यॉज निर्मूलन कार्यक्रम

 

प्रस्‍तावना

राज्‍यातील चंद्रपूर व गडचिरोली हे दोन जिल्‍हे यॉज प्रभावित होते माञ सन २००१ ते २००७ दरम्‍यान घेतलेल्‍या शोध मोहिमेमध्‍ये यॉजचा एकही रुग्‍ण आढळलेला नाही.

अंमलबजावणी

चंद्रपूर व गडचिरोली जिल्‍हयात वर्षातून दोन वेळा जून व नोव्‍हेंबर मध्‍ये यॉज रुग्‍ण शोध मोहिम राबविण्‍यात येते. त्‍या दृष्‍टीने संबंधित मंडळ व जिल्‍हास्‍तरीय अधिकारी व कर्मचारी हे कृती योजनेनुसार कार्यवाही करतात. यॉज निर्मूलनाच्‍या अनुषंगाने राबविलेल्‍या प्रभावी उपाय योजनांमुळे २००१ पासून चंद्रपूर व गडचिरोली या जिल्‍हयासह महाराष्‍ट्रात एकही यॉज रुग्‍ण आढळून आला नाही.