राष्ट्रीय कर्करोग मधुमेह व पक्षाघातप्रतिबंधक कार्यक्रम

 

पार्श्वभुमि

असंसर्ग्जन्यरोग हे अतितीव्र आजार म्हणुनसुद्धा ओळखले जातत. यात प्रामुख्यने ह्रुदय्रोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग, आणि अपघात यांचा समावेश होतो. या सर्व आजारांचे मुख्य कारण म्हणजे तम्बाखुचे सेवन, धुम्रपान, असमतोल आहर, मानसिक तणाव आणि दैनंदीन जिवनशैलितील बदल इ. असे समजण्यात येते कि भारतमध्ये सर्वसाधारणपणे मधुमेह, उच्चरक्तदब, ह्रुदय्रोग आणि पक्षाघात यांचे अनुक्रमे ६.२%, १५.९%, ३.७% आणि ०.१५% ई. नुसार प्राबल्य आढळते.

भारतामध्ये अंदाजे २५ लक्ष कर्करोगी आहेत. या असंसर्गजन्यरोगच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी राष्ट्रिय कर्करोग, मधुमेह, ह्रदय्रोग आणि पक्षाघात प्रतिबंध व नियंञण कार्यक्रम राबविण्‍यास सुरुवात केलेली आहे. याकरीता केंद्र शासनाकडुन ८०% तर राज्‍यशासनाकडुन २०% अनुदान प्राप्‍त होणार आहे. महाराष्‍ट्रराज्‍यात हा कार्यक्रम अमरावती, गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा, वर्धा आणि वाशिम या जिल्‍हयांमध्‍ये राबविला जात आहे.

उद्दिष्टे

  • स्‍वभाव आणि जिवनशैलितील बदलांच्‍या माध्‍यमातुन सर्वसामान्‍य असंसर्गजन्‍यरोगांवर प्रतिबंध आणि नियंञण ठेवणे
  • सर्वसामान्‍य असंसर्गजन्‍यरोगाचे निदान व उपचार लवकर होण्‍यासाठी सुविधा पुरविणे
  • सर्वसामान्‍य असंसर्गजन्‍यरोगांचा प्रतिबंध, निदान आणि उपचार करण्‍यासाठी वेग‍वेगळया स्‍तरावरील आरोग्‍य यंञणेचे बाळकटीकरण करणे.
  • वाढत्‍या असंसर्गजन्‍यरोगांना आळा घालण्‍याकरीता आरोग्‍य संस्‍थामधील वैद्याकिय अधिकारी, पॅरामेडिकल स्‍टाफ, परीचारीका यांना प्रशिक्षण देणे.
  • उपशामक आणि पुनर्वसनाच्‍या सेवा विकसित करणे

अंमलबजावणी पद्धती

  • वर्तनबदलामधुन प्रतिबंध
  • लवकर निदान आणि उपचार
  • क्षमतानिर्मिती, देखरेख्‍, संनियंञण आणि मुल्‍यमापन

उपक्रम

राज्‍यस्‍तरीय असंसर्गजन्‍यरोग नियंञण कक्ष

आरोग्‍य सेवा संचालनालय, मुबई येथे राज्‍यस्‍तरीय असंसर्गजन्‍यरोगाची स्‍थापना करण्यात आलेली आहे. संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, नियंञण आणि मुल्‍यमापन करुन भौतिक आणि आर्थिक ध्‍येय गाठण्‍याची जबाबदारी या कक्षाची आहे. हा कक्ष राज्‍य कार्यक्रम अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील.

जिल्‍हा असंसर्गजन्‍यरोग नियंञण कक्ष

कार्यक्रमराबविल्‍या जाणा-या जिल्‍हयांमध्‍ये जिल्‍हा मुख्‍यालयात जिल्‍हा असंसर्गजन्‍यरोग नियंञण कक्षाची स्‍थापना केली जाईल. जिल्यामध्‍ये कार्यक्रमाअंतर्गत राबविल्‍याजाणा-या विविध उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी, नियंञण आणि मुल्‍यमापन करुन भौतिक आणि आर्थिक ध्‍येय गाठण्‍याची जबाबदारी या कक्षाची आहे.

जिल्‍हा रुग्‍णालय

  1. कर्करोग, मधुमेह, उच्‍चरक्‍तदाब, हदयाचे आजार इत्‍यादीचे लवकरात लवकर निदान
  2. कॉर्डियाक इंन्‍झााईम, लिपीीड प्रोफाईल, कोयाग्‍युलेशन पॉरामिटर्र्स,ईसीजी,इको व इतर तपासणया करणे.
  3. ग्रामीण आरोग्‍य व् प्रथमिक आरोग्‍य केंद्र येथून संदर्भित केलेल्‍या हायरिक्‍त रुग्‍णांवर उपचार करणे
  4. रुग्‍णांची वेळोवेळी विचारणाकरणे, वर्तन बदलासाठी आरोग्‍य विषयक जनजाग.ती करणे.
  5. कर्करोग रुग्‍णासाठी डे केअर सुविधा उपलब्‍ध करुन देणे.

