दृष्टीक्षेपास अर्थसंकल्प

सार्वजनिक आरोग्य

राज्यामध्ये आरोग्य संस्थांचे जाळे असून आरोग्य सेवेची त्रिस्तरीय योजना राज्यात राबविली जाते व या योजनेमार्फत ग्रामीण जनतेला विशेषत: गरीब व जोखमीच्या लोकांना गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा पुरविल्या जातात. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविणे हे राज्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यामध्ये विविध राष्ट्रीय आरोग्याचे कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमुळे राज्याने आरोग्याच्या विविध दर्शकांबाबत बरीच प्रगती केलेली आहे. त्यामुळे राज्यातुन नारू, देवी, सिस्टेओयासिस या रोगांचे समूळ उच्चाटन केले आहे. तसेच राज्यात 2011 पासून पोलिओचे रूग्ण आढळलेले नाहीत. हिवताप निर्मुलन, कुष्ठरोग नियंत्रण आणि अंधत्व नियंत्रणासारखे राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले जातात. सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची मध्यवर्ती कल्पना कुटुंब कल्याण कार्यक्रम चालू ठेवणे ही आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सामुहिक आरोग्य केंद्रे अशा आरोग्य विषयक मुलभूत सुविधा पाहोचविणे यावर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये भर दिला आहे. मानसिक आरोग्य दक्षता एडस नियंत्रण, कर्करोग नियंत्रण आणि आदिवासी क्षेत्रामध्ये खास आरोग्य सेवा पुरविणे या कार्यक्रमावर भर दिलेला आहे. तसेच पावसाळयामध्ये मलेरिया, गॅस्ट्रो  आणि पावसामुळे होणाऱ्या इतर रोगांचा फैलाव होण्यापासून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले आहेत.

सन २०१४-१५ ते २०18-19  करिता अर्थसंकल्पित व खर्चित निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

(रु. कोटीत. )

वर्ष

 

अर्थसंकल्पित निधी

खर्च

% खर्चाचे अर्थसंकल्पित  निधीशी

योजनातंर्गत योजना (प्‍लान)

योजनेत्‍तर  योजना

(नॅान  प्‍लान)#

एकूण

योजनातंर्गत योजना (प्‍लान)

योजनेत्‍तर  योजना

(नॅान  प्‍लान)

एकूण

 

राज्‍य

जिल्‍हा

 

 

राज्‍य

जिल्‍हा

 

 

 

२०१४-१५

५६०९.३१

३३९.०८

२८६०.१४

८८०८.५३

३३६६.९६

३१३.८८

२७६५.८६

६४४६.७०

७३.१८%

२०१५-१६

५१५७.६७

६१५.

३२६१.१५

९०३४.४२

४८५४.२४

५३५.६६

३२१२.४०

८६०२.३०

९५.२१ %

२०१६-१७

5370.73

593.52

3851.12

9815.37

4225.00

539.00

3702.00

8476.00

86.35 %

2017-18

4529.38

550.14

4143.58

9223.10

3965.57*

१७१.६७

 

 

 

2018-19

(अर्थसंकल्पित)

४५८९.९७

-

-

-

-

-

-

-

-

# सदर माहिती सहायक संचालक पुणे यांच्‍याकडुन प्राप्‍त.

* खर्च माहे फेब्रुवारी २०१८ अखेर  

                                              

                                  

 

                                           

 

                                               योजनांतर्गत योजनांचे नियंत्रक कार्यालयनिहाय तपशील.

