इन्फल्युएंझा ए.एच. १ एन १

 
इन्फल्युएंझा ए.एच. १ एन १


 

आजाराचा प्रकार

हवेवाटे पसरणारा आजार

बोली भाषेतील नाव

स्वाईन फ्ल्यू

साथरोगशास्त्रीय घटक

स्‍वाईन फल्‍यू या नावाने ओळखला जाणारा हा आजार २००९ मध्‍ये साथस्‍वरुपात जगभर पसरला. हिवाळा आणि पावसाळ्यात या रोगाचे रुग्ण प्रामुख्याने आढ्ळतात.

रोग जंतु विषयक माहिती

इंफ्ल्युएंझा हा आर एन ए प्रकारचा विषाणू असून तो जनुकिय दृष्ट्या अत्यंत लवचिक आहे.

अतिजोखमीच्‍या व्‍यक्‍ती

इन्‍फल्‍युएंझा हा आजार कोणत्‍याही वयोगटातील स्‍ञी पुरुषास होऊ शकतो. विशेष करुन खालील व्‍यक्‍ती इन्‍फल्‍यूएंझा संदर्भात अतिजोखमीच्‍या आहेत.

 • ५ वर्षाखालील मुले
 • ६५ वर्षावरील प्रौढ व्‍यक्‍ती
 • पूर्वीचे जुनाट आजार असलेल्‍या व्‍यक्‍ती – उदा. दमा, हदयाचे आजार, मूञपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्‍त अथवा चेतासंस्‍थेचे विकार
 • औषधे/ आजारामुळे प्रतिकार शक्‍ती कमी झालेल्‍या व्‍यक्‍ती – उदा – स्‍टेरॉईडस प्रकारातील औषधे दीर्घ काळापासून घेणा-या व्‍यक्‍ती अथवा एचआयव्‍ही बाधित रुग्‍ण
 • गरोदर माता
 • स्‍थूल व्‍यक्‍ती इत्‍यादी.
हिवाळा तसेच पावसाळयात इन्‍फल्‍युएंझाचे रुग्‍ण वाढताना दिसतात.

आजारावर परिणाम करणारे घटक

समशितोष्ण कटिबंधात हा आजार मुख्यत्वे हिवाळ्यात व पावसाळ्यात आढळतो. भारतासारख्या संमिश्र हवामानाच्या देशात या आजाराचे रुग्ण वर्षभर आढळतात. गर्दी,सामाजिक समारंभ,जत्रा यामुळे या आजाराच्या प्रसारास मदत होते. शाळा,वसतिगृहे अशा ठिकाणीही हा आजार वेगाने पसरतो.

प्रसाराचे माध्‍यम

इन्‍फल्‍युएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार असून तो मुख्‍यत्‍वे हवेवाटे पसरतो. आजारी व्‍यक्‍तीच्‍या शिंकण्‍या - खोकण्‍यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्‍णापासून इतर निरोगी व्‍यक्‍तीकडे पसरतात.

अधिशयन कालावधी

१ ते ७ दिवस

लक्षणे

 • ताप
 • डोकेदुखी
 • अंगदुखी
 • घसादुखी
 • खोकला
 • थकवा
लहान मुलांमध्‍ये उलटी व जुलाब ही लक्षणे ही आढळतात.

निदान

आर.टी.पी.सीआर.पध्दतीने या आजाराचे निदान करता येते. या साठी रूग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेणे आवश्यक असते. महाराष्‍ट्रात खालील प्रयोगशाळांमध्‍ये इन्‍फल्‍यूएंझा निदानाची व्‍यवस्‍था आहे.

 • राष्‍ट्रीय विषाणू विज्ञान संस्‍था पुणे
 • हाफकिन संशोधन संस्‍था, मुंबई
 • कस्‍तुरबा संसर्गजन्‍य आजार रुगणालय, मुंबई

उपचार

या आजारावर ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत.

 • इन्‍फल्‍युएंझा लसीकरण
इन्‍फल्‍युएंझा करिता इंजेक्‍शनव्दारे दयावयाची (Killed Vaccine) आणि नेसल स्‍प्रे स्‍वरुपातील (Live attenuated Vaccine) लस उपलब्‍ध आहे. खालील व्‍यक्‍तींनी प्राधान्‍याने इन्‍फल्‍युएंझा लसीकरण करुन घेणे आवश्‍यक आहे.
 1. गंभीर स्‍वाईन फल्‍यू रुग्‍णांवर उपचार करणारे डॉक्‍टर्स आणि अवैद्यकीय कर्मचारी
 2. इन्‍फल्‍युएंझा संसर्गाकरिता अतिजोखमीच्‍या व्‍यक्‍ती.
 3. डॉक्‍टराच्‍या मार्गदर्शनानुसार लस घेण्‍यात यावी.

प्रतिबंधात्‍मक उपाय

 1. इन्‍फल्‍युएंझा ए एच१ एन १ टाळण्‍यासाठी हे करा –
  • वारंवार साबण व स्‍वच्‍छ पाण्‍याने हात धुवा.
  • पौष्टिक आहार घ्‍या.
  • लिंबु, आवळा, मोसंबी, संञी, हिरव्‍या पालेभाज्‍या या सारख्‍या आरोग्‍यदायी पदार्थांचा आहारात वापर करा.
  • धुम्रपान टाळा.
  • पुरेशी झोप आणि विश्रांती घ्‍या.
  • भरपूर पाणी प्‍या.
 2. इन्‍फल्‍युएंझा ए एच १ एन १ टाळण्‍याकरता हे करु नकाः –
  • हस्‍तांदोलन
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  • डॉक्‍टरांच्‍या सल्‍याशिवाय औषध घेऊ नका.
  • आपल्‍याला फल्‍यू सदृश्‍य लक्षणे असतील तर गर्दीच्‍या ठिकाणी जाऊ नका.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येणा-या प्रतिबंधात्मक उपाय योजना

 • फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
 • तपासणी व उपचार सुविधा
 • प्रयोगशाळा निदान सुविधा
 • फ्ल्यू विरोधी औषधांचा पुरेसा पुरवठा
 • खाजगी रुग्णालयांशी समन्वय
 • डॉक्टर्स व इतर कर्मचा-यांचे प्रशिक्षण
 • आरोग्य शिक्षण