उपजिल्‍हा / ग्रामीण रुग्‍णालयस्‍तर

ग्रामीण रुग्‍णालयात नियमित एन.सी.डी. क्लिीनीक सरु ठेवणे. रुगणालयात येणा़-या सर्व ३० वर्षावरील व्‍यक्‍तींची डॉक्‍टर मार्फत एनसीडी क्लिीकमध्‍ये तपासणी करावी. त्‍यातप्रामुख्‍याने तंबाखु, धुम्रपान व दारुचे सेवन याबाबत विचारणा व सर्वाचे ब्‍लड शुगर, रक्‍तदाब तपासणी, ईसीजी, ब्‍लड क्‍लोरेस्‍टॉल व आवश्‍यकतकेनुसार सोनाग्राफी, एक्‍सरे याबाबत चाचण्‍याकराव्‍यात. मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब व स्‍ट्रोक केसेसवर योग्‍य तो उपचार करावा.

प्रआकें आणि उपकेंद्र

प्राथमिक आरोग्‍य केंद्रांतर्गत उपकेंद्रातील ए.एन.एम. आणि एम.पी. डब्‍ल्‍यु यांनी सदर कार्यक्रमाबाबात जनजाग्रती करणे यात प्रामुख्‍याने खालील बाबींचा समावेश होतो.

  1. सकस आहार, नियमीत व्‍यायाम
  2. तंबाखु, धमु्रपान व दारुाचे सेवन टाळणे, मानसिक तणावातून मुक्‍तता
  3. कर्करोगाच्‍या धोक्‍याच्‍या सुचना

शिबीर आणि विशिष्‍ट दिवशी ए.एन.एम. किंवा आरोग्‍य सहायक यांनी तीस वर्षांवरील सर्व व्‍यकतींची दारुचे आणि तंबाखुचे सेवन, व्‍यायाम, रक्‍तशर्करा, रक्‍तदाब यांची तपासणी करावी. या तपासणीच्‍या दरम्‍यान आरोग्‍य सहायकांनी तपासणीच्‍यावेळी वजन, उंची आणि बी.एम.आय. इ. ची चाचणी करावी. रक्‍तशर्करा मोजण्‍याकरीता ग्‍लुकोस्टि्प्‍स आणि लॅन‍सेटस्‍ आरोग्‍य सहायकांना पुरविले जाईल. ए.एन.एम. आणि आरोग्‍य सहायक यांनी मधुमेह आणि उच्‍चरक्‍तदाबाकरीता संशयीत रुग्‍णांना उपजिल्‍हा/ग्रामिण रुग्‍णालय किंवा उच्‍च स्‍तरावर पुढिल निदान आणि उपचाराकरीता संदर्भित करावे.

कार्यक्रमाअंतर्गत पुरविण्याात येणा-या सुविधा

अनु.क्र. आरोग्‍य केंद्र सेवा
उपकेंद्र वर्तन बदलाकरीता जनजाग्रुती, रक्‍तदाब आणि मधुमेहाची तपासणी करणे, संशयीत रुग्‍णांना उपजिल्‍हा/ ग्रामिण रुग्‍णालय किंवा जिल्‍हा रुग्‍णालय येथे संदर्भित करणे.
प्राथमिक आरोग्‍य केंद्र वर्तन बदलाकरीता जनजाग्रुती, रक्‍तदाब आणि मधुमेहाची तपासणी करणे, संशयीत रुग्‍णांना उपजिल्‍हा/ ग्रामिण रुग्‍णालय किंवा जिल्‍हा रुग्‍णालय येथे संदर्भित करणे.
उपजिल्‍हा / ग्रामिण रुग्‍णालय वैद्यकिय किंवा प्रयोगशाळा चाचण्‍यांद्वारे लवकर निदान करणे. समुपदेशनातुन प्रतिबंधात्‍मक जनजाग्रुती करणे. मधुमेह, ह्रदयरोग, लकवा आणि कर्करोग यासर्वसामान्‍य असंसर्गजन्‍यरोगांचे व्‍यवस्‍थापन करणे. ग्रुह भेटी दरम्‍यान अंथरुणावर खिळलेल्‍या रुग्‍णांना भेट देणे समुपदेशन करणे आणि गंभीर रुग्‍णांना जिल्‍हा रुग्‍णालयाकरीता संदर्भित करणे.
जिल्‍हा रुग्‍णालय मधुमेह, ह्रदयरोग, लकवा आणि कर्करोग इ. यांचे लवकरात लवकर निदान करणे, तसेच रक्‍तशर्करा, लिपिड प्रोफाईल, केएफटी, एलफटी, ईसीजी, अल्‍ट्रासाऊंड, एक्‍स-रे, कॉल्‍पोस्‍कोपी, मेमोग्राफी इध्‍ तपासण्‍या करुन घेणे. रुग्‍णांकरीता वैद्यकिय सेवेचे व्‍यवस्‍थापन करणे, बेड रिडन रुग्‍णांचा पाठपुरावा, गंभीर रुग्‍णांना उच्‍चस्‍तरावर संदर्भित करणे.
त्रुतीय कर्करोग सेवा केंद्र प्रतिबंध, लवकर निदान, उपचार करण्‍याकरीता कर्करोगरुग्‍णांना सेवा देणे तसेच उपशामक आणि पुनर्वसन सेवा पुरविणे.

