चिकुनगुन्‍या

 
चिकुनगुन्‍या

चिकुनगुन्‍या हा अरबो व्‍हायरस या विषाणूमुळे होणारा व एडिस इजिप्‍टी या डासामुळे पसरणारा आजार आहे.साहिली भाषेतील एका शब्दापासून या आजाराच्या नावाची उत्पत्ती झाली आहे.

 

रोगाचा प्रकार

विषाणूजन्य आजार

नैसर्गिक इतिहास

चिकुनगुन्‍या हा अरबो व्‍हायरस या विषाणूमुळे होणारा व एडिस इजिप्‍टी या डासामुळे पसरणारा आजार आहे.साहिली भाषेतील एका शब्दापासून या आजाराच्या नावाची उत्पत्ती झाली आहे.

जबाबदार घटक

डास व चिकुनगुन्‍या विषाणू

प्रसाराचे माध्‍यम

चिकुनगुन्‍या आजार हा दुषित एडीस इजिप्‍टी डासाची मादी चावल्‍यामुळे होतो. ही डासाची मादी चिकुनगुन्‍या आजारी रुग्‍णाचे रक्‍त शोषून बाधित होत असते.

अधिशयनकाळ

आजाराची लक्षणे साधारणतः दूषित डास चावल्‍यावर ३ ते ७ दिवसारनंतर दिसून येतात. या आजाराचा अधिशयन काळ ४ –७ दिवस आहे.

लक्षणे व चिन्हे

चिकुनगुन्‍या आजाराची सुरुवात अचानक खालील लक्षणांसह होते.

 • ताप
 • हुडहुडी भरणे
 • डोके दुखणे
 • मळमळ होणे
 • ओकारी होणे
 • तीव्र सांधेदुखी
 • अंगावरील पुरळ
या आजारात वाक येणे किंवा कमरेतून वाकलेला रुग्‍ण हे अतिशय नेहमी आढळणारे लक्षणे आहे. चिकुनगुन्‍या आजारातून बरे होताना पुष्‍कळदा नेहमी व सतत राहणारी सांधेदुखी आढळून येते. त्‍याकरीता दिर्घकाळ वेदनाशामक उपचारांची गरज भासू शकते.

रोगाचेनिदान

चिकुनगुन्‍या आजाराचे निदान एलायझा या रक्‍त तपासणी (ELISA TEST ) व्‍दारे करण्‍यात येते.

औषधोपचार

चिकुनगुन्‍या आजाराकरीता विशिष्‍ट असा औषधोपचार उपलब्‍ध नाही. या आजारात लक्षणांनुसार उपचार केल्‍यास व वेदनाशामक औषध घेतल्‍यास तसेच भरपूर आराम केल्‍यास रुग्‍णाला फायदयाचे ठरते. आजारी व्‍यक्तिला डास चावू नये, याकरीता काळजी घ्‍यावी. जेणेकरुन इतर व्‍यक्तिमध्‍ये आजाराचा प्रसार होणार नाही.

आरोग्‍यशिक्षण

जनतेला खालील बाबीकरीता आरोग्‍य शिक्षण देण्‍यात यावे.

 • घरातील पाणी साठविण्‍याची सर्व भांडी आठवडयातून रिकामी करा.
 • पाणी साठविण्‍याची सर्व भांडी योग्‍य पध्‍दतीने झाकून ठेवा.
 • घराच्‍या भोवतालचा परिसर स्‍वच्‍छ व कोरडा ठेवावा.
 • निरुपयोगी व टाकाऊ वस्‍तू घराच्‍या छतावर आणि परिसरात ठेवू नका.
 • शक्‍यतो पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत.