१/आरोग्‍य-५, ५ फेब्रुवारी २०१३)

Role of NGOs

जिल्‍हास्‍तरावर राष्‍टीय तंबाखु नियंञण कार्यक्रमांतर्गत खालील उपक्रमांमध्‍ये बिगर सरकारी संस्‍थांचा सहभाग घेऊ श्‍कतो.

 1. जिल्‍हास्‍तरावर विविध उपक्रमांचा अवलंब करुन तंबाखूच्‍या दुष्‍परिणामाविषयी जनजागृती करण्‍यासाठी.
 2. आरोगय कर्मचारी कायदा अंमलबजावणी ,महिला बचत गट तसेच इतर संस्‍था यांना तंबाखु नियंञणबाबतच्‍या विविध विषयांवर प्रशिक्षण देण्‍यासाठी.
 3. शालेय विदयार्थ्‍यामध्‍ये तंबाखू विरोधी जनजागृती करण्‍यासाठी व तसेच जिल्‍हास्स्‍तरावर तंबाखुमुक्‍त शाळा ि‍ह संकल्‍पना राबविण्‍यासाठी .

अनुदानाची उपलब्‍धता

सन २०१३-१४ मध्‍ये राष्‍टीय तंबाखु नियंञण कार्यक्रमासाठी खालील प्रमाणे अनुदानाचे प्रयोजन करण्‍यात आले आहे.

तपशील प्रती वर्ष्‍ मानके
जिल्‍हा तंबाखु नियंञण कक्ष ४०.००
अनावर्ती अनुदान १.००
आवर्ती अनुदान ३९.००
तंबाखु मुक्‍ती समुपदेश्‍न केंद्र ७.५०
अनावर्ती अनुदान २.५०
आवर्ती अनुदान ५.००