सेवा केंद्र

अ) पहीला टप्‍पा – वर्धा आणि वाशिम जिल्‍हा
ब) दुसरा टप्‍पा – अमरावती, भंडारा, चंद्रपुर आणि गडचिरोली

मुख्य साध्य

  • राज्‍यात कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्‍याकरीता जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांचे कार्यक्षेञातील एक अधिकारी जिल्‍हा नोडल अधिकारी म्‍हणुन नेमण्‍यात आलेले आहेत.
  • जिल्‍हास्‍तरीय एन.सी.डी. क्लिनिक सर्वजिल्‍हयात सुरु करण्‍यात आलेले आहेत आणि सी.सी.यु. करीता लागणारी उपकरणे खरेदी करण्‍यात आलेली आहेत. तसेच कार्डीयाक बेड, ई.सी.जी.मशीन, वेंटीलेटर आणि पल्‍स ऑक्झिमिटर इ. उपकरणे जिल्‍हयांना पुरविण्‍यात आलेली आहेत.
  • कार्यक्रम राबविला जाणा-या अमरावती, चंद्रपुर, भंडारा, वर्धा आणि वाशिम या जिल्‍यांत डे केअर कीमोथेरापी सेंटर स्‍थापन करण्यात आलेले आहे.
  • उपजिल्‍हा आणि ग्रामिण स्‍तरावर एन.सी.डी. क्लिनिक कार्यन्‍वयीत करण्‍यात आलेले आहेत.

अनुदानाची उपलब्‍धता

तपशील प्रती वर्ष्‍ मानके
एन.पी.सी.डी.सी.एस. ४२६ .११
कर्करोग २११.३४
राज्‍यस्‍तरीय असंसर्गजन्‍यरोग नियंञण कक्ष २३.४८
अनावर्ती अनुदान ५.००
आवर्ती अनुदान १८.४८
जिल्‍हास्‍तरीय असंसर्गजन्‍यरोग नियंञण कक्ष २१.४४
अनावर्ती अनुदान ५.००
आवर्ती अनुदान १६.४४
जिल्‍हा रुग्‍णालयातील कर्करोग सेवा १६६.४२
अनावर्ती अनुदान ५.००
आवर्ती अनुदान १६१.४२
मधुमेह , हदयरोग आणि पक्षाघात २१४ .७७
असंसर्गजन्‍यरोग चिकित्‍सालय आणि सी.सी.यु. १९० .७२
अनावर्ती अनुदान १६१.००
आवर्ती अनुदान २९.७२
ग्रा.रु. /उपजि.रु. असंसर्गजन्‍यरोग चिकित्‍सालय २४.०३
अनावर्ती अनुदान १.००
आवर्ती अनुदान २३.०३
उपकेंद्र ०.०२
आवर्ती अनुदान ०.०२

कार्यक्रमाची प्रगती

जिल्‍हावार

तपासणीचा अहवाल ( सन २०१३-१४ करीता )
जिल्‍हा तपासलेली लोकसंख्‍या निदान झालेले रुग्‍ण
मधुमेह उच्‍चरक्‍तदाब हदयविकार पक्षाघात कर्करोग
अमरावती ९५६३६९ ३९२१४ ८५१७७ १९७९ ३७५ ४५३
भंडारा २०७०९८ ११६०० १९६४७ ५३९ १७९ २३३
चंद्रपुर ४६००४९ १३११२ १८७०८ १२५१ १३९८ ११२
गडचिरोली १३४०२८ ९०३५ १३५२९ ५७ ४७ २१
वर्धा १६७३१७ ५३३८ ८६१५ १०५ १७६ ४३
वाशिम ८९२९० ११९३८ १२५८८ २९१ २१७ ४३
एकुण १०५७७८२ ९०२३७ १५८२६४ ४२२२ २३९२ ९०५