चंडीपुरा मेंदूज्‍वर

 
चंडीपुरा मेंदूज्‍वर


 

रोगाचा प्रकार

किटकजन्‍य रोग

साथरोग घटक

 • हा आजार प्रामुख्‍याने ग्रामीण भागात आढळतो.
 • भारतातील महाराष्ट्रण, आंध्रप्रदेश छत्तीसगड या राज्याातील बहुतांश जिल्हेयात हा आजार आढळतो. महाराष्ट्रा, आंध्रप्रदेश व छत्तीयसगडला लागून असलेल्या
 • रुग्‍ण तुरळक स्‍वरुपात व विखुरलेले असतात.
 • हा आजार ० ते १४ वर्ष वयोगटातील बालकांमध्‍ये आढळतो.

रोगकारक घटक

चंडीपूरा हा नवीन विषाणू असून नागपूर परिसरातील चंदीपूर या भागात रुग्‍णांच्‍या रक्‍तजलनमूने सर्वेक्षणात आढळून आला त्‍यावरुन त्‍याचे नाव चंडीपूरा ठेवण्‍यात आलेले आहे. चंडीपूरा आजाराच्‍या विषाणूचा प्रसार सॅन्‍डफलाय माशी चावल्‍यामुळे होतो. सॅन्‍डफलाय ही माशी डासापेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो. माशीचे पंख केसाळ असतात. माशीचा आकार १.५ ते २.५ मिलीमिटर असतो. भारतातामध्‍ये सॅन्‍डफलायच्‍या एकूण ३० प्रजाती आढळून येतात. सॅन्‍डफलाय या माश्‍या राञीच्‍या वेळी जास्‍त क्रियाशील असतात व त्‍यांचा चावा अत्‍यंत वेदनादायक असतो. त्‍या क्‍वचितच दृष्‍टीपथास पडतात. दिवसा सॅन्‍डफलाय माश्‍या घरातील अंधा-या जागा, भिंतीमधील भेगा व खड्डे यामध्‍ये राहतात. सॅन्‍डफलाय राञी क्रियाशील होऊन घरातील व्‍यक्‍तीचा चावा घेतात. मादी माशीला दर ३ किंवा ४ दिवसांनी अंडी घालण्‍याकरीता रक्‍ताची आवश्‍यकता असते.

हा आजार कोणाला होतो

हा आजार १४ वर्षाखालील मुलांमध्ये विशेष करुन आढळून येतो.

पर्यावरणीय घटक

हा आजार मुख्‍यतः ग्रामीण व आदिवासी भागात आढळतो. सदयस्थितीस शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये देखील रुग्‍णांचे प्रमाण आढळून येत आहे.

रोगप्रसाराचे माध्‍यम

हा आजार दुषित सॅन्‍डफलाय मादी माशीच्‍या चावल्‍यामुळे होतो. फक्‍त मादी सॅन्‍डफलाय माशीला अंडीच्‍या पोषणाकरीता रक्‍ताची आवश्‍यकता असते त्‍यामुळे तिने चावा घेतल्याने विषाणूचा प्रसार होतो.

अधिशयन काळ

या आजाराचा अधिशयन काळ काही तास ते २ – ३ दिवस असतो.

लक्षणे

या आजारामध्ये रोगाची लक्षणे अचानक सुरु होतात.

 • तीव्र डोकेदुखी
 • उलटी
 • झटके येणे
 • अर्धबेशुध्दावस्था
अशी लक्षणे आढळतात.

रोगाचेनिदान

या आजाराची प्रयोगशालेय तपासणी राष्‍ट्रीय विषाणू विज्ञान संस्‍था पुणे तसेच काही निवडक सेंटीनल हॉस्‍पीटलमध्‍येही केली जाते.

औषधोपचार

या आजारावर निश्चित असा उपचार नाही.परंतु रुग्णाच्या लक्षणानुसार वेळेत केलेला उपचार मोलाचा ठरतो.

प्रतिबंधात्‍मक आणि नियंत्रणात्‍मक उपाययोजनाः

या आजाराची सॅन्‍डफलाय माशी ही वाहक आहे व ती उत्‍पत्‍ती स्‍थानापासून फार दूर जाऊ शकत नाही त्‍यामुळे त्‍यांचे नियंञण करणे सोपे आहे. सॅन्‍डफलाय माशीचे नियंञण खालीलप्रमाणे करता येते.

 1. किटकनाशके– किटकनाशकाची फवारणी घरामध्‍ये, गोठयामध्‍ये व इतर अंधार असलेल्‍या जागेवर करावे.
 2. परिसर स्‍वच्‍छता – राहत्‍या घराच्‍या पन्‍नास यार्ड परिसरातील झाडे झुडपे खड्डे व कच-याची स्‍वच्‍छता करावी. घरातील भिंतीच्‍या भेगा बुजविणे तसेच पाळीव प्राण्‍यांचा गोठा व कोंबडयांची खुराडे राहत्‍या घरापासून दूर ठेवावी.
 3. शेणखताचे ढिगारे गावापासून दूर ठेवावे.

आरोग्‍य शिक्षण संदेश

 • घराचा परिसर स्वच्छ ठेवा.
 • घराच्या भिंतीच्या भेगा बुजवा.
 • पाळीव जनावरांचे गोठे,कोंबड्याचे खुराडे यांची स्वच्छता बाळगा.