राज्य रक्तदान संक्रमण परिषद

परिचय / ध्येय / उद्देश

महाराष्ट्रामध्ये राज्य रक्त संक्रमण परिषदेची स्थापना दि ४ जानेवारी १९९६ च्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या दि २ व ४ जुलै १९९६ च्या शासकीय आदेशानुसार करण्यात आली आहे. ही परिषद एक संस्था म्हणून १८६०च्या अधिनियमानुसार संस्थांच्या निबंधकांकडे २२ जानेवारी १९९७ रोजी व त्यानंतर मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम १९५० अंतर्गत न्यास म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे दि १७ फेब्रुवारी १९९८ प्रमाणे नोंदण्यात आली आहे.

वाजवी शुल्कामध्ये रक्त व रक्त घटकांची उपलबद्धता गरजू लाभार्थ्यांना करून देणे हा परिषदेचा मुख्य हेतू आहे. 

सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील १४ प्रतीनिधीच्या नियामक परिषदेकडे  परिषदेच्या व्यवस्थापनाचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव हे या परिषदेचे उपाध्यक्ष  आहेत.   आरोग्य सेवा संचालक हे परिषदेचे संचालक असून परिषदेच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्यांना सहायक संचालक आरोग्य सेवा ( रक्त संक्रमण ) यांचेकडून साहाय्य केले जाते.