मानसिक रोग

 
मानसिक रोग

मानसिक आजार ही एक वैदयकीय अवस्था असून यामध्ये माणसाच्या भावना, विचार, परस्पर सबंध व दैनंदीन जीवनातल्या गोष्टी यावर विपरित परिणाम होतो. ज्याप्रमाणे मधुमेह हा स्वादूपिंडाचा (pancreas) आजार असतो त्याचप्रमाणे मानसिक आजार हा सुध्दा एक वैदयकीय आजार असून दैनंदीन जीवनात विविध नित्यं गरजा पुरविताना त्या मुळे अडचण निर्माण होते.

 

उदासिनता

  • थकवा येणे, झोप न येणे, भूक कमी होणे, गळून गेल्यासारखे वाटणे.
  • सतत उदास , निराश वाटणे, सर्व गोष्टीचा कंटाळा येणे.
  • आवडणा-या गोष्टीमध्ये, मन न लागणे
  • शारिरीक लक्षणे उदा. जीव घाबरणे, धडधड होणे किंवा दुखणे.
  • वैयक्तिक सामाजिक कौटुंबिक , व्यावसायिक आणि शैक्षणिक जबाबदा-या पार पाडण्याची असमर्थता येणे.

वेडसरपणा

  • भ्रामक कल्पना (चुकीची पण ठाम अशी समजूत / संशय)
  • वर्तणुकीतील दोष ( उदा. शरीराची निगा, काळजी न राखणे, असंबंधित बोलणे)
  • भास ( उदा. कानात विविध आवाज येणे, डोळयांसमोर चिञ – विचिञ गोष्टी दिसणे इ. )
  • उन्माद अवस्था ( अतिउत्साही वाटणे, विनाकारण आनंदी होणे, अकारण बडबडत राहणे इ.)

मदयपान

  • दारूच्याच नशेत असल्याचा अवतार ( चेहरा सुजलेला, डोळे तारवटलेले आणि तोंडाला दारुचा वास इ. )
  • मदयपानाचे दुष्परिणाम ( झोप न येणे उलटी, मळमळ, पोटात आग होणे, डोके जड होणे इ. )
  • दैनंदीन जीवनातील / सामाजिक जीवनातील / कामाच्या ठिकाणी दर्जा घसरणे

स्मृतिभ्रंश

  • स्मंरणशक्ती कमी होणे, काळ, ठिकाण यांचे भान न राहणे.
  • चिडचिड किंवा भ्रमिष्ट होणे
  • दैनंदीन जीवनात साध्या जबाबदा-या पार पाडू न शकणे.

मुलांच्या वर्तणुकीत दोष

  • लक्ष न देणे, उतावीळपणा, संयमाचा अभाव.
  • मानसिक चंचलता, एका ठिकाणी बसू न शकणे, अस्वस्थ असणे.
  • इतरांना उपद्रव होईल अशा प्रकारे वागणे ( उदा. हटृी , जिदृीपणा, कठोर वतर्णूक जेष्ठां चा अवमान करणे, आज्ञेचे पालन न करणे )

आंतरराष्‍ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन (Anti Narcotics ) 21 जून

अ.क्र. दिन महिना
जागतिक निद्रा दिन 15 मार्च
अपस्‍मार दिन (Epilepsy Day ) 26 मार्च
गतिमंद जागृकता दिन २ एप्रिल
जागतिक आरोग्‍य दिन 7 एप्रिल
स्क्रिझोफेनिया दिन 24 मे
तंबाखू विरोधी दिन 31 मे
व्‍यसनमुक्‍ती दिन 21 जून
आंतरराष्‍ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन (Anti Narcotics ) 21 जून
आत्‍महत्‍या प्रतिबंधक दिन 10 सप्‍टेंबर
१० अलझायमर्स दिन 21 सप्‍टेंबर
११ जागतिक हास्‍य दिन 7 ऑक्‍टोंबर
१२ जागतिक मानसिक आरोग्‍य दिन 10 ऑक्‍टोबर
१३ राष्‍ट्रीय ताण तणाव जागृती दिन 7 नोव्‍हेंबर