राष्ट्रीय आयोडिन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम

 

प्रस्तावना

भारत सरकारने गलगंड या कार्यक्रमाचे नाव 1992 नंतर आयोडिन न्युनता विकार नियंञण कार्यक्रम असे ठेवले आहे. आयोडिन हे महत्वाचे सुक्ष्म घटक आहे व ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. तसेच ते थायरॉईड हार्मोन तयार करणे कामी आवश्यक आहे.

रोज 150 मायक्रोग्रॅम ची शरीराला गरज असते. आयोडिन हे पाणी, मासे, समुद्रातील अन्ना‍मध्ये मिळते. आयोडिनचे प्रमाण हे पर्वताजवळ, पर्वतावरुन येणा-या पाण्यात कमी प्रमाणात असते.

आयोडिन कमी झाल्यामुळे खालील विकार संभावतात
 1. गलगंड
 2. शारीरिक व मानसिक वाढ कमी होणे
 3. उंची कमी होणे>
 4. उंची जास्त होणे
 5. गर्भपात होणे सारखे आजार उदभवतात

महाराष्ट्र राज्याची रुपरेषा

महाराष्ट्र् राज्यात गलगंड कार्यक्रम हा मध्यवर्ती आरोग्य समितीच्या् मार्गदर्शक सुचनेप्रमाणे खालील हेतुने दिला आहे.

 • गलगंड सर्वेक्षण करणे
 • आयोडिनयुक्तश मिठाची निर्मीती करणे
 • आयोडिनयुक्‍त मिठाचा वापर करणे
  • साधे मिठ वापरण्‍यावर बंदी आणणे (निवडक जिल्‍हयामध्‍ये )
  • मिठामधील आयोडिनची मात्रा तपासणे
 • आयोडिनयुक्‍त मिठाच्‍या वापरासाठी आरोग्‍य शिक्षण देणे
 • आयोडिनयुक्‍त मिठाचे पॅकेटस नियमित आदिवासी भागात वाटप करणे.

राज्‍यातील गलगंडची सध्‍याची परिस्थिती

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे 32 जिल्हे व 4 नवीन जिल्हे यांचा सर्व्हे झाला आहे. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणामध्ये सर्व जिल्हयाचे सर्वेक्षण केले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात आर्थिक तरतुदीसह 5 सर्वेक्षण टीम तयार केल्या आहेत. त्या नागपुर, कोल्हापुर औरंगाबाद पुणे, व नाशिक हे जिल्हे आहेत.

कार्यक्रमाची उददिष्‍टे

 1. कार्यक्रम आखणे व सर्वेक्षण करणे
 2. आयोडिन युक्‍त मिठाच्‍या वापराचे शिक्षण देणे
 3. मिठाचे नमुने तपासणे
 4. गलगंड रुग्णांना ओषधोपचार व सल्ला देणे

प्राथमिक आरोग्ये केंद्र व ग्रामीण रुग्णालयाचे नियमित कामकाज

ग्रामीण भागातील नियमित भेटीमध्ये संशयीत रोगी शोधणे, मिठाचे नमुने तपासणे, लघवीचे नमुने जमा करणे व आयोडिन मात्रा तपासणे, आरोग्य शिक्षण देणे