घटसर्प

 
घटसर्प


 

प्रस्तावना

घटसर्प हा Corney Bacterium Diphtheria नावाच्‍या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्‍य रोग असून त्‍यामुळे घसा व टॉन्सिल्‍स यांचा संसर्ग होऊन त्‍यावर तयार झालेल्‍या पडदयामुळे श्‍वासास अडथळा तसेच मृत्‍यु होऊ शकतो.

रोग लक्षणे

घसा खवखवणे, सौम्‍य ताप, घशामध्‍ये राखडी रंगाचा पडदयाचा पट्टा किंवा पट्टे

रोगप्रसार

घटसर्पाचा जीवाणू जंतुसंसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या तोंड, नाक व घसा या भागात वास्‍तव्‍य करतो. खोकला व शिंकेच्‍या माध्‍यमातून तो एका व्‍यक्‍तीकडून दुस-या व्‍यक्‍तीपर्यंत पसरतो.

रोगप्रतिबंधक उपाययोजना

बालपणाच्‍या सुरुवातीच्‍या काळात डीपीटी (घटसर्प, डांग्‍या, खोकला व धर्नुवात यांचे एकञीत ट्रीपल) लसीकरण ही प्रतिबंधाची सर्वांत प्रभावी पध्‍दत आहे. लसीकरणाच्‍या अभावी १४ वर्षापर्यंतची बालके घटसर्प रोगाच्‍या जंतुसंसर्गाला वारंवार संवेदनशील आहेत. लसीकरण कार्यक्रमाच्‍या वेळापञकानुसार डीपीटीचे लसीकरण देण्‍यात यावे.