रस्त्यांवरील अपघात

 
रस्त्यांवरील अपघात

जगात दरोरोज सुमारे ३४०० लोक रस्‍तयावर अपघातामुळे मृत्‍युमुखी पडतात. १० लक्ष दक्ष लोकांना इजा होत असते किंवा ते अपंग होत असतात. रस्‍त्‍यांवर लहान मुले वयोवृध्‍द व सायकल चालवणा़याना अपघाताचा सर्वात जास्‍त धोका संभवतो. विश्‍वस्‍वास्‍थ संघटना विविध देशातील सरकारी व स्‍वयंसेवी संस्‍था सोबत मिळून रस्‍तयावरील अपघात टाळण्‍याकरिता वर्णनात्मक सुचना तयार करत आहेत. ज्‍यात हेलमेटचा वापर करणे, वाहन चालविताना सिट बेल्‍ट आवश्‍यक लावणे, मदयपान करुन गाडी न चालवणे, अधिक वेगाने गाडी न चालवणे इत्‍यादींचा समावेश्‍ आहे.

 

वाहतुक अपघात / धडकने

वाहतुक एका वाहनाची दुस़या वाहनास, पायी चालणा़या व्‍यक्‍तीस, जनावरांस, रस्‍त्‍यावरील कच़याच्‍या ढिगा़्यास, झाडास, किंवा विजेच्‍या खांबास झालेल्‍या धडकिंस अपघात असे म्‍हणतात. वाहतुक अपघातामुळे इजा,मृत्‍यु, वाहनास नुकसान, व संपत्‍तीस नुकसान होण्‍याचे संभव असते. वाहन धडकीस वाहनाच्‍या आकारामान, वाहनाची गती, रस्‍तयाचे प्रकार, वाहन चालकाची कसब, व व्‍यवहार इत्‍यादी घटक कारणीभुत असतात. रत्‍यावरच्‍या वाहनाची संख्‍या, वाहनामुळे झालेले प्रवास बघता वाहन अपघातांची आकडेवारी जरी फार कमी असली तरीही अपघातास कारणीभुत वरील घटक टाळल्‍यास ते अजून कमी करता येतील. भारतात सुद्धा अपघाताचे दर वाढत असून रस्त्यावरील वाढलेली रहदारी, वाहन संख्या, वाहतूक संबंधी नियमांचा योग्य पालन न होणे, सर्वसामान्यांमध्ये वाहतूक नियम बद्दलचे अज्ञान हि करणे प्रामुख्याने जबाबदार आहेत. २००८ साली प्राप्त आकड्यानुसार भारतात एकूण १४४,५८७ लोक रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडले.

प्रगत देशांमध्ये चार चाकी वाहनांमुळे तर प्रगतीशील देशांमध्ये दुचाकी वाहनांमुळे रस्त्यावरील अपघात होतात असे निरीक्षणास आलेले आहे. प्रगतीशील देशांमध्ये वाहतूक अपघातातील काही प्रमुख करणे पुढील प्रमाणे आहेत

 • रस्‍त्‍यावरील वाहनांसोबत पायी चालणा़याची व जनावरांची गर्दी. बहुतेक शहरामध्‍ये पायी चालणा़यांस व वाहनांसाठी उपयोगी वेगळे मार्ग / लेन उपलब्‍ध नाहीत.
 • भरपुर प्रमाणात जीर्ण व निगा न राखलेले वाहन
 • रस्‍त्‍यावर मोटर सायकल, स्‍कुटर, मोपेड इत्‍यादी अति प्रमाणात दुचाकी वाहनांची वर्दळ
 • निकृष्‍ट ड्रायव्‍हींग स्‍टंडर्ड
 • रस्‍त्‍यावरील बसेसचे अधिक प्रमाण.अधिकांश बस या प्रमाणबाहेर भरलेल्‍या असणे.
 • वाहतुक नियंमांची अनदेखी
 • अव्‍यवस्‍थतीत रस्‍ते, रस्‍तयाकाठी लाईट नसने, रस्‍त्‍यांचा सदोश ले आऊट, सदोश गतीरोधक, अव्‍यवस्थित पध्‍दतीचे चौररस्‍ते

मानवी घटक

अपघात होण्‍यास कारणीभूत मानवी घटकात वाहन चालक व रस्‍ता उपयोगात आणाणाया सर्व घटकांचा समावेश होतो. उदा. वाहन चालकाची वागणूक, कमजोर नजर व श्रवण शक्‍ती निर्णय क्ष्‍मता इत्‍यादी.

१९८५ साली इंग्रज व अमेरिकेत अपघाताच्याी माहितीत वाहनचालकाची चुक, मदय धुंद अवस्थाउ , अमली पदार्थाचा अमल ९३ टक्केघ वाहतुक अपघातास जबाबदार होते. इंग्रज वाहकचालकांनवर केलेल्यार आर ए सी सर्व्हे्शनानुसार असे समोर आले की, बहुतांश वाहनचालक यांनी स्वाताला उत्तलम वाहन चालक असून त्यांकची चुक नाही असे समजले आहे. एका सर्व्हेनशनानुसार उत्तनम वाहन चालवण्या‍करिता पुढील गोष्टींघची समज आवश्यसक आहे.

 • वाहनाचे आकारमान, क्षमता याची जाण असून वाहनावर ताबा असणे.
 • रस्‍ता, हवामान, वातावरण व रस्‍त्‍याकडील फलक याची जाणीव असणे.
 • सजकता व इतर वाहन चालकांच्‍या क्षमतेचे योग्‍य आकलन.

वाहतुक अपघात टाळण्‍यासाठी अवलंबनात आणावयाची उपाय योजना

 • वाहतुक सुरक्षेबददल शिक्षण-
  शालेय जीवनापासूनच विदयार्थ्‍यांना वाहतुक नियमांबददल, अपघातास कारणीभूत घटक व सुरक्षात्‍मक उपाय योजनेची व अपघात झाल्‍यास प्राथमिक उपचाराची सक्‍तीची माहिती देणे. व्‍यवस्थित निगा राखलेल्‍या वाहनातच वाहन चालविणे शिकविणे.
 • सुरक्षात्‍मक उपायोजनेचे प्रसार-
  1. दुचाकी चालविताना हेलमेटचा वापर
  2. चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्‍ट लावणे
  3. वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे
  4. रस्‍त्‍यांना अनुसरुन योग्‍य डिझााईनचे वाहन निवडणे
  5. वाहनांची दारे व्‍यवस्थित बंद होतात व इतर यंञणा व्‍यवस्थित असल्‍याची खाञी करणे
 • वाहन चालवताना मदय व अमलीपदारर्थाचा वापर टाळणे.
 • अपघातास कारणीभूत असणारे घटक दूर करणे- जसे
  1. रस्‍ते व्‍यवस्थित ठेवणे
  2. नियमित खडगे बुझाविणे
  3. योग्‍य गती मर्यादा पाळणे
  4. धोक्‍याच्‍या वळणाच्‍या ठिकाणी सुचना फलक लावणे इत्‍यादी
 • वाहतुक नियम सक्‍तीने लागू करणे व त्‍यांचे पालन करणे
 • अपघात झाल्‍यास प्राथमिक चिकित्‍सा व तत्‍काळ सेवा उपलब्‍ध करुन देणे