राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार २०१२ मध्ये रा.ग्रा.आ.अ., ई-ऑफीसला पहिले पारितोषिक रा.ग्रा.आ.अ. ई-ऑफीस

Dated:13-03-2013

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्राच्या ई-ऑफिस कार्य प्रणालीसाठी वर्ष 2012-2013 चा राजीव गांघी प्रशासकीय गतीमानता अभियान प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.   हा पुरस्कार सोहळा 28 मार्च 2013 रोजी मंत्रालय येथे आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळयामध्ये मा. श्री. विकास खारगे, आयुक्त (कुटुंब कल्याण), तथा अभियान संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांना हा पुरस्कार मानपत्र व रोख रुपये १०.०० लाख या स्वरूपात मा. उपमुख्य मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत, मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण, मुख्य मंत्री महोदय महाराष्ट्र राज्‍य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राज्यातील ई-प्रशासन प्रकल्प या क्षेत्रात सार्वजनीक प्रशासकीय रचनेमध्ये कागद रहित पद्धतीद्वारे पारदर्शकता व माहितीची सहज उपलब्धता मिळविण्यासाठी राज्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अग्रेसर आहे. फिजिकल स्वरूपातील नसती हाताळणे व त्याची हालचाल याचा अंतिम निकाल लावण्यासाठी भविष्यात ई-फाईल प्रणालीचे उपयोगीयता / विश्वसनीयतेची खात्री रखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाने दि. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

ई-फाईल प्रणाली मध्ये नियमित पत्रे, आवक – जावक टपालाचे संनियंत्रण, वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचना / शेरा व निर्णयासह नस्तीची सहज हालचाल, याची पद्धतशिर व टप्प्या-टप्प्याने कार्यपद्धती याची ऑनलाइन संगणकीय प्रणाली ई–फाईल मध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे.

डिसेंबर २०१२ आखेरपर्यंत मुंबई कार्यालयाती २७० अधिकारी व पुणे कार्यालयातील २२५ अधिकारी यांनी एकूण ११,००० पेक्षा जास्त नसत्या या प्रणालीद्वारे निकाली काढण्यात आल्या आहेत. यामुळे नस्तीची जलद हालचाल होऊन वेळेची बचत होते. कार्यालयीन कामकाजामध्ये संपूर्ण पारदर्शकता येऊन त्यामुळे त्वरित निर्णय घेणे शक्य झाले आहे.

ही एक सुरक्षित वेब-आधारित पद्धती असल्याने, विशेषतः अधिकारी दौर्‍यावर असताना नस्तीचा निकाल लावण्यासाठी अत्यंत सोपे झाले आहे. मा. आयुक्त (कुटुंब कल्याण), तथा अभियान संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे गुजरात येथे २३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१२ या एक महिन्याच्या निवडणूक कर्तव्य कालावाधीत एकूण ७०१ नसत्या तर उनाओ जिल्हा, उत्तर प्रदेश येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये २१ दिवसाच्या निवडणूक कर्तव्य कालावाधीत एकूण ३६० नस्ती निकाली काढल्या. ई- ऑफिस व ई-बँकिंग यांचे एकत्रीकरण झाल्यामुळे आर्थिक व्यवहार सोपे व जलद झाले आहेत. ई-ऑफिस द्वारे मोठ्या रक्कमचे देयकांचे मान्य प्रस्तावांची अदायगी विक्रेता, कर्मचारी तसेच क्षेत्रीय अधिकारी यांना अनुदान वितरित करणे हे सर्व ई-बँकिंग प्रणालीमध्ये एका बटणाच्या क्लिकने शक्य झाले आहे.

संपूर्ण विभाग ई-फाइल एखादी ई- फाइल शोधून पाहू शकते तर कर्मचारीही त्यांच्या विभागाचे कोणतेही आदेश, नस्ती / कागदपत्रे search engine द्वारे शोधू शकतात. सदर प्रणालीमध्ये एकाच स्क्रीनवर ई-मेल, आवक- जावक, सर्व आवश्यक प्रारूप व इतर संबंधित संकेतस्थळे जसे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, ई- बँकिंग, इ. यांच्या लिंक उपलब्ध आहेत ज्यामुळे विविधा ठिकाणी माहिती न शोधता वेळ वाचवणे शक्य होते.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ई- फाइल प्रणालीचा सकारात्मक प्रभाव होऊन, आमचे प्रोत्साहन व मार्गदर्शन यामुळे मंत्रालयातील विविध विभाग, संचालनालय आरोग्य सेवा, मुंबई तसेच पुणे येथील राज्यातील सार्वजनिक आरोग्यची कार्यक्रम प्रमुख कार्यालये, बृहन्मुंबई महानगरपालिका व सिंधुदुर्ग तहसिलदार कार्यालय येथे सदर प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ८ परिमंडळातील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालये व ३३ जिल्ह्यातील कार्यालयामध्ये (जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी) लवकरच सदर प्रणालीचा विस्तार करण्यात येणार आहे.


Document: First prize at the Rajiv Gandhi Prashaskiya Gatimaanta Abhiyaan Award for 2012 to NRHM e-office First prize at the Rajiv Gandhi Prashaskiya Gatimaanta Abhiyaan Award for 2012 to NRHM e-office( 1835 KB Image )