 

                     

(रु. कोटीत)

 

कार्यालयाचे नाव

योजना प्रकार

 प्रस्‍तावित नियतव्‍यय      २०१७-१८

सुधारीत अंदाज२०१७-१८

  खर्च २८ फेब्रु २०१८ अखेर

अर्थसंकल्पित २०१८-१९

 

राज्‍य

केन्‍द्र

एकूण

राज्‍य

केन्‍द्र

एकूण

राज्‍य

केन्‍द्र

एकूण

राज्‍य

केन्‍द्र

एकूण

 

आरोग्‍य सेवा संचालनालय

सर्व साधारण

296.06

118.54

414.60

400.07

118.80

518.87

253.41

1.84

255.25

277.10

132.92

410.02

 

आरोग्‍य सेवा संचालनालय  एकूण

296.06

118.54

414.60

400.07

118.80

518.87

२५३.४१

1.84

255.25

277.10

132.92

410.02

 

राज्‍य रक्‍त संक्रमण परिषद

सर्व साधारण

44.00

0.00

44.00

44.00

0.00

44.00

5.62

0.00

5.62

25.00

0.00

25.00

 

कुटुंब कल्‍याण कार्यक्रम

सर्व साधारण

68.03

768.04

836.07

68.03

768.04

836.07

147.12

530.26

677.38

130.73

849.41

980.13

 

कुटुंब कल्‍याण कार्यक्रम  एकूण

68.03

768.04

836.07

68.03

768.04

836.07

१४७.१२

५३०.२६

६७७.३८

१३०.७३

८४९.४१

९८०.१३

 

सामाजिक सुरक्षा व कल्‍याण कायर्क्रम

सर्व साधारण

2.98

0.00

2.98

2.98

0.00

2.98

1.70

0.00

1.70

2.50

0.00

2.50

 

महात्‍मा जोतीबा फुले जन आरोग्‍य योजना

सर्व साधारण

443.04

0.00

443.04

1670.10

0.00

1670.10

1178.80

0.00

1178.80

341.50

0.00

341.50

 

वि.घ.यो

25.01

0.00

25.01

40.01

0.00

40.01

25.00

0.00

25.00

220.00

0.00

220.00

 

आ.वि.यो

5.00

0.00

5.00

5.00

0.00

5.00

5.00

0.00

5.00

0.00

0.00

0.00

 

महात्‍मा जोतीबा फुले जन आरोग्‍य योजना एकूण

473.05

0.00

473.05

1715.11

0.00

1715.11

१२०८.८०

०.००

१२०८.८०

५६१.५०

०.००

५६१.५०

 

राष्‍ट्रीय आयुष अभियान

सर्व साधारण

10.00

18.56

28.56

18.28

41.94

60.23

0.00

18.56

18.56

10.00

18.53

28.53

 

वि.घ.यो

1.85

2.78

4.63

1.89

2.93

4.82

0.00

0.19

0.19

1.85

2.78

4.63

 

आ.वि.यो

0.00

2.20

2.20

0.00

2.20

2.20

0.00

0.00

0.00

0.00

0.00

0.00

 

राष्‍ट्रीय आयुष अभियान एकूण

11.85

23.54

35.39

20.17

47.07

67.24

०.००

१८.७५

१८.७५

११.८५

२१.३०

३३.१६

 

राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान

सर्व साधारण

513.28

1309.65

1822.93

1024.19

1558.40

2582.58

718.86

537.64

1256.50

617.43

1378.95

1996.38

 

वि.घ.यो

125.60

196.18

321.79

236.82

316.77

553.59

145.30

185.79

331.09

136.14

206.56

342.70

 

आ.वि.यो.

12.78

155.32

168.10

12.78

155.32

168.10

0.00

110.38

110.38

0.00

0.00

0.00

 

राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान एकूण

651.66

1661.16

2312.82

1273.79

2030.49

3304.28

८६४.१६

८३३.८०

१६९७.९६

७५३.५७

१५८५.५१

२३३९.०८

 

सेक्रेटरियेट -सामाजिक सेवा

सर्व साधारण

3.40

2.69

6.09

3.40

2.69

6.09

1.44

1.62

3.06

2.10

2.69

4.79

 

महाराष्‍ट्र राज्‍य एड्स नियंत्रण सोसायटी

सर्व साधारण

0.00

104.61

104.61

0.00

104.61

104.61

0.00

0.00

0.00

0.00

0.00

0.00

 

