कॉलरा

 
कॉलरा

कॉलरा हा आजार व्‍हीब्रीओ कॉलरा या विशिष्‍ट जीवाणुमुळे होतो. प्रथमतः जुलाब सुरु होतात व त्‍यानंतर उलटयाही होतात. कॉलरामध्‍ये पाण्‍यासारखे/भाताच्‍या पेजेसारखे पातळ जुलाब होतात. या आजारामध्‍ये निर्जलीकरण अत्‍यंत वेगात होते. कॉलरा (पटकी) ची लागण तुरळक व साथउद्रेक स्‍वरुपात होते. आजाराचा प्रसार वेगाने होतो.

 

आजाराचा प्रकार

जलजन्‍य आजार

आजाराचे वर्णन

उलटीसह अथवा उलटीशिवाय अचानक सुरु झालेले जुलाब

आजारावर परिणाम करणारे घटक

व्‍हीब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतडयाला संसर्ग झाल्‍याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयामधील स्‍ञी पुरुषांमध्‍ये आढळतो. रुग्‍णांच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क आल्‍यानंतर हे जंतू पाण्‍यामध्‍ये वाढतात. व असे अशुध्‍द पाणी पिण्‍यासाठी वा स्‍वयंपाकासाठी वापरल्‍यास या आजाराचा प्रसार होतो. मलनिसारणाच्‍या योग्‍य पध्‍दतीच्‍या अभावामुळे रुग्‍णाच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.

रोगप्रसार

रुग्‍णांच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क आल्‍यानंतर हे जंतू पाण्‍यामध्‍ये वाढतात. व असे अशुध्‍द पाणी पिण्‍यासाठी वा स्‍वयंपाकासाठी वापरल्‍यास या आजाराचा प्रसार होतो. मलनिस्सारणाच्‍या योग्‍य पध्‍दतीच्‍या अभावामुळे रुग्‍णाच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्‍ञोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.

रोगलक्ष्‍णे

पटकीचा अधिशयन कालावधी काही तास ते ५ दिवस असा आहे. पटकी रुग्‍णात खालील लक्षणे आढळतात

 • पाण्‍यासारखे/तांदळाच्‍या पेजेसारखे वारंवार जुलाब
 • उलटया
 • हदयाचे ठोके वाढणे
 • तोंडाला कोरड पडणे
 • तहान लागणे
 • स्‍नायूंमध्‍ये गोळे येणे
 • अस्‍वस्‍थ वाटणे

उपचार

 1. जुलाब-वांत्‍या चालू आहेत पण जलशुष्‍कता नाही क्षारसंजीवनीचा वापर करावा, तसेच पेज, सरबत इत्‍यादि घरगुती पेयांचा वापर करावा.
 2. जलशुष्‍कतेची लक्षणे असल्‍यास – क्षारसं‍जीवनी व घरगुती पेय द्यावी.
 3. तीव्र जलशुष्‍कता असल्‍यास रुग्‍णास नजिकच्‍या प्राथमिक आरोगय केंद्र / ग्रामीण रुगणालय येथे उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्‍टेट देण्‍यात यावे.
 4. झिंक टॅबलेट मुळेअतिसाराचा कालावधी २५ टक्‍याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाण‍ही घटते.
जलशुष्‍कता कमी करण्‍याबरोबर योग्‍य प्रतिज्यविकांची (अॅन्टीकबायोटिक्स्ची) योग्‍य माञा (डोस) देण्‍यात यावी.

प्रतिबंधात्‍मक उपाय

 1. शुध्‍द पाणी पुरवठा
 2. वैयक्तिक स्‍वच्‍छता
 3. हात नेहमी साबणाने व स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवावेत –
  • खाण्‍यापूर्वी व स्‍वयंपाकापूर्वी
  • बाळाला भरविण्‍यापूर्वी
  • शैाचानंतर
  • बाळाची शी धुतल्‍यानंतर
  • जुलाब असलेल्‍या रुग्‍णांची सेवा केल्‍यानंतर
  • साबण उपलब्‍ध नसेल तर आपण आपले हात राखेनेही स्‍वच्‍छ करु शेकतो.
 4. मानवी विष्‍ठेची योग्‍य विल्‍हेवाट
 5. रुग्‍णांवर त्‍वरित उपचार
 6. बालकाचे गोवर प्रतिबंधात्‍मक लसिकरण अतिसाराच्‍या नियंञणासाठी आवश्‍यक आहे.