मुंबई जिल्‍हा एड्स नियंत्रण सोसायटी

सर्व साधारण

0.00

40.88

40.88

0.00

40.88

40.88

0.00

0.00

0.00

0.00

0.00

0.00

 

बांधकामे

सर्व साधारण

302.50

0.00

302.50

302.50

0.00

302.50

97.06

0.00

97.06

233.80

0.00

233.80

 

 एकूण

सर्व साधारण

1683.29

2362.97

4046.26

3533.56

2635.35

6168.91

2404.00

1089.91

3493.92

1640.16

2382.49

4022.64

 

वि.घ.यो

152.47

198.96

351.43

278.72

319.70

598.42

170.30

185.97

365.28

357.99

209.34

567.33

 

आ.वि.यो

17.78

157.52

175.30

17.78

157.52

175.30

5.00

110.38

115.38

0.00

0.00

0.00

 

 एकूण

1853.54

2719.45

4572.99

3830.06

3112.57

6942.63

2579.31

1386.27

3965.57

1998.15

2591.83

4589.97

 

                                           

 

 

आरोग्‍य सेवा संचालनालय-

          आरोग्‍य  सेवा संचालनालय हे  प्रामुख्‍याने वैदयकीय सहाय ,संसर्गजन्‍य रोगांचे नियंत्रण, कुटुबं कल्‍याण , माता व बाल संगोपन , प्रदूषिकरण संबंधित स्‍वच्‍छता , सकस आहार सेवा आणि वैदयकीय उमेदवांराना प्रशिक्षण या बाबी पाहते. सन २०१८-१९ साठी एकूण अर्थसंकल्पित नियतव्‍यय रु. ४१०.०२ कोटी आहे.

राज्‍य रक्‍त संक्रमण सेवा-

        राज्‍य रक्‍त संक्रमण परिषद या कार्यालयाची स्‍थापना राज्‍य शासन निर्णय दिनांक ४ जुलै ,१९९६ अन्‍वये सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आदेशानुसार करण्‍यात आली आहे. तसेच परिषदेची नोदणी रजिस्‍टार ऑफ सोयायटी अॅक्‍ट १८६० अंतर्गत करण्‍यात आली आहे. सदर संस्‍थेचा मुळ उद्देश राज्‍यात सुरक्षित रक्‍ताचा पुरेसा पुरवठा वाजवी किंमतीत व्‍हावा असा आहे. सन २०१८-१९ साठी एकूण अर्थसंकल्पित नियतव्‍यय रु. २५.०० कोटी आहे.

महात्‍मा ज्‍योतिबा फुले जन आरोग्य योजना -

          राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्‍याप्‍ती विस्‍तारून जास्‍तीत जास्‍त लाभार्थ्‍यांना  योजनेतील वैद्यकीय उपचारांचा लाभ देण्‍याकरीता आर्थिक वर्ष सन २०१७-१८ मध्‍ये महात्‍मा ज्‍योतिबा फुले जन आरोग्‍य योजना संपूर्ण राज्‍यात राबविण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाने घेतला आहे. या नवीन योजनेमध्‍ये नवीन लाभार्थी घटकांचा समावेश, प्रति कुटुंब प्रति वर्ष विमा संरक्षणाच्‍या मर्यादेत वाढ, अंगीकृत रूग्‍णालयांच्‍या संख्‍येत वाढ, नवीन उपचार पद्धतींचा समावेश इ. बाबींचा अंतर्भाव आहे. सदर योजनेसाठी सन २०१८-१९ साठी एकूण अर्थसंकल्पित नियतव्‍यय रू. ५६१.५० कोटी आहे.

कुटुबं कल्‍याण कार्यक्रम-

         लोकसंख्‍या वाढीवर नियंत्रण आणण्‍यासाठी राज्‍यात केंद्रशासनाने दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनांच्‍या आधारे कुटुबं कल्‍याण कार्यक्रम राबविण्‍यात येतो. तसेच सद्यस्थितीत राज्‍याने १८ इतका एकूण जननदर साध्‍य केलेला आहे.  पुढे    येणा-या वर्षात एकूण जननदराची ही पातळी कायम ठेवण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. सन २०१८-१९ साठी एकूण अर्थसंकल्पित नियतव्‍यय रु. ९८०.१३ कोटी आहे.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM) 

राज्‍यातील जनतेला विशेषत: ग्रामीण जनता, गरीब महिला व मुले यांना गुणवत्‍तापुर्ण सेवा उपलब्‍ध करून देणे. हे या अभियानाचे ध्‍येय आहे. या शिवाय अर्भक व माता मृत्‍यूदर कमी करणे, आरोग्‍य सेवांची उपलब्‍धता वाढविणे, सांसर्गिक व असांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व नियंत्रण करणे, सर्व समावेशक व दर्जेदार गुणवत्‍तापूर्ण प्राथमिक सेवा उपलब्‍ध करणे, लोकसंख्‍या स्थिरीकरण,  आरोग्‍य सेवामध्‍ये आयुषचा समावेश करणे, आरोग्‍यदायी जीवनशैलीचे संवर्धन करणे ही अभियानाची विशिष्‍ट उद्दिष्‍टे आहेत. सन २०१८-१९ साठी एकूण अर्थसंकल्पित नियतव्‍यय रु. २३३९.०८ कोटी आहे.

 

राष्‍ट्रीय आयुष अभियान

आयुष विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी १२ व्‍या पंच‍वार्षिक योजनेत राष्‍ट्रीय आयुष अभियानांची अंमलबजावणी सुरू केली आहे.राष्‍ट्रीय आयुष अभियानाचा मुळ उद्देश आयुष चिकित्‍सा प्रणाली प्रोत्‍साहन देणे हा आहे. राष्‍ट्रीय आयुष अभियानामध्‍ये कमी खर्चात प्रभावी आयुष औषध उपचार, आयुष शिक्षण प्रणालीचे बळकटीकरण, आयुर्वेद, सिध्‍द आणि युनानी आणि होमिओपॅथी औषधाची गुणवत्‍ता नियंत्रण अंमलबजावणी करण्‍याची सोय आणि औषधे तयार करण्‍यासाठी लागणा-या वनस्‍पती व अन्‍य बाबी यांची नियमित उपलब्‍धता यांचा समावेश आहे.  सन २०१८-१९ साठी एकूण अर्थसंकल्पित नियतव्‍यय रु. ३३.१६ कोटी आहे.

प्रधान सचिव

        मंत्रालयस्‍तरावर सार्वजनिक आरोग्‍य विभाग हा अतिरिक्‍त प्रधान सचिव यांचे अंतर्गत येतो. याविभागाचे  प्रशासन व इतर प्रमुख धोरणात्‍मक निर्णय हे सचिव पातळीवर घेतले जातात सन २०१८-१९ साठी एकूण अर्थसंकल्पित नियतव्‍यय रु. ४.७९ कोटी आहे.

 राष्‍ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रम-

       राष्‍ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रम हा महाराष्‍ट्र राज्‍य एडस नियंत्रण सोसायटी व मुबंई एडस नियंत्रण सोसायटी यांचेमार्फत राबविण्‍यात येतो. जागृती मोहिम आणि विशिष्‍ट गटातील लोकांचे प्रबोधन व तपासणी करणे हे राष्‍ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्‍टय आहे. त्‍या करीता सेक्‍शुली ट्रान्‍समिटेड डिसीज क्लिनिकमधील रोग्‍यांची व गर्भवती महिलांच्‍या रक्‍ताची नमुना तपासणी केली जाते.

बांधकामे-

सन २०१८-१९ साठी एकूण अर्थसंकल्पित नियतव्‍यय रु. २३३.८० कोटी आहे.